हरवलेला किनारा…….. (भाग १) http://www.maayboli.com/node/54496
मग २-३ दिवसांनी कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे पूजा होती . त्याच दिवशी समीरने आकांक्षाला विचारायचं ठरवलं . म्हणून तो त्या दिवशी संधी शोधत होता . समीर कॉलेजच्या तिसर्या मजल्यावरती एक मित्राशी बोलत उभा होता तेवढ्यात ,
"समीर-अजय चला खाली देवाच्या पाया पडायला इथे काय बोलत उभे राहिलात" एका सिनिअर madam त्यांना सांगून निघून गेल्या, पण समीरला खाली जायचा कंटाळा आला होता,
"चल कोण जातंय खाली मला खूप कंटाळा आलाय आता!! नंतर जाऊया", असं म्हणून तो पुन्हा मित्राशी बोलत तिथेच रेंगाळला .
इतक्यात त्याला खाली कॅम्पसमध्ये आकांक्षा तिच्या मैत्रिणीबरोबर येताना दिसली, तिने आज जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता ,तिचा रंग गोरा असल्याने तो ड्रेस तिच्यावर खूपच उठून दिसत होता आणि केसांना एक लहानशी क्लीप लाऊन केस मोकळे सोडले होते, एका हातात एक छानसं घड्याळ आणि एका हातात सुंदर नाजूक कडा घातला होता. खरच आज आकांक्षा नेहमीपेक्षा खूपच सुंदर दिसत होति. तिला पाहताच समीर खुश झाला आणि खाली कॅम्पसकडे निघाला ,
"अरे समीर आता कुठे निघालास??" त्याच्या मित्राने त्याला अडवले
"अरे खाली पूजा आहे न तिथेच पाया पडायला चाललोय चल तू पण" समीर बोलला ,
"काय?? अरे आता तर तू नाही म्हणालास न मग अचानक काय झालं " मित्राने विचारलं
"काही नाही रे असंच चल लवकर " अस म्हणून तो मित्राला खेचतच खाली घेऊन गेला.
देवाची आरती झाल्यानंतर आकांक्षा पाया पडली आणि जशी मागे वळली तशी ती एकदम दचकली , मागे एका खुर्चीवर समीर आणि त्याचे मित्र मस्तपैकी ऐटीत बसले होते आणि समीर तिच्याकडे टक लाऊन वेड्यासारखा पाहत होता आणि हसत होता. आकांक्षाला खूप अवघडल्यासारखे वाटले, कारण तिच्या पायाची जखम अजून बरी झाली न्हवती म्हणू ती थोडी लंगडत चालत होती , शेवटी कशीबशी ती तिथून निघून गेली. आता मात्र तिच्या मैत्रिणी तिला जास्तच चिडवू लागल्या . आकांक्षाहि थोडी लाजली . कारण हळू हळू समीरहि तिला आवडू लागला होता .नेहमीपेक्षा आज समीर जरा जास्तच तिच्या समोर फिरत होता आणि सोबत त्याचे मित्रही होते. पण आज त्याच्या मित्रांची टवाळी जरा जास्तच वाढली होती . म्हणून
आकांक्षाला समीरचा थोडा रागही आला होत. जरी आकांक्षा खोडकर असली तरी तिला आपल्याबद्दल सर्वत्र गॉसिपिंग झालेलं आवडलेलं न्हवत . कॅम्पसच्या एका कट्ट्यावर आकांक्षाचा ग्रुप गप्पा मारत बसला होता. मग मिनू म्हणाली " ए चल आता खूप टाईमपास झाला आता लायब्ररीत जाऊन अभ्यास करूया चल ग अक्षु " मग लगेच मिनू आणि आकांक्षा लायब्ररीकडे निघाल्या . त्यांना तिकडे जाताना समीरने पाहिलं आणि त्याचे मित्र त्याला सांगू लागले कि 'जा बोल तिला काय ते ' म्हणून समीरही त्यांच्या पाठोपाठ गेला . आज पूजा असल्यामुळे लायब्ररीकडे कोणी जास्त फिरकलही न्हवतं. समीरने दोघींना पहिल्या मजल्याच्या जिन्यावरच अडवलं , त्याला अस अचानक बघून दोघी दचकल्या, मग तो थोडा पुढे जाऊन उभा राहिला , आकांक्षा जवळ येताच त्याने तिला स्माईल देत विचारल ," हाय !! तुझ नाव काय आहे?" अचानक या प्रश्नाने बावरल्याने ती काही उत्तर न देताच पुढे निघून गेली . पुन्हा समीर त्यांच्या मागून जाऊन दुसर्या मजल्याच्या जिन्यावर आणखी पुढे जाऊन थांबला
पुन्हा त्या जवळ येताच त्याने परत विचारले ," plz थांब ना !! तुला मला काही सांगायचं आहे "
"काय सांगायचं आहे ??" मिनूने पुढे होऊन त्याला प्रश्न विचारला
" मला तिला सांगायचं आहे तुला नाही " समीर जर रागानेच मिनुला बोलला
मग मिनु जरा मागे झाली , मग पुन्हा आकांक्षाकडे वळून तिला म्हणाला," हे बघ मला नक्की नाही माहित कि तुझ्या मनात काय आहे ते पण मला तू खूप आवडतेस तुझ नाव तरी नाही माहित पण तुझा नकार नक्कीच नसेल " आणि पुढे तो आणखी काही बोलणार इतक्यात खालच्या मजल्यावरून कोणीतरी येण्याचा आवाज आला
तसा समीर लगेच तिथून निघून गेला आकांक्षा स्तब्ध होऊन तिथेच उभी राहिली थोड्या वेळासाठी काय घडल ते तिला कळलच नाही.
