हरवलेला किनारा…….. (भाग १)

Submitted by ईशुडी on 2 July, 2015 - 04:55

wow !! अक्षु किती मस्त प्लेस आहे ना गोवा !!

I’m so exited यार आपण खूप धमाल करायची हा, इथले सगळे बीच पालथे घालायचे " गोव्याला येउन प्रिया खूप उस्ताहित झाली होती .

आज खूप दिवसांनी आकांक्षाहि बाहेर पडली होती रोजच्या कामातून तिला कधी वेळच मिळत नसे. आणि स्वप्नीललाही मनात असूनसुद्धा तिला वेळ देत येत नसे. याही वेळी त्याला जमल नाही म्हणून त्याने तिला प्रीयाबरोबर बाहेर पिकनिकला जायला सांगितला होतं , कारण त्याला कामानिमित्त ४-५ दिवसांसाठी बाहेरगावी जावं लागणार होतं . हो-नाही करता -करता आकांक्षाही तयार झाली . आणि ती प्रियाबरोबर गोव्याला आली .

प्रिया हि आकांक्षाची खूप चांगली मैत्रीण होती, दोघींनी पार्टनरशिपमध्ये पुण्यात एक बुटीक ओपन केलं होत. लग्न झाल्यानंतर आणि कॉलेज संपल्यानंतर पहिल्यांदाच अकांशाला प्रियासारखी एक जिवलग मैत्रीण मिळाली होती. आणि 'स्वप्नील' आकांक्षाचा नवरा, खूपच चांगला मुलगा ,आकांक्षावर त्याचं अगदी जीवापाड प्रेम होतं दोघांच्या लग्नाला नुकताच १ वर्ष झालं होतं . दोघांची भेटही फेसबुकवरंच झाली होती, ३ वर्षापूर्वी. आकांक्षाचा स्वभाव खूप आवडल्यामुळे त्याने तिला न बघताच propose केल होत. आकांक्षाही तितकीच गोड स्वभावाची आणि सुंदर होती, कोणीही सहज तिच्या प्रेमात पडलं असतं. म्हणूनच आकांक्षा स्वप्नीलला वाईट वाटेल, त्याच मन दुखवलं जाईल , असं काहीही आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्यायची म्हणूनच तिने मनात असूनही स्वप्नीलला आपल्या भूतकाळाबद्दल सांगितलं नाही. कारण तिला भीती होती कि स्वप्नीलचं तिच्यावर विश्वास उरणार नाही आणि मग ती त्यालाही कायमचं गमाउन बसेल ,आणि हेच तिला नको होत. कारण तिचंही तितकंच प्रेम होतं स्वप्नीलवर. आणि तसंही आता या गोष्टी पुन्हा उकरून काढण्यातही काही अर्थ उरला न्हवता, समीरला ती पूर्णपणे तर नाही पण बऱ्यापैकी विसरली होती. पण कधी कधी स्वप्नीलच्या वागण्यातून- त्याच्या बोलण्यातून आकांक्षाला समीरची आठवण व्हायची, आणि मग तिला तिचा भूतकाळ जो ती खूप मागे ठेवून आली होती; तो समोर येत असे आणि मनात लपवून ठेवलेल्या दुःखाचा पुन्हा त्रास होत असे.

