तुमचे सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 July, 2015 - 16:09

खूप दिवसांनी फेसबूक प्रोफाईलवरची धूळ झटकत, विस्मरणात गेलेला पासवर्ड आठवत, डिअ‍ॅक्टीवेट झालेल्या प्रोफाईलला अ‍ॅक्टीवेट केले. प्रोफाईलमध्ये कधीकाळी मौजमजेसाठी जमा केलेले सवंगडी कसे आहेत, त्यांची खुशाली घेऊया म्हणून थोडीफार चाळाचाळ केली. तर दहापैकी सात जणांचे प्रोफाईल पिक्चर सप्तरंगी रंगात नटलेले दिसले. फेसबूकवरचेच एखादे फॅड म्हणत इग्नोर करावेसे वाटले, पण उथळ गोष्टींना थारा न देणार्‍या काही मित्रांनी देखील या ऊपक्रमात सहभाग घेतला होता ते पाहून हे काहीतरी स्पेशल आहे असे जाणवले. चारचौघांना विचारले तर कोणालाही ठामपणे काही सांगता आले नाही. काय ते प्राईड प्राईडसाठी म्हणत थातुर मातुर उत्तर दिले. थोडीफार शोधाशोध करता करता हाताला खालचा फोटो, नेमके कसले प्राईड आणि आपल्या प्रोफाईलला रंगीन करणारे नक्की कश्याचे समर्थन करत होते ते समजले. अर्थात जाणतेपणी वा अजाणतेपणी, दिखावा करायला वा मनापासून हे त्यांनाच ठाऊक.

तर यामागचे कारण असे की नुकतेच अमेरीकेत समलिंगी विवाहांना कायद्याने मान्यता मिळाली. तर ज्यांचा या कायद्याला पाठिंबा आहे त्यांनी तो दर्शवायला आपले प्रोफाईल पिक्चर रंगीत पट्ट्यांत रंगवायचे होते.

gay colour code 1.jpggay colour code.jpg

सेक्शुअल ओरिएंटेशन - Sexual orientation (मराठीत काय म्हणतात देव जाणे)
पण हा शब्द मला पहिल्यांदा ऑर्कुट प्रोफाईलवर समजला. त्यातील नाव-गाव-फळ-फूल माहितीत आपापले सेक्शुअल ओरिएंटेशन सुद्धा लिहायचे होते. गंमतच वाटली होती. आणि त्यापेक्षा जास्त गंमत तेव्हा वाटली होती जेव्हा काही महाभागांनी आम्ही "स्ट्रेट" आहोत असे प्रोफाईलमध्ये नमूद केले होते. आता ही काय सांगायची गोष्ट आहे का?

.. पण बघता बघता दिवस बदलले, आणि आता ही सांगायची गोष्ट असू शकते असे माझे मतपरिवर्तन झालेय.

असो, तर मग मला माझ्या त्या सर्व फेसबूक बंधूंची फिरकी घेण्याचा मोह झाला.

एकाला सहज विचारले, काय रे तुझे सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे?
तर गडी चिडला!
लगेच मला समजून चुकले की याने आपले प्रोफाईल पिक अजाणतेपणे रंगवले आहे.
त्याला म्हटले काही नाही झमन्या, अर्ध्या गावाची तुला माहीती नसते आणि सगळीकडे पुढे पुढे करण्याची घाई असते.
माहिती देताच त्याने घाईघाईत आपले प्रोफाईल पिक्चर बदलले.

हाच प्रयोग आणखी दोघाचौघांवर केल्यावर एक जण असा निघाला ज्याला यामागचे कारण माहीत होते. तसेच आपण अश्या संबंधांना आणि त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याला सपोर्ट करतो असेही तो म्हणाला.
त्याला देखील मी विचारले, "खरेच नुसता सपोर्ट करतोस की तू देखील त्यातलाच एक आहेस." .. तर हा देखील चिडला! जरा जास्तच चिडला.
थोडक्यात त्याचा सपोर्ट किती पोकळ होता ते मला समजून चुकले. जे स्वत:ला कोणी समजले तर त्याला ती एक शिवी वाटते अश्यांना तो कसा मनापासून सपोर्ट करणार होता.

पुढे दोनेक दिवसातच हळूहळू काही प्रोफाईल पिक्चर बदलताना दिसले. बहुतेक खरे कारण समजल्याने काही जणांनी ओशाळून बदलले असावेत, वा काही जणांनी दाखवला तेवढा सपोर्ट पुरेसा म्हणत बदलले असावेत. तर काही जणांचे प्रोफाईल पिक्चर आजही रंगीत पट्ट्यात दिसत आहेत. खंबीर पाठिंबा!

