जुनी गोष्ट आहे. आज या धाग्याने ( https://www.maayboli.com/node/65653 ) खपली काढली म्हणून लिहून काढावीशी वाटली. आठवेल तसे जमेल तसे लिहिलेय. प्लीज व्याकरन सुद्धलेकण तपासू नये.
आमचा छान ग्रूप होता फेसबूकवर. सर्वांची आवड एकच, नवीन नवीन मराठी मित्रमैत्रीण बनवणे आणि आधुनिक मराठी वाचन करणे. अश्यात बरीच जुळवाजुळवी प्रेमप्रकरणे ओघानेच आली. माझी एका संजय नावाच्या मुलाशी छान गट्टी जमली होती. ग्रूव्यतिरीक्त पर्सनल चॅट वर, तसेच फोन नंबर एक्स्चेंज झाल्यावर आम्ही खूप गप्पा मारायचो. चॅट तर रात्र रात्र जागून चालायची. फोनवरही रोजचेच दुपारचे बोलणे असायचे. न थकता, न कंटाळता, एकमेकांशी नॉनस्टॉप बोलू शकायचो आम्ही. तो आणखीही कोणा मुलीशी ईतका बोलत असेल का याची कल्पना नाही मला. पण शक्यता कमीच.
मग एके दिवशी आमच्या फेसबूक ग्रूपचे जीटूजी (स्नेहसंमेलन) ठरले. आम्ही ठरवले असते तर आम्ही एकमेकांना कधीही भेटू शकलो असतो. एकानेही विचारले असते तरी समोरचा त्याला नाही म्हणाला नसता. पण तो आपला नेहमीचा मराठमोळा संकोच आड आला. मग गेटटूगेदरलाच आता भेटूया म्हटले. बरीचशी हूरहूर आणि ईकडचं तिकडचं बरंच काही. मनात सारं काही दाटून आले होते त्या भेटीच्या आधी. पण ती स्नेहसंमेलनातील भेट आमच्यातील गोड नात्याचा शेवट ठरणार होती याची मला कल्पना नव्हती.
त्या दिवशी तो माझ्याशी काही वाईट वागला नाही. पण काही स्पेशलही वागला नाही. ईतर मुलींपैकीच मी एक होते त्याच्यासाठी. कारण स्पेशल कोणीतरी दुसरीच होती. ग्रूपमधील सर्वात हॉट मुलगी. जिच्यासमोर सारी मुले कूल बनायला बघायची. ती शनाया. जिच्यासमोर मी ठरले राधिका.. छे हो, आपट्यांची नाही. तशी असते तर प्रश्नच नव्हता. मग ती सारी मुले आपली अक्कल विकून माझ्या मागे लागली असती.
पण राहिलंच ...
त्यानंतरही आमचे चॅटवरचे बोलणे तसेच चालू राहिले. पण आमचा संजूबाबा आता त्या शनायाचेच गोडवे गाऊ लागला होता. तिने मात्र एकूण एक मुलांना भुरळ घातली होती. त्या दिवशी ती प्रत्येकाशी हसून बोलली होती. जणू काही प्रत्येकाच्या भावनांचा तिने स्विकार केला होता. प्रत्येकाला तिच्यात आता आपली प्रेयसी दिसू लागली होती. सर्वांमध्ये चढाओढ लागली होती.
ती देखील तितकीच हुशार. प्रत्येकासोबत ती कॉफी डेटला जाऊन आली. प्रत्येकाला हे समजत आणि माहीत असूनही वेड्यासारखे आपापसात स्पर्धा करत होते. त्यात एक आमचेही येडे लागले होते.
मग त्यातील एकाला ती मिळाली. अक्षयला. आमच्या ग्रूपमधील सर्वात पैसेवाल्या मुलाला. बहुधा तिने प्रत्येकासोबत कॉफी पिताना याचाच अंदाज घेतला असावा. प्रत्येकाच्या खिश्याचा. ज्याचा खिसा मोठा, तिथेच तिचे प्रेम मावले. ज्याने ते प्रेम मिळवले त्यालाही याच गोष्टीचे कौतुक की जिच्यामागे सर्वांनी नंबर लावले तिला मी मिळवले. पण तिने आपल्यात नक्की काय बघितले, तिचे आपले काय जुळले याचा जराही विचार नाही. आमच्या येड्याने तरी काय केले होते म्हणा. जिथे सारे काही मस्त जुळले होते त्यावर बोळा फिरवून मृगजळाच्या मागे धावला होता. आणि बघितले तरी काय होते, तर जास्तीचे मादक सौंदर्य आणि त्याला साजेश्या अदा.
