खूप दिवसांनी फेसबूक प्रोफाईलवरची धूळ झटकत, विस्मरणात गेलेला पासवर्ड आठवत, डिअॅक्टीवेट झालेल्या प्रोफाईलला अॅक्टीवेट केले. प्रोफाईलमध्ये कधीकाळी मौजमजेसाठी जमा केलेले सवंगडी कसे आहेत, त्यांची खुशाली घेऊया म्हणून थोडीफार चाळाचाळ केली. तर दहापैकी सात जणांचे प्रोफाईल पिक्चर सप्तरंगी रंगात नटलेले दिसले. फेसबूकवरचेच एखादे फॅड म्हणत इग्नोर करावेसे वाटले, पण उथळ गोष्टींना थारा न देणार्या काही मित्रांनी देखील या ऊपक्रमात सहभाग घेतला होता ते पाहून हे काहीतरी स्पेशल आहे असे जाणवले. चारचौघांना विचारले तर कोणालाही ठामपणे काही सांगता आले नाही. काय ते प्राईड प्राईडसाठी म्हणत थातुर मातुर उत्तर दिले. थोडीफार शोधाशोध करता करता हाताला खालचा फोटो, नेमके कसले प्राईड आणि आपल्या प्रोफाईलला रंगीन करणारे नक्की कश्याचे समर्थन करत होते ते समजले. अर्थात जाणतेपणी वा अजाणतेपणी, दिखावा करायला वा मनापासून हे त्यांनाच ठाऊक.
तर यामागचे कारण असे की नुकतेच अमेरीकेत समलिंगी विवाहांना कायद्याने मान्यता मिळाली. तर ज्यांचा या कायद्याला पाठिंबा आहे त्यांनी तो दर्शवायला आपले प्रोफाईल पिक्चर रंगीत पट्ट्यांत रंगवायचे होते.
सेक्शुअल ओरिएंटेशन - Sexual orientation (मराठीत काय म्हणतात देव जाणे)
पण हा शब्द मला पहिल्यांदा ऑर्कुट प्रोफाईलवर समजला. त्यातील नाव-गाव-फळ-फूल माहितीत आपापले सेक्शुअल ओरिएंटेशन सुद्धा लिहायचे होते. गंमतच वाटली होती. आणि त्यापेक्षा जास्त गंमत तेव्हा वाटली होती जेव्हा काही महाभागांनी आम्ही "स्ट्रेट" आहोत असे प्रोफाईलमध्ये नमूद केले होते. आता ही काय सांगायची गोष्ट आहे का?
.. पण बघता बघता दिवस बदलले, आणि आता ही सांगायची गोष्ट असू शकते असे माझे मतपरिवर्तन झालेय.
असो, तर मग मला माझ्या त्या सर्व फेसबूक बंधूंची फिरकी घेण्याचा मोह झाला.
एकाला सहज विचारले, काय रे तुझे सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे?
तर गडी चिडला!
लगेच मला समजून चुकले की याने आपले प्रोफाईल पिक अजाणतेपणे रंगवले आहे.
त्याला म्हटले काही नाही झमन्या, अर्ध्या गावाची तुला माहीती नसते आणि सगळीकडे पुढे पुढे करण्याची घाई असते.
माहिती देताच त्याने घाईघाईत आपले प्रोफाईल पिक्चर बदलले.
हाच प्रयोग आणखी दोघाचौघांवर केल्यावर एक जण असा निघाला ज्याला यामागचे कारण माहीत होते. तसेच आपण अश्या संबंधांना आणि त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याला सपोर्ट करतो असेही तो म्हणाला.
त्याला देखील मी विचारले, "खरेच नुसता सपोर्ट करतोस की तू देखील त्यातलाच एक आहेस." .. तर हा देखील चिडला! जरा जास्तच चिडला.
थोडक्यात त्याचा सपोर्ट किती पोकळ होता ते मला समजून चुकले. जे स्वत:ला कोणी समजले तर त्याला ती एक शिवी वाटते अश्यांना तो कसा मनापासून सपोर्ट करणार होता.