दोघी गोव्याच्या एका बीचवर आल्या होत्या फिरायला , प्रिया तिच्या इतर मैत्रिणीबरोबर मौजमजा करत होती आणि आकांक्षा मात्र एका ठिकाणी वाळूवर शांतपणे बसून त्या अथांग समुद्राकडे पाहत बसली होती. समोरंच एक कपल बसलेलं होतं, आकांक्षा त्यांच्याकडे टक लाऊन पाहत होती. त्यांच्यात काही बोलणं चालू होतं मग त्या मुलाने हसत हसत जवळ पडलेल्या एका नारळाच्या झावळीच्या पानाचा एक तुकडा घेतला आणि त्याला पीळ देवून त्याची एक लहानशी रिंग बनवली आणि मग ती त्याने त्या मुलीच्या बोटात घातली आणि म्हणाला ." हे बघ आता आपली इंगेजमेंट झाली. आज पासून तू माझी झालीस लवकरच लग्नही करूयात आपण !!" असं म्हटल्याबरोबर त्या मुलीने हसून त्याच्या खांद्यावर आपल डोकं टेकवल आणि दोघे त्या निळ्याशार अथांग समुद्राकडे पाहू लागले .
"अक्षु एकटीच काय बसलीयेस चल ना आमच्याबरोबर जरा एन्जॉय कर चल !!" प्रिया तिला बोलवत होती पण आकांक्षाच तिकडे लक्षच न्हवतं . आकांक्षा कुठल्यातरी आठवणीत हरवली होती. आणि हळूच तिच्या डोळ्यात अश्रू तरळून गेले . जणू समीरच्या तिच्या जुन्या आठवणी त्यांच्याकडे पाहून जाग्या झाल्या होत्या . आणि मन म्हणत होतं .

“तू परत येऊ नकोस,
जुन्या आठवणी जागवायला
आधीच खूप दिवस लागलेत,
मनावरची जखम भरायला
मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला
आणि तुटलेल्या मनाला सावरायला !!!”

आकांक्षा मनात असा विचार करतच होती कि,
"हेल्लो!!! madam मी तुझ्याशी बोलतेय कुठे हरवलीस??" प्रियाच्या आवाजाने आकांक्षा भानावर आली .
तिच्या डोळ्यात पाणी बघून प्रियाला काळजी वाटली आणि म्हणाली , "काय झालं
अक्षु तुझ्या डोळ्यात पाणी ? स्वप्नीलची खूप आठवण येतेय का तुला? " प्रिया काळजीच्या
सुरात म्हणाली .
"नाही गं काही नाही बस असचं !! तू जा ना एन्जॉय कर, मला बसू देत थोडा वेळ इथे खूपच शांत वाटतंय " म्हणून तिने विषय टाळला.
मग प्रियाही निघून गेली. तेवढ्यात प्रियाला कुणाचातरी कॉल आला , मग ती थोडावेळ काहीतरी फोनवर बोलली मग हळूच आकांक्षाकडे बघून हसली मग पुन्हा मैत्रिणीमध्ये निघून गेली. आणि आकांशा पुन्हा तिच्या भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेली...........