"अगं काय झाल ? तो गेला पण निघून " अस म्हणून मिनूने तिला हलवलं तशी भानावर येउन मिनुकडे बघितला तर मिनू तिच्याकडे बघून हसत होती
"काय मुहूर्त शोधलाय ग मि. मजनू ने " आणि मिनू ने आकांक्षाला डोळा मारला. तश्या दोघी हसायला लागल्या मग दोघी लायब्ररीत आल्यावर बॅंग ठेवण्याच्या काऊन्टर जवळ येउन थांबल्या पण आकांक्षाला खरंच विश्वासच बसत न्हवता कि समीरने तिला propose केलाय ते . तेवढ्यात पुन्हा समीर फोनवर बोलत अचानक तिथे आला व हळूच तिच्या कानात "आज खूप सुंदर दिसतेयस " अस म्हणून मुद्दाम आकांक्षाच्या बाजूने निघून गेला . पण आज आकांक्षाला मात्र धक्क्यांवर धक्के मिळत होते , आता लायब्ररीत काही मन लागणार न्हवते म्हणून आकांक्षाने घरी जायचे ठरवले पण मनातून मात्र तिला तिथेच थांबावस वाटत होतं .मग मिनुबरोबर खाली कॅम्पसमध्ये आल्यावर तिथे मुलांचा एक ग्रुप उभा होता तिथून काही कुजबुज तिच्या कानी पडली" अरे विचारला रे त्याने पण तिनेच काही उत्तर दिलं नाही"
आकांक्षाने रागाने एक नजर टाकताच सर्वजन चिडीचूप झाले . पण आता मात्र आकांक्षाला समीरचा खूपच राग आला होता तिला वाटल कि समीर तिची मस्करी करतोय आणि त्याचे मित्रही त्यात शामिल आहेत, म्हणून ती जरा रागानेच मिनुबरोबर कॉलेजच्या बाहेर पडली . थोड पुढे जाताच तिला जाणवलं कि कोणीतरी त्यांचा पाठलाग करतंय म्हणू तिने मागे वळून पाहिलं तर मागून थोड्या अंतराने समीर आणि त्याचा मित्र येत आहेत. आता मात्र आकांक्षा जाम घाबरली आणि मिनुला म्हणाली ," अग मिनु ते बघ ते दोघे आपल्या मागून येतायत आता !!" ह्या बावळाटाचं लक्षण काही चांगल दिसत नाहीये "
"लक्षण चांगल दिसत नाहीये म्हणजे ??" मिनू प्रश्न केला .
"म्हणजे मी त्याला नाही म्हणणार "आकांक्षा म्हणाली
" काय?? खरच नाही म्हणणार कि फक्त माझ्यासमोरच अस म्हणतेयस?" मिनू जर तिची मस्करी करायच्या उद्देशाने म्हणाली .
"गप्प बस आता चल लवकर !" आणि दोघी पटापट निघून गेल्या . समीर मात्र दूरपर्यंत नजरेआड होईपर्यंत तिला पाहत उभा राहिला.
दिवसभर आकांक्षाच्या नजरेसमोरून सकाळचा क्षण जात न्हवता . दिवसभर आणि रात्रभर ती समीरचाच विचार करत होती . जरी आकांक्षाच्या मनात समीरचे विचार सुरु असले तरी तिला एका गोष्टीची भीतीही वाटत होती कि खरच समीर तिच्यावर प्रेम करतोय का? कि उद्या जर घरच्यांनी नकार दिला तर तो माघार घेईल ? आणि जरी ती हो म्हणाली तर पुढे तिच्या घरच्यांचं काय रिअक्शन असेल ? ,असे एक न अनेक प्रश्न तिच्या मनात गर्दी करत होते. न राहवून तिने मिनुला कॉल केला .
मिनूने तिला समजावलं" अक्षु तू plz टेन्शन घेऊ नकोस आणि तु पण घाईघाईने काही मनात ठरवून ठेऊ नकोस , उद्या कॉलेजला आल्यावर बोलू आपण " आणि मिनूने फोन ठेवून दिला .