पुढे दोनेक दिवसातच हळूहळू काही प्रोफाईल पिक्चर बदलताना दिसले. बहुतेक खरे कारण समजल्याने काही जणांनी ओशाळून बदलले असावेत, वा काही जणांनी दाखवला तेवढा सपोर्ट पुरेसा म्हणत बदलले असावेत. तर काही जणांचे प्रोफाईल पिक्चर आजही रंगीत पट्ट्यात दिसत आहेत. खंबीर पाठिंबा!
अर्थात, मला स्वत:ला देखील अजून ठामपणे मत बनवता येत नाहीये की या प्रकारचे संबंध योग्य की अयोग्य? नैसर्गिक की अनैसर्गिक? आजार, विकृती की फक्त एक प्रकारचे सेक्शुअल ओरिएंटेशन..
पण याला किमान अंश भर सपोर्ट करणार्यांना मला एक विचारावेसे वाटते, आपल्या देशात आजही बरेच ठिकाणी आंतरजातीय वा आंतरधर्मीय प्रेमविवाह म्हणजे फार मोठा सामाजिक अपराध ठरवला जातो. या अपराधाची शिक्षा तो समाजच देतो. वेळप्रसंगी पोटच्या पोरांना ठार मारण्यापर्यंत मजल जाते. तर असल्या समलिंगी विवाहांना समर्थन देण्याअगोदर आंतरजातीय प्रेमविवाहांना समर्थन देत या देशातील प्रत्येकाला त्याच्या मर्जीने विवाह करता यावा यासाठी चळवळ उभारावी असे नाही का वाटत?
ज्यांची चित्रे टाकली आहेस
ज्यांची चित्रे टाकली आहेस त्यांना माहिती आहे का तू त्यांच्या चित्रांचा वापर केला आहेस? अॅडमिन येतील बरं इथे.
सर्च करताच ती गूगल ईमेजला वरच
सर्च करताच ती गूगल ईमेजला वरच सापडली. हे चालत नसेल तर उडवतो. तसेही ईंग्लिश मुले आहेत, मायबोली हुडकत का येतील
ऋन्मेऽऽष, आपल्या मना मध्ये
ऋन्मेऽऽष,
आपल्या मना मध्ये शंका आहेत. आणि आपण आपले मत अजुन पुर्णपणे बनवलेले नाही. तसेच एका गोष्टीचा संबंध दुसरीशी लावायची फार घाई झालेली दिसतेय. सेक्शुअल ओरिएंटेशन हा कुठलाही आजार नाहीये. प्रोफाईल पिक रंगवण्यामागचे कारण म्हणजे आम्ही त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करतो. कोणालाही आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहोत तिच्याशी लग्न करायचा अधिकार आहे असा कायदा झालेला आहे. आपला "खरेच नुसता सपोर्ट करतोस की तू देखील त्यातलाच एक आहेस." हा प्रश्न खुप चुकीचा वाटतो कारण यामधून तुम्हाला कोणाची तरी टिंगल करायची आहे हे ध्वनीत होते. तसेच तुमचे हे वर्तन एखाद्या bullying करणार्या व्यक्तीसारखे वाटते. ज्यांना सपोर्ट करायचा आहे ते करतील पण आपल्या पोटात का दुखते आहे ते कळाले नाही.
आता आपल्या शेवटच्या पॅरा मध्ये विचारलेला प्रश्न. त्यातली "समलिंगी विवाहांना समर्थन देण्याअगोदर .." ही ओळ खटकली. कशाच्या अगोदर का ? एक साथ का नाही. जर तुम्ही तशी काही लढाई उभारली तर आम्ही त्यालाही समर्थन देऊ. तुमची स्वतःची असे कुठले कार्य सुरू करण्याची तयारी आहे का ? उगीच दुसर्यांच्या भावनांची टिंगल करण्यापेक्षा एखादे कार्य सुरू करून त्याबद्दल समर्थन मागितले तर माबो वरील आणि बरीच इतर माणंसं तुम्हाला मदत करतील.