अर्थात, मला स्वत:ला देखील अजून ठामपणे मत बनवता येत नाहीये की या प्रकारचे संबंध योग्य की अयोग्य? नैसर्गिक की अनैसर्गिक? आजार, विकृती की फक्त एक प्रकारचे सेक्शुअल ओरिएंटेशन..

पण याला किमान अंश भर सपोर्ट करणार्‍यांना मला एक विचारावेसे वाटते, आपल्या देशात आजही बरेच ठिकाणी आंतरजातीय वा आंतरधर्मीय प्रेमविवाह म्हणजे फार मोठा सामाजिक अपराध ठरवला जातो. या अपराधाची शिक्षा तो समाजच देतो. वेळप्रसंगी पोटच्या पोरांना ठार मारण्यापर्यंत मजल जाते. तर असल्या समलिंगी विवाहांना समर्थन देण्याअगोदर आंतरजातीय प्रेमविवाहांना समर्थन देत या देशातील प्रत्येकाला त्याच्या मर्जीने विवाह करता यावा यासाठी चळवळ उभारावी असे नाही का वाटत?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेने हा निर्णय घेऊन एक वेगळी वाट निर्माण केली. माझ्यामते ह्या पुर्वी नेदरलॅन्डमधे समलिंगी लग्नास अनुमती मिळालेली आहे. ह्या निर्णयाचा समाजावर आणि लहान मुलांवर काय परिणाम झाला ते ऐकावेसे वाटते आहे.>>

अमेरिकेत लहानपणी शाळेत No Discrimination चे बेसिक शिक्षण दिले जाते. तुमचा फ्रेंड हा काळा/ गोरा/ ब्राऊन असू शकतो. तुमच्या फ्रेंडला दोन आई किंवा दोन बाबा किंवा एक आई/ एक बाबा किंवा एक आई किंवा एक बाबा असू शकतात. हे लहान मुलांना नर्सरी/ केजीमध्ये शिकविले जाते.

अमेरिकेची लोकसंख्या किति हो?
नै, सहज विचारतोय... असय, की अमुक इतक्या लोकसंख्येच्या अमेरिकेला असा कायदा करावा लागतो तर तमुक इतक्या लोकसंख्येच्या भारताने काय करायला हवे असे काही स्टॅटिस्टीकल वैज्ञानीक वगैरे उपायही कोणी सुचवू शकतोच ना!
तर कोणी सुचविण्या आधीच माहित असावेत Proud म्हणून लोकसंख्या विचारतोय.

>>>> अमेरिकेत लहानपणी शाळेत No Discrimination चे बेसिक शिक्षण दिले जाते <<<
राजु७९, अतिशय महत्वाचा मुद्दा.
येथिल परिस्थिती सर्वथैव भिन्न आहे. अहो लोकांचे नाक खुपसत इतके लक्ष असते की डब्यात काय आणले, पोळीचा रंग कसा आहे, किति करपलीये इथ पासून ते एकच एक पॅण्ट हा लिम्ब्या तिन दिवस का वापरतो, त्याच्या पायातील बुट असेच का आहेत, अन तो तसाच का चालतो वगैरे वगैरे......
इतक्या बारीक सारीक गोष्टींपासुन ते लिम्ब्या कुणाशी बोलतोय - तो की ती? सुंदर की गबाळी?, आपल्यालाच हवी की सोडुयात लिम्ब्याकरता? Proud , किती वेळ बोलतोय?, का बोलतोय? कशावर बोलतोय? अमक्याकडे बघुन हसलाच का? तमकीकडे बघुन रुसलाच का? वगैरे वगैरे ......
अहो याच्यावरच तर आमच्या ९०% जन्तेचे रोजचे आयुष्यातील करमणूकीची गरज भागत असते, अन कुणाला वाटत असेल की झीच्या सेरियल मुळे इकडे कमी लक्ष जाईल तर तसे नाही होत, उलट सेरियलीमधील बघुन ते देखिल प्रत्यक्ष आयुष्यात सापडते का बघायला/टोकायला/पुनर्भुतीचा आनंद घ्यायला या शोधात अस्तात लोक.

ईथे ब्लाईंड फॉलेवर्स हाही मुद्दा आहे ज्यामुळे मुख्य सपोर्टला हरताळ फासला जातोय.
गेल्या काही दिवसात असे खरेच खूप लोक बघायला मिळाले ज्यांना ही मुव्हमेंट काय आहे हे प्रोफाईल रंगवणं काय आहे हे धड माहित नसूनही एकाने केलं म्हणून मी पण करतो हाच प्रकार जास्त आहे.