"आकांक्षा मुंबईतल्या एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकत होती , B.Com चं शेवटच वर्ष बाकी होतं. डिसेंबरचा महिना उजाडला होता. वर्षभर मौजमस्ती केल्यानंतर आता परिक्षेचा अभ्यास सगळ्यांना आठवत होता आकांक्षाचेही काही वेगळे हाल न्हवते . मग शेवटी तिच्या ग्रुपने कॉलेजची लायब्ररी जॉईन केली. पण तिथेही अभ्यास कमी आणि मस्तीच जास्त असायची त्यांची.
"समीर" ........ B.Com च्या लास्ट वर्षाला असतांना त्यांची ओळख झाली ,तिच्या कॉलेजच्या लायब्ररीतच तो असिस्टंट म्हणून काम करायचा,काहीतरी २ महिन्यापूर्वीच रुजू झाला होता, दिसायला तसा स्मार्ट होता अगदी गोरापान. कॉलेजच्या काही मुलींना त्याच्यावर जाम क्रश होता,पण आकांशा मात्र याला अपवाद होती, कॉलेजमधे असताना अकांशाचाही स्वभाव थोडा खोडकरच होता. एक दिवस तिच्या एका मैत्रिणीलाहि लायब्ररी जॉईन करायची होती, म्हणून ती तिच्यासोबत तिथल्या ऑफिस मध्ये गेली . आणि तिथून एक फॉर्म घेऊन तो भरण्यासाठी दोघी समोरच्याच एक टेबलवर बसल्या, तेवढ्यात समीरही काही कामानिमित्त तिथे आला होता तिथेच त्याने पहिल्यांदा आकांक्षाला पाहिलं , पहिल्याच नजरेत ती त्याला खूप आवडली म्हणून तो त्याच काम संपल्यानंतरही मुद्दाम तिथेच एका पुस्तकांच्या कपाटाजवळ काहीतरी खुडबुड करत उभा राहिला . व मधून मधून चोरून अकांक्षाकडे पाहत होता. इतक्यात आकांक्षाच सहज त्याच्याकडे लक्ष गेलं तस त्याने लगेच दुसरीकडे बघायला सुरवात केली, आकांक्षा त्याला पाहून मस्करीच्या मूडमध्ये येउन तिच्य मैत्रिणीला हळूच म्हणाली," मिनु!! मी काय म्हणते, हा मुलगा किती स्मार्ट आहे ना, असाच मुलगा जर माझा बॉयफ्रेंड असता तर किती छान झाल असतं ना " ,
" हो का ? मग जाऊन बोलणी करू का त्याच्याशी तुझ्यासाठी, तसाही तो मघापासून तो तुला चोरून चोरून बघतोय " मिनु म्हणाली. त्याचं बघणं मिनुच्या नजरेतून सुटलं न्हवतं , लगेच आकांक्षा म्हणाली," नको काय !!मला गरज नाहीये त्याची , मी तर मस्करी करत होती "आणि दोघी हसायला लागल्या तसं समीर त्यांच्याकडे पाहू लागला .
" ए मिनु गप बस हसू नको ! तो बघ इकडेच बघतोय " आकांक्षा त्याच्याकडे पाहून म्हणाली. मग लगेच दोघी गप्प बसल्या आणि form काउन्टरवर जमा करून निघून गेल्या. पण समीर मात्र त्यांना त्या बाहेर जाईपर्यंत बघत राहिला. आकांक्षा तर नाही पण समीर नक्कीच तिच्या प्रेमात पडला होता .
असेच काही दिवस निघून गेले जानेवारीचा महिना उजाडला, आकांक्षाचा अभ्यास जोरात चालू होता, इकडे समीर मात्र आता नेहमीच काही न काही काम काढून लायब्ररीत सारखा यायचाच , आकांक्षाला लपूनच का होइना तिला बघण्याचा प्रयत्न करायचा पण आकांक्षाला याची जराही कल्पना न्हवती . हळू हळू तिच्या मैत्रीणींना मात्र हि गोष्ट जाणवू लागली आणि त्यांनी आकांक्षाला तसं सांगितलही , पण आकांक्षा मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होती कारण तिला दुनियेची कधी पडलेलीच नसायची, ती नेहमी स्व:तच्याच धुंदीत असायची. तिच्याच क्लासमधल्या एका मुलीचा भाऊही तिथेच काम करत होत. हळू हळू समीरने त्याच्याकडेही आकांक्षाची चौकशी सुरु केली आणि हि गोष्ट क्लासमधल्या तिच्या मैत्रिणीलाही कळली आणि अचानक एक दिवस आकांक्षा तिच्या मैत्रिणीबरोबर कॅन्टीनमध्ये बसलेली असताना ती मुलगी ओरडतच कॅन्टीनमध्ये आली, " ए आकांक्षा अगं एक गोष्ट सांगायचीय तुला !! यार आपल्या कॉलेजमध्ये एक मजनू आहे तुझा !!"