तसेही ईंग्लिश मुले आहेत,
तसेही ईंग्लिश मुले आहेत, मायबोली हुडकत का येतील >> तरीही तुम्हाला वापर करायची परवानगी नाही ना!
धनि > +१ * डोंट फीड ट्रोल्स.
धनि > +१
* डोंट फीड ट्रोल्स.
धनि हो, माझ्या मनामध्ये शंका
धनि हो, माझ्या मनामध्ये शंका आहेत, आणि मला जाणवले की या शंका ईतर बरेच जणांच्या मनात आहेत,
मुळात हे एखाद्याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे की नाही हे देखील ठामपणे स्वताला माहीत नसणारेही आपण कोणाच्यातरी व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करतोय हे दाखवायचे म्हणून सपोर्ट करत आहेत असेही आढळले. अश्यांना विचार करायला लावावा हाच हेतू या धाग्यामागे.
आपला "खरेच नुसता सपोर्ट करतोस की तू देखील त्यातलाच एक आहेस." हा प्रश्न खुप चुकीचा वाटतो कारण यामधून तुम्हाला कोणाची तरी टिंगल करायची आहे हे ध्वनीत होते. >>>> येस्स, माझा मित्र होता तो, टिंगलच करत होतो. बाकी एखाद्याला तू त्यातलाच आहेस का विचारणे हे निव्वळ चौकशी नाही तर टिंगल करणेच असते हे आपणही सहज गृहीत पकडले तर
ईंग्लिश मुले आहेत, मायबोली हुडकत का येतील >> हे गंमतीत लिहिलेले वाक्य आहे.
त्या मुलांचा फोटो ज्यांना माहीत नाही त्यांना विषय समजायला सोपा जावा म्हणून टाकलेला एवढेच.
मला कॉपीराईतचे वगैरे नियम फारसे ठाऊक नाहीत, नियमात बसत नसतील तर तसे कन्फर्म होताच उडवेन, वा एडमिनही उडवतीलच
हा धागा खिजावण्याचा उद्देश
हा धागा खिजावण्याचा उद्देश ठेवून >>> नक्की कोणाला खिजवण्याचा उद्देश ठेवून (समलिंगी संबंध ठेवणार्यांना की त्यांना समर्थन करणार्यांना) हे क्लीअर केलेत तर यावर उद्या बोलता येईल. कारण तसा हेतू नाहीच आहे. तुर्तास शुभरात्री.
ऋन्मेऽऽष >> एक तर त्यांचे
ऋन्मेऽऽष >> एक तर त्यांचे फोटो टाकून चूक केली आहेस आणि वर त्याचे स्पष्टीकरण काय देतोयस? एवढेच आहे तर तुझाच फोटो असा रंगवून टाक की उदाहरण म्हणून..
धनि +१
या विषयावर माबोवर आधी चर्चा झालेली आहे आणि तुला गुगल केल्यावर पण बरीच माहिती मिळेल..
फोटोची लिंक दिली तर नियमभंग
फोटोची लिंक दिली तर नियमभंग होणार नाही असे वाटते. हा विषय गंभीर आहे पण धाग्याचा सूर बघता इथे काही वाचण्यासारखे असणार नाही. मायबोलीवर ह्यापूर्वी ह्या विषयावर चांगली चर्चा झालेली आहे. शोधल्यास नक्की सापडेल.
मला व्यक्तीशः अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा marriage equality चा निर्णय फार आनंददायी आणि क्रांतिकारक वाटतो आणि ह्या निर्णयाचे महत्व जाणण्यासाठी तुमचे sexual orientation काय आहे ह्या गोष्टीने काही फरक पडतो असे वाटत नाही. असो. अजून एका हुकमी शतकी धाग्यासाठी अभिनंदन!
तू त्यातलाच आहेस का विचारणे
तू त्यातलाच आहेस का विचारणे हे निव्वळ चौकशी >> रून्मेष, राग मानू नकोस पण निव्वळ चौकशी नाही हा शुद्ध भोचकपणा आहे. पगार, वय, प्रेम-लैगिकता निगडीत गोष्टी कुणी कुणाला विचारू नये.
