जुनी गोष्ट आहे. आज या धाग्याने ( https://www.maayboli.com/node/65653 ) खपली काढली म्हणून लिहून काढावीशी वाटली. आठवेल तसे जमेल तसे लिहिलेय. प्लीज व्याकरन सुद्धलेकण तपासू नये.
आमचा छान ग्रूप होता फेसबूकवर. सर्वांची आवड एकच, नवीन नवीन मराठी मित्रमैत्रीण बनवणे आणि आधुनिक मराठी वाचन करणे. अश्यात बरीच जुळवाजुळवी प्रेमप्रकरणे ओघानेच आली. माझी एका संजय नावाच्या मुलाशी छान गट्टी जमली होती. ग्रूव्यतिरीक्त पर्सनल चॅट वर, तसेच फोन नंबर एक्स्चेंज झाल्यावर आम्ही खूप गप्पा मारायचो. चॅट तर रात्र रात्र जागून चालायची. फोनवरही रोजचेच दुपारचे बोलणे असायचे. न थकता, न कंटाळता, एकमेकांशी नॉनस्टॉप बोलू शकायचो आम्ही. तो आणखीही कोणा मुलीशी ईतका बोलत असेल का याची कल्पना नाही मला. पण शक्यता कमीच.
मग एके दिवशी आमच्या फेसबूक ग्रूपचे जीटूजी (स्नेहसंमेलन) ठरले. आम्ही ठरवले असते तर आम्ही एकमेकांना कधीही भेटू शकलो असतो. एकानेही विचारले असते तरी समोरचा त्याला नाही म्हणाला नसता. पण तो आपला नेहमीचा मराठमोळा संकोच आड आला. मग गेटटूगेदरलाच आता भेटूया म्हटले. बरीचशी हूरहूर आणि ईकडचं तिकडचं बरंच काही. मनात सारं काही दाटून आले होते त्या भेटीच्या आधी. पण ती स्नेहसंमेलनातील भेट आमच्यातील गोड नात्याचा शेवट ठरणार होती याची मला कल्पना नव्हती.
त्या दिवशी तो माझ्याशी काही वाईट वागला नाही. पण काही स्पेशलही वागला नाही. ईतर मुलींपैकीच मी एक होते त्याच्यासाठी. कारण स्पेशल कोणीतरी दुसरीच होती. ग्रूपमधील सर्वात हॉट मुलगी. जिच्यासमोर सारी मुले कूल बनायला बघायची. ती शनाया. जिच्यासमोर मी ठरले राधिका.. छे हो, आपट्यांची नाही. तशी असते तर प्रश्नच नव्हता. मग ती सारी मुले आपली अक्कल विकून माझ्या मागे लागली असती.
पण राहिलंच ...
त्यानंतरही आमचे चॅटवरचे बोलणे तसेच चालू राहिले. पण आमचा संजूबाबा आता त्या शनायाचेच गोडवे गाऊ लागला होता. तिने मात्र एकूण एक मुलांना भुरळ घातली होती. त्या दिवशी ती प्रत्येकाशी हसून बोलली होती. जणू काही प्रत्येकाच्या भावनांचा तिने स्विकार केला होता. प्रत्येकाला तिच्यात आता आपली प्रेयसी दिसू लागली होती. सर्वांमध्ये चढाओढ लागली होती.
ती देखील तितकीच हुशार. प्रत्येकासोबत ती कॉफी डेटला जाऊन आली. प्रत्येकाला हे समजत आणि माहीत असूनही वेड्यासारखे आपापसात स्पर्धा करत होते. त्यात एक आमचेही येडे लागले होते.
मग त्यातील एकाला ती मिळाली. अक्षयला. आमच्या ग्रूपमधील सर्वात पैसेवाल्या मुलाला. बहुधा तिने प्रत्येकासोबत कॉफी पिताना याचाच अंदाज घेतला असावा. प्रत्येकाच्या खिश्याचा. ज्याचा खिसा मोठा, तिथेच तिचे प्रेम मावले. ज्याने ते प्रेम मिळवले त्यालाही याच गोष्टीचे कौतुक की जिच्यामागे सर्वांनी नंबर लावले तिला मी मिळवले. पण तिने आपल्यात नक्की काय बघितले, तिचे आपले काय जुळले याचा जराही विचार नाही. आमच्या येड्याने तरी काय केले होते म्हणा. जिथे सारे काही मस्त जुळले होते त्यावर बोळा फिरवून मृगजळाच्या मागे धावला होता. आणि बघितले तरी काय होते, तर जास्तीचे मादक सौंदर्य आणि त्याला साजेश्या अदा.
काळ लोटला, मी त्यातून सहज बाहेर पडले, लाईफमध्ये मूव ऑन झाले. संजयशी चॅटवर एक मित्र म्हणून कधीतरीच असे बोलणे होते. त्याच्याकडूनच मग एके दिवशी समजले की अक्षयचे आणि शनायाचे बिनसले. रीतसर घटस्फोट झाला. आणि आता ती आलोकशी, म्हणजे अक्षयच्याच भावाशी लग्न करून त्याची वहिनी झाली आहे. आमचं येडं मात्र अजूनही हळहळत होते. आलोकच्या ऐवजी त्याला का नाही ती मिळाली म्हणून...
या एकूणच अनुभवावरून एक गोष्ट त्या दिवशी समजली...
एखादी देखणी मुलगी दिसली की मुलांची अक्कल नेहमीच कॉफी प्यायला जाते.
हाड ही इब्लीस यांची शैली कॉपी
हाड ही इब्लीस यांची शैली कॉपी करून फोकस तिकडे शिफ्ट करायचा विचार आहे का सर ?

सर तुम्ही स्त्री अवस्थेतले फोटो टाकल्यापासून आणि कुणीतरी तुमची गंमत केल्यापासून या आयडीने खूप शिवीगाळ करत सुटलाय बरं का.
Pages