नेमाड्यांच्या एका पुस्तकात एक सारंग नावाचे पात्र आहे. अतिशय चळवळे , उत्साही, सर्जन शील, आग्रही असे नवतरूण व्यक्तिमत्व. ह्याच्याकडे एक जबरदस्त कादंबरीची रूप रेषा तयार असते व अर्धा कच्चा खर्डा लिहूनही तयार असतो. एक पुणेरी प्रकाशक त्याच्या कथेतील वेगळेपण हेरतात व त्याला लिखाण पक्के करायला आपल्या घरीच घेउन जातात. तिथे त्याची संपूर्ण बड दास्त राखतात, लिहायला एकांत व सर्व सुखसोई पुरवतात. लागेल तितका वेळ घे असे सुचवतात. पुस्तक विक्रीची हमी घेतात. त्याला कसलेसे बक्षिसही मिळू शकेल हे सुचवतात.
पंख पसरून उडणारी डुकरे
तू माझे काय झाले याची पर्वा केली नाहीस
आणि मी हि तुझी
कंटाळा आणि वेदनांशी सामना करीत आपण चाललो आहोत वेड्यावाकड्या मार्गावर
कधीतरी पावसाकढे बघत
कोणत्या नालायकाला दोष दयावा याचा विचार करीत
आणि बघत ती पंख पसरून उडणारी डुकरे
-उडता डुक्कर
(रूपांतरित / आधारित / प्रचोरीत)
त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा कॉलेजग्रूप नाटक करणार आहे. महाभारतावर ! अन मी दु:शासन !
फुल्ल टू दंगा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी पुरूषोत्तमच्यावेळी आणि नुकतेच फिरोदिया मध्ये केले होते. यण्दा हा मान चक्क कान्सने पटकावला आहे. पण एक गोची आहे.
चालू घडामोडींपासून प्रेरणा घेऊन सुरेश भटांच्या 'दु:ख माझे' ही कविता माझ्यासाठी आणि माझ्यासारख्याच अन्य काहींसाठी थोडी बदलून
ट्रोल माझा
माझियामागे असू दे !
तो बिचारा एकटा जाईल कोठे?
मी असोनी का अनाथासारखे त्याने फिरावे?
माझियावाचून** त्याला
आसरा आहे कुणाचा?
जन्मला* तेव्हापुनी
श्वानापरी
माझ्याच मागे राहिला तो!
ट्रोल माझा
माझियामागे असू दे!
शुभेच्छा नव-वर्षाच्या
करा निर्धार नव-वर्षाचा
यशप्राप्तीसाठी झटण्याचा
सुख-शांती-यश देखील
खुशी-खुशीने वाटण्याचा
मिळत राहील यश सदैव
तुमच्या सार्या प्रयत्नांना
जीवनी तुमच्या तत्परतेने
डिस्चार्ज मिळो यातनांना
झाला प्रफूल्लित मन:पुर्वक
हा घ्या शब्दफूलांचा गुच्छा
देतो आपणास स्नेहबंधाच्या
नव वर्षाच्या नव शुभेच्छा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
लवकरच येत आहे… माझी पी. एच. डी. - उवा आणि मानवी उत्क्रांती...
आमचे गाईड -आमचा न्हावी
पृथ्वीच्या पाठीवर न्हाव्याचा जेवढा संबंध डोक्याशी (दुसर्याच्या) येतो तेवढा क्वचितच कुणाचा येत असावा. असा डोकेबाज माणूस माझा गाईड असावा हा तर दुग्ध शर्करा योग. त्याच न्यायाने जी जमातच मुळात डोक्यावर राहते ती तर किती डोकेबाज असेल विचार करा.….
शीर्षक वाचून संध्यानंद मधील बातमी तर वाचत नाही ना, असा फील आला ना.
पण बातमी खरी आहे, पक्की आहे. जवळच्याच एकाच्या अनुभवातील आहे.
माझ्या घराजवळच राहणारा, माझा ऑफिसमधील मित्र. गेल्या शनिवारच्या रात्री अचानक घरी आला आणि म्हणाला, "रुनम्या एका दिवसासाठी तुझा फोन मिळेल का?"
फोन ??? मी किंचाळलोच !!
ते सीआयडी मालिकेत नाही का साध्या गणवेषातील दया, अभिजीत, एसीपी प्रद्युमन वगैरे आपली ओळख उघड करतात तेव्हा समोरचे लोक "सीआयडी!!" करत दचकतात. बस्स सेम त्याच टाईपमध्ये.
खूप दिवसांनी फेसबूक प्रोफाईलवरची धूळ झटकत, विस्मरणात गेलेला पासवर्ड आठवत, डिअॅक्टीवेट झालेल्या प्रोफाईलला अॅक्टीवेट केले. प्रोफाईलमध्ये कधीकाळी मौजमजेसाठी जमा केलेले सवंगडी कसे आहेत, त्यांची खुशाली घेऊया म्हणून थोडीफार चाळाचाळ केली. तर दहापैकी सात जणांचे प्रोफाईल पिक्चर सप्तरंगी रंगात नटलेले दिसले. फेसबूकवरचेच एखादे फॅड म्हणत इग्नोर करावेसे वाटले, पण उथळ गोष्टींना थारा न देणार्या काही मित्रांनी देखील या ऊपक्रमात सहभाग घेतला होता ते पाहून हे काहीतरी स्पेशल आहे असे जाणवले. चारचौघांना विचारले तर कोणालाही ठामपणे काही सांगता आले नाही. काय ते प्राईड प्राईडसाठी म्हणत थातुर मातुर उत्तर दिले.