ऋन्मेश, दुसर्यांचे रंगवलेले
ऋन्मेश,
दुसर्यांचे रंगवलेले फोटो परवानगीशिवाय वापरणे योग्य नाही. तसेच "खरेच नुसता सपोर्ट करतोस की तू देखील त्यातलाच एक आहेस. .. " हे चौकशी म्हणून काय किंवा चेष्टा म्हणून काय विचारणे योग्य नाही. त्यावरुन कुणी चिडले याचा अर्थ सपोर्ट पोकळ होतो असा कसा लावला? तुम्ही त्या व्यक्तीच्या खाजगी बाबीत नाक खुपसले म्हणून राग आला असे असू शकते ना ?
>>समलिंगी विवाहांना समर्थन देण्याअगोदर आंतरजातीय प्रेमविवाहांना समर्थन देत या देशातील प्रत्येकाला त्याच्या मर्जीने विवाह करता यावा यासाठी चळवळ उभारावी असे नाही का वाटत>>
'हे देण्याअगोदर' कशाला? समाजमन तयार करायचे तर मग त्यात भेदभाव कशाला? तसेही भारतात कायद्याने आंतरजातीय/धर्मिय विवाहाला अटकाव नाहीये. मात्र सेक्शन ३७७ अंतर्गत समलिंगी संबंध हा गुन्हा होतो. अगदी कोर्टात केस लावून प्रॉसिक्यूट करणे होत नसले तरी कायद्याचा धाक दाखवून त्रास देणे होतेच. त्यामुळे अमेरीकेच्या सुप्रीक कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करुन सोशल मेडीयाद्वारे जर का भारतातले नागरीक ब्रिटिशकालीन कायद्यात बदल होण्यासाठी , या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यात गैर काय? चळवळ उभारायचीच असेल तर हे आधी ते नंतर असे कशाला? प्रत्येकालाच आपल्या पसंतीच्या जोडीदाराशी लग्न करायचा अधिकार हवा. आंतरजातीय्/धर्मिय विवाहाला कायद्याचा आधार आहे मात्र गे रिलेशनशिपला कायद्याचा आधार तर नाहीच उलट बडगा उगारुन त्रास दिला जातो.
खरं आहे. फेसबुकने सोय काय
खरं आहे. फेसबुकने सोय काय करुन दिली, हि क्रेझ (प्रोफाइल रंगवण्याची) वणव्यासारखी पसरली; हौशे-नवशे-गवशे सगळ्यांनी यात उड्या टाकल्या...
खरेच नुसता सपोर्ट करतोस >> मी
खरेच नुसता सपोर्ट करतोस
>>
मी पण विचारले ... आमचं मित्रगण समजून उमजून सपोर्ट करणाऱ्यातले निघाले!
बाकी ह्यात कसला भोचकपणा? जेव्हा समोरचा सरळसरळ त्याचं मत आणि विचार फोटो टाकून व्यक्त करत आहेत तर आपण असं विचारण्यात हरकत काय? किंबहुना, ज्यांनी तसे फोटो न विचार करता टाकलेत त्यांनी ऋन्मेऽऽषच्या प्रश्नानंतर फोटो बदलले तर नंतर त्याच्या नातेवाईकांचे आणि इतरांचे अजाणतेपणे होणारे गैरसमज टळतील.
माझे बाबा अशी सप्तरंगी मोठ्ठी
माझे बाबा अशी सप्तरंगी मोठ्ठी छत्री वापरतात. त्यांना विचारलं पाहिजे ते कोणाला सपोर्ट करतात ते
मस्तं! मी शक्यतो फेबु वाचत
मस्तं!
मी शक्यतो फेबु वाचत नसल्याने हा प्रकार माहित नव्हता.
हल्लीच नवरा म्हणाला की त्याचे सगळे मित्र सप्तरंगी प्रोफाईल पिक टाकतायत आणि त्यांना त्याचा अर्थही माहित नाही.
लोकांना वाटतंय हे सप्तरंगी डीपी टाकायचं लेटेस्ट फॅड आहे तर आपणही टाकूया.