सो मनापासून जाणीवपूर्वक सपोर्ट करणारे, सपोर्ट करावा की नाही या कनफ्युजनमध्ये तटस्थ असणारे यांच्या मानाने काहीही माहिती नसताना रंगरंगोटी करणारेच जास्त दिसतायत.
आणि बहुतांश वेळा आपल्याकडे हेच होतेय.... वरवर मुव्हमेंट फार मोठी भासू लागते प्रत्यक्षात त्यातले जाणकार सपोर्टर्स बोटावर मोजण्याइतकेच निघतात.

लिंबुटिंबु, हे शिक्षण घ्यायला शाळाच हवी असे नाही. अगदी घरात बसून आणखी चार मुलांना हवे तर सोबतीला बसून राजू हे म्हणत आहेत ते सांगता येत मुलांच्या निरागसपणाला इजा न होता.

लेखाचे शिर्षक आवडले /पटले नाही..
रंगबिरंगी पट्ट्याचा अर्थ कळला का? असे असते आणि हाच प्रश्न तुम्ही मित्रांना ही विचारला असत तर.. तुमच्या मित्रांना एक मित्र विचारतोय असे वाटले असते. ते चिडले नसते.

विषय गंभिर आहे. यात आपले मत काय असावे याचा स्वत: च्याच मनाशी काही ताळमेळ बसला नाही. पण एक नक्की.. चित्रा पालेकर यांचा त्यांच्याच लेकी वरचा लेख वाचल्यावर, असे वाटले की..
त्यानीं त्यान्च्या लेकीला दिलेला पाठिंबा एक आई म्हणुन योग्य आहे. एक आई म्हणुन त्यानीं लेकीला मुलगी या पेक्षा माणुस म्हणुन स्विकारले आहे. हे पटले.

भुंगा,

चिनुक्सांच्या लेखनात बघा!

निरा,

'मनाशी ताळमेळ बसला नाही' असे सुरुवातीला माझे झाले होते. मग मायबोलीवर अनेक तज्ञांची मते, चिनूक्स ह्यांनी दिलेला लेख आणि एक प्रत्यक्षातील उदाहरण पाहून मत बदलले. ज्ञान वाढले, जाण वाढली. आज सातींचा प्रतिसाद (जो आवडल्याचे नमूद केलेले आहे तो) वाचून थोडे नवल वाटले कारण माझ्या आठवणीनुसार बहुधा त्यांनी एका धाग्यावर 'नैसर्गीक - अनैसर्गीक' ह्या चर्चेत 'अनैसर्गीक' अशी बाजू घेतली होती. चुकीचे असल्यास त्या चूक दुरुस्त करतीलच.

लैंगीकता हा विषय एखाद्या प्रदेशात किती प्रमाणात मोकळेपणाने बोलला जातो ह्यावरही काही मूव्हमेन्ट्स अवलंबून असाव्यात! भारतात हा विषय चोरटेपणाने बोलण्यासारखा आहे. (हाच बेसिक घोळ आहे).

झकासराव ऋन्मेषला उद्देशून काही बोलले नाहीत आणि ऋन्मेष ह्यांना तरीही असे वाटले व झकासरावांचा प्रतिसाद मजेशीर होता हे सगळे पाहिले. पण त्या विशिष्ट बाबतीत मला तरी ऋन्मेषचे पटते की 'एखाद्याचे सेक्श्युअल ओरिएन्टेशन काय आहे' असे जर कोणी कोणाला विचारलेच तर त्याचा अर्थ ते एक आमंत्रण असेल असाच होत नाही. Happy (झकासरावांनी दारूचेच लॉजिक वापरले व थोडीशी मजा केली हे समजलेले आहे).

असा प्रश्न विचारणे हा अतीव भोचकपणा आहे हे मान्य, पण तो प्रश्न विचारणे म्हणजे आमंत्रण नाही, इतकेच म्हणायचे आहे. 'दुसर्‍याचे ओरिएन्टेशन काय असू शकेल हे समजून घ्यावेसे वाटणे' ह्या पातळीला आपण पोचलो असू, असाही एक उडत उडत अर्थ काढता येतो का बघा. Happy

'एखाद्याचे सेक्श्युअल ओरिएन्टेशन काय आहे' असे जर कोणी कोणाला विचारलेच तर त्याचा अर्थ ते एक आमंत्रण असेल असाच होत नाही. <<< बेफिकीर, खरे आहे नसेलही होत.