"काय?!!!!" आकांक्षा जवळ जवळ ओरडतच उठली.
आणि म्हणाली ," ए जरा हळू बोल आणि हे काय म्हणतेयस ते जरा नीट सांगशील का मला, कोण आहे माझा मजनू, आणि तुला कुठे भेटला??"
मग तिने काय ते सगळ आकांक्षाला सांगितलं कि तो कसा तिच्या मागे फिरतोय आणि तिच्याविषयी लायब्ररीत सर्वांना विचारपूस करतोय आणि त्याच वर्णन सांगितलं ते ऐकून मिनू म्हणाली ," अगं... हा तो तर नाही न त्या दिवशी आपण फॉर्म भरत असताना तिथे उगच उभा राहून तुला बघत होता तो ?".
आता सर्व मैत्रिणी आकांक्षाला रोजच चिडवू लागल्या.. आता तर तिनेसुद्धा ३-४ वेळा त्याला नोटीस केलं होत. आणि त्यालाही ते कळलं होतं, म्हणून आता तो मुद्दामच तिच्यासमोर येउन उभा राहत असे , हळू हळू तिथल्या काही स्टाफलाही याची भुणभुण लागली होति. असं करता करता एक दिवस त्याने ठरवलंच कि आकांक्षाला त्याच्या मनातली गोष्ट सांगायचीच म्हणून . एक दिवस परीक्षेचा फॉर्म भरायचा होता आणि शेवटची तारिख होती, म्हणून कॅम्पसमधून धावत ती ऑफिसमध्ये जात होती, तेव्हा कशात तरी तिचा पाय अडखळला आणि आकांक्षा जोरात खाली पडली आणि तिचा पाय मुरगळला पायाचा अंगठाही चांगलाच फुटला होता, त्यातून खूप रक्त वाहत होत. लगेच तिच्या मैत्रिणीनी तिला मेडिकल डिपार्टमेंटमध्ये नेलं आणि तात्पुरती मलमपट्टी केली ,पाय मुरगळल्यामुळे आकांक्षाला खूप त्रास होत होता त्यामुळे ती रडत होती थोड्या वेळ ती खालीच कॅम्पसमध्ये बसून राहिली इकडे लायब्ररीत अजूनही आकांक्षा न दिसल्यामुळे समीर अस्वस्थ झाला होता, कारण तिला पाहिल्याशिवाय त्याचा दिवसच जात न्हवता. इकडे तिचा फॉर्म तिच्या मैत्रिणीनी भरला आणि तिला लायब्ररीत घेऊन आले . तेव्हा नेमका समीर तिथेच एका मुलाबरोबर बोलत उभा होता. त्याने अकांक्षाला पाहिलं आणि त्याला खूप आनंद झाला पण दुस-या क्षणी तिच्या डोळ्यातलं पाणी बघून तो काळजीत पडला. मग त्याने तिच्या पायाकडे पाहिलं तर अंगठ्याला पट्टी बांधलेली होती तिचा रडवेला चेहरा बघून त्यालाही कससंच झालं. आकांक्षाने त्याच्याकडे पाहिलं आणि खाली मान घालून आतमध्ये निघून गेली. पण समीर मात्र खूप अस्वस्थ झाला होता. 'स्व:ताच जाऊन विचारवं कि काय झाल तिला' पण त्याला धीर होत न्हवता . म्हणून त्याने त्याच्या एक मित्राला विचारायला सांगितलं, कारण त्याची तिच्या मैत्रिणींशी चांगली ओळख होती. मग त्याने तसं विचारल्यावर, काय झालं ते समीरला सांगितलं .

To be continued with next part ......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छाने ..
बस ते कविता लिहिल्यासारख नको लिहु प्लीज.. वाचताना खुप जिवावर येत तुटक तुटक.. गद्य आहे तर गद्यात लिही ना..

छान.

टीना +१

<<<<तेवढ्यात प्रियाला
कुणाचातरी कॉल आला , मग ती थोडावेळ
काहीतरी फोनवर बोलली मग हळूच प्रियाकडे
बघून हसली मग पुन्हा मैत्रिणीमध्ये निघून गेली.>>>> इथे करेक्शन हवंय का?