त्याने एकदोन मित्रंना जेव्हा डायरेक्ट विचारलं 'सो यू आर सपोर्टींग गे मूवमेंट' तर त्या लोकांना राग आला.
मग जेव्हा त्यांच्या डीपीचा अर्थ समजावून सांगितला तेव्हा गपचूप बदलून टाकलं त्यांनी .
काल परवा परत सगळ्यांचे डिपी पूर्ववत होते म्हणे.
नवरा विचारत होता, 'तुमच्या माबोवर यावरचा धागा निघाला की नाही' तर मी म्हटलं नाही निघाला.
मला माहितच नव्हतं हे प्रकरण.
तेव्हाच धागा लवकरच निघेल असं वाटलं होतं आणि ऋन्मेषच काढेल याची खात्रीपण!
>>>पण याला किमान अंश भर
>>>पण याला किमान अंश भर सपोर्ट करणार्यांना मला एक विचारावेसे वाटते, आपल्या देशात आजही बरेच ठिकाणी आंतरजातीय वा आंतरधर्मीय प्रेमविवाह म्हणजे फार मोठा सामाजिक अपराध ठरवला जातो. या अपराधाची शिक्षा तो समाजच देतो. वेळप्रसंगी पोटच्या पोरांना ठार मारण्यापर्यंत मजल जाते. तर असल्या समलिंगी विवाहांना समर्थन देण्याअगोदर आंतरजातीय प्रेमविवाहांना समर्थन देत या देशातील प्रत्येकाला त्याच्या मर्जीने विवाह करता यावा यासाठी चळवळ उभारावी असे नाही का वाटत?<<<
ह्या दोन गोष्टी एकमेकींशी लिंक केल्यासारख्या मांडण्याचे कारण समजले नाही. एक विषय मानवनिर्मीत भेदांबाबत आहे (जात / धर्म) आणि दुसरा नैसर्गीक घडणीबाबत (लैंगिक कल, लैंगीक सहजप्रवृत्तीबाबत).
दोन्हींमध्ये काहीही साम्य नाही. तेव्हा हा जर तुमच्या लेखाचा मुख्य मुद्दा असेल तर सप्तरंगी छायाचित्रे देणे ह्या मुद्यावरून लेख सुरू होण्याचे कारण समजत नाही.
दुसरे म्हणजे, एखाद्या वृत्तपत्रातील बातमीच्या शीर्षकासारखे धाग्याचे शीर्षक सनसनाटी दिलेले आहेत. मूळ धागा त्या शीर्षकावर बेतलेलाही नाही आहे. म्हणजे तुम्ही येथे कोणाला त्यांचा लैंगीक कल काय आहे, तसाच का आहे वगैरे विचारलेले नाही आहेत. तेव्हा शीर्षक पटले नाही.
अवांतर - शोध घेतल्यावर समजले की ओरिएन्टेशनला कल, प्रवृत्ती, अभिमुखता, दिशानिर्धारण असे काही मराठी पर्यायी शब्द जालावर दिले गेलेले आहेत.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
सेक्शुअल ओरीएंटेशनला मराठीत
सेक्शुअल ओरीएंटेशनला मराठीत 'लैंगिकता' म्हणता येइल.
<<बाकी एखाद्याला तू त्यातलाच
<<बाकी एखाद्याला तू त्यातलाच आहेस का विचारणे हे निव्वळ चौकशी नाही तर टिंगल करणेच असते हे आपणही सहज गृहीत पकडले तर स्मित>>
-------- तु त्यातलाच आहे अशी चौकशी करणेच मुळात चुकीचे आहे. तुम्ही कुठल्या वातावरणात वाढला आहात यावर तुमच्या निती नियमान्चे (चौकशीचे) परिघ ठरते.
तुमचा मित्र असला म्हणुन त्याच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला आहे ? किव्वा असा प्रश्न विचारण्याराला निखळ मैत्री म्हणता येणार नाही.
प्राईडफ्लॅगमधील प्रत्येक
प्राईडफ्लॅगमधील प्रत्येक इंग्रजी शब्दाचा मराठितून अर्थ कळेल का?