काळ लोटला, मी त्यातून सहज बाहेर पडले, लाईफमध्ये मूव ऑन झाले. संजयशी चॅटवर एक मित्र म्हणून कधीतरीच असे बोलणे होते. त्याच्याकडूनच मग एके दिवशी समजले की अक्षयचे आणि शनायाचे बिनसले. रीतसर घटस्फोट झाला. आणि आता ती आलोकशी, म्हणजे अक्षयच्याच भावाशी लग्न करून त्याची वहिनी झाली आहे. आमचं येडं मात्र अजूनही हळहळत होते. आलोकच्या ऐवजी त्याला का नाही ती मिळाली म्हणून...
या एकूणच अनुभवावरून एक गोष्ट त्या दिवशी समजली...
एखादी देखणी मुलगी दिसली की मुलांची अक्कल नेहमीच कॉफी प्यायला जाते.
एखादी देखणी मुलगी दिसली की
एखादी देखणी मुलगी दिसली की मुलांची अक्कल नेहमीच कॉफी प्यायला जाते.
>>> एकदम बरोबर... पण हेच नैसर्गिक आहे ना..
छान लिहिलेय. अगदी मनापासून
छान लिहिलेय. अगदी मनापासून लिहिल्याचं जाणवलं.
आमचं येडं >>> आपल्या भावना पोहोचल्या.
कॅाफी नावाचे कंटाळवाणे पेय
कॅाफी नावाचे कंटाळवाणे पेय पिण्यानेच अक्कल गंजते.
चा पाजला तर हुशारी येऊन मुलगी पळेल याची मुलांना कल्पना असते. ते टाळतात.
चांगल्या फाईन डाईन हॉटेलात
चांगल्या फाईन डाईन हॉटेलात जाऊन पोहे किंवा शिरा मागवणं याप्रमाणेच जरा बर्या (रोजचा मित्र्/भाऊ कॅटेगरी नसलेल्या) मुलाबरोबर अमृततुल्य किंवा नॉर्मल चा पिणं मुलींना डाऊन मार्केट वाटत असावं.तसेच काही गोष्टी बाहेर प्यायला राखून ठेवलेल्या असतात, ज्या नेहमी प्यायल्या जात नाहीत.
ही दोन्ही कारणे मुलींना मुलाबरोबर बाहेर गेल्यावर १५० रु ची कॉफीच प्रिफर करण्यास प्रवृत्त करत असावीत
एखादी देखणी मुलगी दिसली की
एखादी देखणी मुलगी दिसली की मुलांची अक्कल नेहमीच कॉफी प्यायला जाते.<<
>>आकर्षण अकलेवर मात करत असेल बहुधा
तुम्ही कुठल्या बाजूला आहात
तुम्ही कुठल्या बाजूला आहात यावर बरेच काही अवलंबून असते…
तुम्ही मुलगी आहात तर एकजात सगळे मूलगे एखाद्या फक्त मेकअपच्या बळावर सुंदर बनलेल्या कावेबाज, धूर्त, धोरणी व प्रेम करण्यास पूर्णतय: नालायक मुलीच्या प्रेमात असतात. तुमचे पवित्र, निर्मळ, मनापासून केलेले व सात जन्म एकत्र राहण्याची ग्वाही देणाऱ्या खात्रीपत्रावर शिक्का मारून मिळणारे प्रेम काळ्या कुत्र्यालाही नको असते.
तेच तुम्ही मुलगा असाल तर एकजात सगळ्या पोरी जिमच्या बळावर फुगीर दंड दाखवणाऱ्या, बापाच्या बळावर महागड्या गाड्या उडवणाऱ्या, सीसीडी व स्टारबक्सचीच कॉफी पाजणाऱ्या, शारीर प्रेमावर विश्वास ठेवून दर महिन्याला नवी पोरगी फिरवणार्या मुलाच्या प्रेमात असतात. तुमच्या पवित्र, निर्मळ, शरीरापलिकडे जाऊन केल्या जाणाऱ्या प्रेमाचे कुणालाही कौतुक नसते.
@ साधना, तुमच्या पवित्र,
@ साधना, तुमच्या पवित्र, निर्मळ, शरीरापलिकडे जाऊन केल्या जाणाऱ्या प्रेमाचे कुणालाही कौतुक नसते. >>> ह्या वाक्याच्या अगोदर 'काही अपवाद सोडून' असे लिहीले असते तर बरे झाले असते.
तुमची आयटेम अपवाद होती होय??
तुमची आयटेम अपवाद होती होय?? सॉरी सॉरी, तुमच्या भावनांचा उपमर्द करायचा अजिबात हेतू नव्हता.