असे बघा की मित्र कितीही जवळचा असला आणि आपल्या समाजात भिन्नलिंगी विवाह अगदी आधीपासून कायदेशीर असले तरीही आपण आपल्या अगदी जवळच्या मित्राच्या खासगी आयुष्यात कितपत डोकावायचे यासंबंधी आपण स्वतःशी एक मर्यादा घालून घेतो. मित्र फार जवळचा आहे म्हणून लगेच "तुझ्या बेडरूम मध्ये तुम्ही दोघे काय गप्पा मारता" असे आपण त्याला विचारत नाही. आणि असे विचारल्यावर त्या मित्राने जर रट्टे दिले तर लगेच "तुझा विवाहसंस्थेला वरवरचा सपोर्ट आहे," असे आपण म्हणणार का? लेखात विचारलेला हा प्रश्न त्याच प्रकारचा आहे असे मला (आणि बहुतेक इथल्या इतरांनाही) वाटतोय.

लेखाच्या शीर्षकाबद्दल नापसंती मीही व्यक्त केली आहे गजानन!

पण माझ्यामते:

"तुम्ही बेडमध्ये काय गप्पा मारता" असे 'न विचारणे' ह्याची 'सेक्शुअल ओरिएन्टेशनबाबत न विचारण्याशी' तुलना केली जाऊ शकत नाही असे मला वाटते.

'जवळच्या मित्राच्या खासगी आयुष्यात कितपत डोकावायचे' हे विधान जवळच्या मित्रांबाबत आहे. माझे तर असे म्हणणे आहे की अनोळखींना 'तुमचे सेक्श्युअल ओरिएन्टेशन काय आहे' असा प्रश्न विचारणे हेच मुळात स्वीकृतीचे एक लक्षण आहे. अनोळखींना 'चालता हो' असा लूक द्यायचे स्वातंत्र्य आहेच, पण असा प्रश्न विचारला जाऊ शकणे हेही खूप नवीन वाटते. Happy

चु भु द्या घ्या

"तुम्ही बेडमध्ये काय गप्पा मारता" असे 'न विचारणे' ह्याची 'सेक्शुअल ओरिएन्टेशनबाबत न विचारण्याशी' तुलना केली जाऊ शकत नाही असे मला वाटते. <<< ओके. आपली मते/विचार वेगळे असू शकतात. Happy

अहो बेफिकीर, मी फक्तं शब्दांचे मराठीत अर्थं लिहिलेत माझ्या प्रतिसादात.
नैसर्गिक/ अनैसर्गिक किंवा कसे याबद्दल एक तरी शब्द इथल्या प्रतिसादात लिहिलाय का?

>>> साती | 3 July, 2015 - 21:23 नवीन

मग नवल कसलं वाटलं?
<<<

१. एका धाग्यावर समलैंगीकता अनैसर्गीक असते असे म्हणणे व दुसर्‍या धाग्यावर समलैंगीकांचे प्रकार (कदाचित वैद्यकीय किंवा अदरवाईज टर्म्समध्ये) समजावणे!

२. जे नैसर्गीकदृष्ट्या असू शकते असे आज लिहिले गेलेले आहे तसे ते असते हे 'त्या' धाग्यावर काहीसे अमान्य करणे!

Happy

कोणता धागा हे आठवत नाही, पण चिनूक्स ह्यांच्या 'चित्रा पालेकर' ह्या लेखाच्या आधीचा धागा होता.

बाकी, हे विषयांतर आहे ह्याची जाणीव आहे.

Happy

अनैसर्गिक गोष्टींचे प्रकार नसतात का?
स्किझोफ्रेनियाचेही प्रकार असतात.
'ज्या गोष्टीला अनैसर्गिक किंवा चुकीची समजतो त्याचे वर्गीकरण मान्य असण्याच्या गोष्टीचे नवल वाटणे 'या गोष्टीचेच मला नवल वाटते.
Wink

>>> साती | 3 July, 2015 - 21:36 नवीन

अनैसर्गिक गोष्टींचे प्रकार नसतात का?<<<

नक्कीच असतात.

असो. Happy

सॉरी धागा तोच होता, चिनूक्स ह्यांचा! तुमचे सहाव्या पानापर्यंतचे प्रतिसाद माझ्याकडे आहेत. नंतरचे पाहिले नाहीत. Happy

तुम्ही अजूनही ते अनैसर्गीक म्हणत आहात का? Happy

येथील चर्चा खूपच चविष्ट वाटली. कवी बी यांचे इन्सेस्ट बद्दलचे लिखाण खूपच आवडले. माहितीत भर पडली. याबद्दल वेगळा नोड काढता येईल का? बी यांना माहिती गोळा करण्याचे नोड्स काढण्याचा छंद आहे असे एकंदर दिसले.