मैत्रीबाबतच्या भारत आणि इतर
मैत्रीबाबतच्या भारत आणि इतर प्रगत वगैरे देशांमधील व्याख्या वेगळ्या असू शकतात. ज्या प्रश्नांना तिकडे भोचकपणा समजले जाऊ शकेल ते इकडे अगदी कोणीही कोणालाही विचारते, त्यावर उत्तरेही मिळू शकतात, त्यावर नाते घट्ट झाल्यानंतर पुढे कधीतरी मैत्रीपूर्ण थट्टासुद्धा होऊ शकते आणि मानसिक आधारसुद्धा दिला जाऊ शकतो. त्यात चूक / बरोबर असे कोणीच काही ठरवण्याचे कंत्राट घेऊ नये असे वाटते.
इकडे तुम्हाला मुले किती, दोन मुलांत इतके अंतर कसे, मिस्टरांचे वय इतके जास्त कसे, तुम्हाला नेहमी नाईट शिफ्टच का असते, तुम्ही अशी भडक रंगसंगतीच नेहमी वापरता का असे काहीही प्रश्न अजूनही विचारले जातात. ऐकणार्याला कदाचित त्या प्रश्नांचा त्रास अहोत असेलही, पण असे प्रश्न विचारले जाणे ह्या संस्कृतीत सर्रास घडते हे त्यालाही माहीत असते. नाक खुपसू नये हे ठीकच, पण गरीबी असलेल्या आणि सुबत्ता नसलेल्या ह्या देशात अश्या भोचक माणसांची ऐनवेळी प्रचंड व वैयक्तीक / भावनिक स्वरुपाची मदत होत असते, होऊ शकत असते. सुबत्ता असलेल्या ठिकाणी आणि माणसेच कमी असलेल्या ठिकाणी ऐन प्रसंगी सरकारी यंत्रणा धावून येऊ शकतात. पण भारतासारख्या ठिकाणी अनेक गोष्टी जवळपासची माणसेच ऐनवेळी करताना दिसतात.
तेव्हा एखादी संस्कृती ह्या विशिष्ट कारणासाठी टीकेस पात्र आहे असा निष्कर्ष पटत नाही.
ही माझी मते आहेत. धाग्याशी लांबून संबंधीत असली तरी काही प्रतिसादांशी जवळून संबंधीत आहेत.
त्याला देखील मी विचारले,
त्याला देखील मी विचारले, "खरेच नुसता सपोर्ट करतोस की तू देखील त्यातलाच एक आहेस." .. तर हा देखील चिडला! जरा जास्तच चिडला.>>>
सपोर्ट करणारा त्यातलाच असणे गरजेचे आहे का???
माझा आंतर जातीय / धर्मिय विवाहाला सपोर्ट आहे पण माझा नवरा माझ्याच जातीचा आहे. सपोर्ट दाखवण्यासाठी मी मुद्दाम दुसर्या जातीचा किंवा धर्माचा शोधायला हवा होता का?
दुसरे म्हणजे, एखाद्या वृत्तपत्रातील बातमीच्या शीर्षकासारखे धाग्याचे शीर्षक सनसनाटी दिलेले आहेत. मूळ धागा त्या शीर्षकावर बेतलेलाही नाही आहे. म्हणजे तुम्ही येथे कोणाला त्यांचा लैंगीक कल काय आहे, तसाच का आहे वगैरे विचारलेले नाही आहेत. तेव्हा शीर्षक पटले नाही.>>> बरोबर
'गे'ला एवढे रंगीबेरंगी रंग
'गे'ला एवढे रंगीबेरंगी रंग का? आणि हेट्रो फक्त कृष्णधवल रंगात का? यातून काही सूचित करायचं असतं का?
'गे'ला एवढे रंगीबेरंगी रंग
'गे'ला एवढे रंगीबेरंगी रंग का? आणि हेट्रो फक्त कृष्णधवल रंगात का? यातून काही सूचित करायचं असतं का?
>>
असेच म्हणते.