कृपया हे तिकडेही जाऊन सांगा. ते बिचारे खूपच गांजलेत. अपवाद असतात, आहेत हे त्यांनाही कळू द्या.
साधना, जबरा लिहीलंय
साधना,

जबरा लिहीलंय
सॊलिड टाईमपास होतोय.
सॊलिड टाईमपास होतोय.
तुमची आयटेम अपवाद होती होय??
तुमची आयटेम अपवाद होती होय?? >>> हे तुम्ही उगाच माझ्यावर वैयक्तिक घेतलंत. तुम्ही सरसकट विधान केलं होतं, त्याला अनुसरून मी लिहिलं होतं. जाऊ द्या.
>>तुमच्या पवित्र, निर्मळ,
>>तुमच्या पवित्र, निर्मळ, शरीरापलिकडे जाऊन केल्या जाणाऱ्या प्रेमाचे कुणालाही कौतुक नसते.
अगदी अगदी +अगणित
अॅक्च्युअली साधना ताईंचा
अॅक्च्युअली साधना ताईंचा प्रतीसाद हा प्रियकर प्रेयसी पलिकडे जाऊन जगातल्या सर्व मुद्द्यांना लागू होतो.

तुम्ही रिपोर्टी असला तर तुमचा मॅनेजर हा 'अत्यंत खडूस, डिमोटिव्हेटिंग, बायस्ड' असतो, तुम्ही मॅनेजर असलात तर तुमची टिम ही 'अत्यंत अन प्रोफेशनल, व्हिजन आणि ज्ञान नसलेली आणि नुसतेच बेनेफिट घेणारी' असते
मस्त आहेत दोन्ही धागे
जर दोघांनाही टाईमपाससाठी
जर दोघांनाही टाईमपाससाठी अफेअर करायचे असेल तर जोडीदार दिसायला आकर्षक असणेच चांगले ना..
आणि आकर्षक दिसणारे सच्चे प्रेम करतच नाही हे सुद्धा गंडलेले लॉजिक आहे.
याचे जितेजागते उदाहरण मी स्वत: आहे.
मी बरेपैकी आकर्षक आहे. मुलींच्या घोळक्यासमोर बसलो की निम्म्या नजरा माझ्याकडे वळवणारच. त्यातल्याच काही दिलखेच नजरा हेरून आजवर माझी बरीच अफेअर झाली आहेत. कुठेही मी खरे प्रेम असल्याचा दावा केला नाही की समोरून तशी अपेक्षा धरली नाही. दोन्हीकडून समाधान झाले की अफेअर संपुष्टात यायचे. मग आयुष्याच्या एका टप्प्यावर मला समजून घेणारी आणि माझ्याशी जुळवून घेणारी मैत्रीण मिळाली. दोघांची एकमेकांशी जुळलेली केमिस्ट्री हिच माझी प्रेमाची व्याख्या आहे. दिसायला आमची जोडी एकमेकांना फार अनुरूप नाही. म्हणजे अरेंज मॅरेज करायचे असते तर आम्ही दोघांनी फोटो बघूनच एकमेकांना नॉट माय टाईप म्हणत नापसंत केले असते. पण ईथे आधी मनं जुळली आणि मग मुलगा-मुलगी आकर्षण आले, जे साहजिकच बॅकफूटला गेले.
एखादी देखणी मुलगी दिसली की
एखादी देखणी मुलगी दिसली की मुलांची अक्कल नेहमीच कॉफी प्यायला जाते.
>>> एकदम बरोबर... पण हेच नैसर्गिक आहे ना..
>>>>>
च्रप्स +786
बिनधास्त कॉफी पिऊन यायची. फक्त त्या सीसीडी मध्येच मुक्काम ठोकायचा नाहीये हे ध्यानात ठेवायचे
अर्चना,
अर्चना,
@ तुमचा किस्सा
यात तुम्ही तर देवाचे आभारच मानायला हवेत ना की तुम्हाला वेळीच कळाले की तुमचा तो कॉफी एके कॉफी पिणाराच मुलगा होता. वाचलात
धाग्याचा विषय आणि शब्दखुणा
धाग्याचा विषय आणि शब्दखुणा छान ठेवले आहे.