शेवटीशेवटीच्या प्रतिसादांत श्री बेफिकीर यांचा मुद्दाम गैरसमज झाल्यासारखे वाटले. काही पूर्वीचे भांडण मागील पानावरून पुढे चालू असे दिसते आहे.

या सगळ्यांत मूळ मुद्दा दूरच राहिला असे वाटते आहे.

फेसबुक वापरणार्‍यांच्या उथळपणाबद्दल चर्चा करण्यासाठी हा नोड असावासे वाटले. काहीतरी ट्रेंडींग आहे ना? मग घ्या वाहत्या गंगेत हात धुवून, अशी मनोभूमी अनेकांची असते, त्याबद्दल भाष्य करण्यासाठी श्री रुन्मेष यांनी धागा काढला आहे असे वाटले. उदा. ते बर्फाच्या बादलीने आंघोळ करण्याचे काहीतरी फॅड होते की नाही? तसली वागणूक फेसबुकी लोक का दाखवतात इत्यादी चर्चा अपेक्षित असावी.

>>>शेवटीशेवटीच्या प्रतिसादांत श्री बेफिकीर यांचा मुद्दाम गैरसमज झाल्यासारखे वाटले. काही पूर्वीचे भांडण मागील पानावरून पुढे चालू असे दिसते आहे. <<<

मला प्रामाणिकपणे कोणाशीही भांडायचे नाही आहे. मला असे वाटते की जे अनेकजणांच्या इनपुट्समुळे व एका उदाहरणामुळे माझ्या व्यवस्थित लक्षात आले ते जर उद्या भारतातील प्रत्येकजण बोलू लागला तर ते एक प्रकारचे व्यक्तीस्वातंत्र्य किंवा व्यक्तीस्वातंत्र्यास मिळालेला अधिकचा वावच ठरेल. Happy

येथील संस्कृतीमधील भोचकपणाचा प्रभाव जमेस धरूनही अशी काही वक्तव्ये होणे, असे काही प्रश्न विचारले जाणे हे कुठेतरी प्रगत होण्याचे (वाईट का होईनात पण) लक्षण आहे. Happy

माझा विरोध फक्त दोन गोष्टींना होता:

१. धाग्याचे शीर्षक
२. समलैंगीकता आणि आंतरजातीय/ धर्मीय विवाहांसंदर्भातल्या असलेल्या किंवा संभाव्य चळवळींची तुलना!

Happy

माझा विरोध फक्त दोन गोष्टींना होता:

१. धाग्याचे शीर्षक
२. समलैंगीकता आणि आंतरजातीय/ धर्मीय विवाहांसंदर्भातल्या असलेल्या किंवा संभाव्य चळवळींची तुलना

***

असे जर असेल तर तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तुम्ही सरळ का सांगत नाही?

संभाव्य चळवळींबद्दल मी कवी बी यांना उद्देशून लिहिले आहेच.

@ भुंगा...माफ़ करा हं..
तो लेख मी एका दिवाळी अंकात हार्ड कॉपी..वाचला होता...
तरीही स्कॅन करुन इथे देण्याचा प्रयत्न करेन... अर्थात माबो च्या नियमा नुसार...

Nira,
चित्रा पालेकरांचा तो लेख मायबोलीवर आहे.
तसंच प्रकाशकांच्या व लेखकाचा परवानगीशिवाय कुठलंही प्रताधिकार असलेलं साहित्य ऑनलाइन प्रकाशित करणं योग्य नाही. मायबोलीच्या नियमांतही ते बसत नाही.

धन्यवाद चिनुक्स.. हो बरोबर आहात आपण.. असे काही नियम असतात याची मल कल्पना अहे.. .मी नविन माबो कर असल्याने हा लेख इथे आहे हे महित नव्ह्ते..पण आत्ता परत वाचला तो लेख.

फेसबुकवर बहुतेकांनी अश्याप्रकारे रंगबेरंगी प्रोफाईल पिक्चर बदलले आढळले. त्यापैकी किती जणांनी ह्या मागील चळवळीची कल्पना असेल माहित नाही. आज हा धागा वाचल्यावर मला कळले की ही काय भानगड आहे. त्यामुळे ह्या धाग्याबद्दल ऋन्मेषचे आभार. पण बेफिजींनी लिहिल्याप्रमाणे "समलैंगीकता आणि आंतरजातीय/ धर्मीय विवाहांसंदर्भातल्या असलेल्या किंवा संभाव्य चळवळींची तुलना" लेखात का केली ते समजण्यापलिकडचे आहे.

साती यांचा माहितीपुर्ण आणि बेफीजींचा ट्रेनचा प्रतिसाद आवडला.

Pages