'गे'ला एवढे रंगीबेरंगी रंग
'गे'ला एवढे रंगीबेरंगी रंग का? आणि हेट्रो फक्त कृष्णधवल रंगात का?
>>
अडाणी परंपरांना कवटाळून बसणारे ... वगरे वगरे ... अजूनही जुन्या काळात (कृष्णधवल छायाचित्रांच्या) जमान्यात असणारे लोक्स
असा मी माझा अर्थ काढला.
लिंबूकाकांनी विचारात
लिंबूकाकांनी विचारात पाडलं!
ढोबळमानाने-
सेक्स- लिंग- शरीररचनेवर आधारित
लैंगिकता- विचार- मानसिकतेवर आधारित
आता इथे
१.ट्रान्सजेंडर- शरीररचना एक , स्वतःला समजतात वेगळेच. उदा. एखाद्या पुरुषाला, पुरुषाचेच सगळे अवयव आणि हार्मोन्स असूनही स्वतः स्त्री असल्याचे वाटत रहाणे किंवा आपण चुकून दुसर्या लिंगाच्या शरीरात जन्मलोय असे वाटणे.
२. गे- पुरुष अवयव, हार्मोन्स असूनही फक्त इतर पुरुषांविषयीच शारीरिक आकर्षण आणि संबंध
३.लेस्बियन- स्त्री अवयव आणि हार्मोन्स असूनही इतर स्त्रीयांविषयीच शारीरिक आकर्षण आणि संबंध
४. बायसेक्श्युअल- एकाच लिंगाचे हार्मोन्स्/अवयव असूनही स्त्री -पुरूष दोघांविषयीही शारिरीक आकर्षण असणे/ दोन्हींशी शारीरिक संबंध असणे
५. पॅनसेक्श्युअल- स्त्री/पुरुष/ ट्रान्सजेंडर / इंटरसेक्स अश्या कुठल्याही ओरिएंटेशन आणि लिंग असलेल्या माणसाशी संबंध( प्राण्यांशी नाही)
६. असेक्श्युअल- स्त्री/पुरुष/ ट्रान्सजेंडर्/इंटरेक्स अश्या कुणाबद्दलही शारिरीक आकर्षण न वाटणे. संबंध न ठेवणे.
७. इंटरसेक्स- जन्मतः स्त्री / पुरुष असे दोन्ही अवयव(बाह्य्/आंतर) असणे ,दोन्ही हार्मोन्स असणे
८. जेंडरक्विअर- स्वतःच्या लैंगिकतेविषयी खात्री नसणे, नक्की कुठल्या लिंगाचे लोक शारीरिक जोडीदार म्हणून आवडतात याची खात्री नसणे.
९.हेटरो- शारीरिक/ मानसिक रित्या एकच (स्त्री किंवा पुरुष यांपैकी ) असणार्याला विरुद्ध लिंगाचे आकर्षण वाटणे आणि केवळ विरुद्ध लिंगीच संबंध ठेवणे.
>>तुमचे सेक्शुअल ओरिएंटेशन
>>तुमचे सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे>>>>
तुम्हाला काय करायचय?
>>तुमचे सेक्शुअल ओरिएंटेशन
>>तुमचे सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे<<
समोरच्या व्यक्तीमधे तुम्हाला सेक्शुअल इंटरेस्ट आहे असा या प्रश्नाचा अर्थ होतो.
तसे नसेल तर हा निव्वळ भोचकपणा आहे.
इन एनी केस या प्रश्नाचे चीड आली कुणाला तर तो प्रश्न विचारणार्याचाच दोष आहे.
साती, मला कधी कधी फार वाईट
साती, मला कधी कधी फार वाईट वाटतं.
इथल्या सगळ्या गोंधळात तुझ्या फार छान माहिती देणार्या पोस्टी खुप सहज दुर्लक्षित होतात
बाकी, स्वाती२, जिज्ञासा + करोडो!
हेमाशेपो
घसरण वेगात चालू आहे.
घसरण वेगात चालू आहे.
साती - छान माहिती...
साती - छान माहिती...
Pages