इकडे सामीरचेही हाल काही वेगळे न्हवते. मनातली गोष्ट आकांक्षाला सांगितल्यामुळे तो जरा मोकळं फिल करत होता. पण आकांक्षाच उत्तर काय असेल याचीही खूप काळजी त्याला वाटत होती. पण त्याला स्वत:वरच जास्त या गोष्टीचा राग आला कि तो साध तिला तीच नावही विचारू शकला नाही . कारण इतकी विचारपूस करूनही त्याला आकांक्षाच नाव कळू शकल न्हवतं . शेवटी दुसरा दिवस उजाडला . आकांक्षा आणि तिची मैत्रीण कॉलेजला आल्या होत्या . मग कॉलेज सुटण्याच्या वेळेपर्यंत त्यांनी अभ्यास केला पण आज आकांक्षाला कुठे समीर दिसलाच नाही . कॉलेजमध्ये आल्यापासून न जानो कित्येक वेळा तिच्या नजरेने त्याचा शोध घेतला असेल पण आज त्याच कुठे पत्ताच न्हवता .
" काय ग ? आज मि . मजनू कुठे दिसला नाही.काल तू काही उत्तर दिल नाही म्हणून राग आला कि काय त्याला??" मिनू ने मुद्दाम आकांक्षाला छेडल .
"गप ग येऊ देत राग आला तर, नाहीतरी काल कसा वागला होता तो ." खोट्या रागानेच आकांक्षा म्हणाली . पण तरी तिचे डोळे त्यालाच शोधत होते.
"काय झालय आकांक्षा तुला ? अशी का वागतेयस तू? का त्याची इतकी वाट बघतेय?" असे अनेक प्रश्न आकांक्षा स्व:तच्याच मनाला विचारात होती. मग मिनू म्हणाली कि त्याच्या मित्रालाच जाऊन विचारू.
दोघी त्याच्या मित्राजवळ आल्या, मिनू," काय काल काय चाललं तुझ्या मित्रच आणि तुझं ?"
मित्र ," कुठे काय ? आम्ही काय केलं "
"हो का, काल आम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्ही दोघे आमचा पाठलाग का करत होतात ?"
"नाही अगं कुठे?नाही, आम्ही तर असाच बाहेर फिरत होतो "
"खर खर सांग, अस करताना काहीच कसं वाटत नाही रे तुम्हा मुलांना " मिनू म्हणाली ,
आकांक्षा बाजूला शांत उभी होती . खर तर तिला त्याच्या मित्राकडे बघून खूप हसायला येत होत पण तिने स्व:ताला आवरलं .
" मी काल काही उत्तर दिल नाही म्हणून त्याला राग आला का ? " न राहवून शेवटी मधेच आकांक्षा बोलली .
"काय तू आकांक्षा जरा शांत बस ना लगेच काय घाई पडलीय तुला" अस म्हणून मिनू तिला तिथून खेचतच घेऊन गेली आणि नंतर खूप ओरडली.
मग तिला समजावलं कि "अक्षु plz लगेच अशी घाई करू नकोस आधी नीट त्याच्याशी बोलू मग पुढच पुढे बघू" ठीक आहे" अकांक्षनेही शहाण्या मुलीसारखी मान हलवली आणि परत दोघी अभ्यास करायला
निघून गेल्या .
To be continued......
चक्क गद्यात.. देव तुझ भलं
चक्क गद्यात..
देव तुझ भलं करो.. आता वाचते थांब..
To be continued नंतर परत
To be continued नंतर परत लिहिल्या गेलय ते एडीट कर.. नुसत्या सुचना देते म्हणुन वाईट वगैरे वाटून घ्यायच्या फंदात पडू नकोस ओके..
बाकी समीर एवढ्या लोकांकडे तिची विपू करतो .. अगदी तिच्या मैत्रीणींच्या भावाकडेसुद्धा आणि तरी तिच नाव माहित नसण अगम्य आहे.. मेरेको नही पट्या.. आम्हाला अॅडमिशन कुणाची झाली त्यांची पण नावे माहिती असत हे तर खुप सोप्पय..
shwalii टीना taii kel baga
shwalii टीना taii kel baga nit samda
चक्क गद्यात.. देव तुझ भलं
चक्क गद्यात..
देव तुझ भलं करो.. आता वाचते थांब.. >>
thombyala naav kas ny kalla
thombyala naav kas ny kalla ny kalla ny mahit adani kuthla??
मेरेको नही पट्या.. आम्हाला
मेरेको नही पट्या.. आम्हाला अॅडमिशन कुणाची झाली त्यांची पण नावे माहिती असत हे तर खुप सोप्पय.. + १
मस्त......................
मस्त...................... पुढचा भाग कधी...?
WAITTING
WAITTING !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!