शब्दखुणा छान ठेवले आहे >>>
शब्दखुणा छान ठेवले आहे >>> ऊप्स, शब्दखुणात चुकून अक्कल ऐवजी अक्कलदाढ झाले. बहुधा अक्कल टाईप करताना अक्कलदाढ आले आणि त्यावर क्लिक झाले
रचलेली स्टोरी आहे, आणि केवळ
रचलेली स्टोरी आहे, आणि केवळ त्या धाग्यावर मुलींची अक्कल निघाली म्हणून हा अकलेचा शहानपणा मुलांकडूनही घडतो हे दाखवायला धागा काढला होता, बाकी काही नाही
शेवटी प्रेम आहे ते, दोन चारदा माती खाल्याशिवाय त्या शब्दाचा नेमका अर्थ समजतही नाही. कोणाचे स्वस्त्यात पटते तर कोणाला आयुष्यभराचे महागात पडते !
शब्दखुणा छान ठेवले आहे >>>
शब्दखुणा छान ठेवले आहे >>> ऊप्स, शब्दखुणात चुकून अक्कल ऐवजी अक्कलदाढ झाले. बहुधा अक्कल टाईप करताना अक्कलदाढ आले आणि त्यावर क्लिक झाले Happy
नवीन Submitted by अर्चना सरकार on 27 March, 2018 - 02:24
>>>
राणा दा. (चालतय की)
अक्कल दाढ येण्याचा अन हा अक्कल विकला जायचा कालखंड जवळपास सारखाच असतो.
रचलेली स्टोरी आहे,
रचलेली स्टोरी आहे,
<<<< छान लिहिलेय. अगदी मनापासून लिहिल्याचं जाणवलं.
आमचं येडं >>> आपल्या भावना पोहोचल्या. Happy
Submitted by सचिन काळे on 26 March, 2018 - 05:18 >>>>
अरेरे!! उगाच मला तुमच्याबद्दल सहानुभूतीची (सह + अनुभूती) भावना वाटली. माझी फसवणूक झाल्यासारखे वाटतेय.
मी माझी अगोदरची पोस्ट परत घेतोय.
रचलेली स्टोरी आहे, आणि केवळ
रचलेली स्टोरी आहे, आणि केवळ त्या धाग्यावर मुलींची अक्कल निघाली म्हणून हा अकलेचा शहानपणा मुलांकडूनही घडतो हे दाखवायला धागा काढला होता, बाकी काही नाही >>> तुमचे इतर लिखाण जे थोडेफार मी वाचले आहे त्यावरून मला याचा अंदाज आलेला, म्हणून प्रतिसाद देणे टाळले होते.
नाहीतर कोण मुलगी अश्या अक्कलशुन्य माणसाशी मैत्री चालू ठेवेल ईतके होऊन, जो आपल्याशी तासनतास गप्पा मारतो अन दुसरी दिसली की लगेच तिकडे.
नाहीतर कोण मुलगी अश्या
नाहीतर कोण मुलगी अश्या अक्कलशुन्य माणसाशी मैत्री चालू ठेवेल ईतके होऊन, जो आपल्याशी तासनतास गप्पा मारतो अन दुसरी दिसली की लगेच तिकडे.
>>>>>>>>>>>
एक ढूंढो हजार मिलते है.. या प्रेमाच्या बाजारात शेकडो प्रकारचे हजारो नमुने असतात.. गुंतलेल्या मनाला लॉजिक कळत नाही
मला तो किस्सा खराखोटा काहीच वाटला नाही. किंबहुना त्याने काही फरक पडत नाही. म्हणजे त्यांच्याबाबत खोटा असला तरी कित्येक जणांबाबत वा जणींबाबत खरा असेलच.
मला तो किस्सा खराखोटा काहीच
मला तो किस्सा खराखोटा काहीच वाटला नाही. >>> तुला वाटेलचं कसा रे ?

गुंतलेल्या मनाला लॉजिक कळत
गुंतलेल्या मनाला लॉजिक कळत नाही
>>> 100% बराबर.
गुंतलेल्या मनाला लॉजिक कळत
गुंतलेल्या मनाला लॉजिक कळत नाही
>>> 100% बराबर. >>>>++१११११
मला तो किस्सा खराखोटा काहीच
मला तो किस्सा खराखोटा काहीच वाटला नाही. >>> तुला वाटेलचं कसा रे ?>>>>
प्रेयसी निवडणे म्हणजे अक्कल
प्रेयसी निवडणे म्हणजे अक्कल मुळातच नसल्याचे लक्षण आहे. त्या ऐवजी अभ्यास करावा भरपूर पैसे कमवावेत, मुली आपोआप मिळतील अशी आशा करावी!
(प्रेयसी निवडण्याचे प्रयत्न असफल झाल्यावर झालेला साक्षात्कार)
त्या ऐवजी अभ्यास करावा भरपूर
त्या ऐवजी अभ्यास करावा भरपूर पैसे कमवावेत, मुली आपोआप मिळतील अशी आशा करावी!
>>>
दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत.... असे न झाल्यास मिळवली
Pages