उपनिषदे
शहाजहान बादशहाचे नाव घेतले की दोन गोष्टी अपरिहार्यपणे समोर येतात. एक अर्थातच ताजमहाल आणि दुसरा औरंगजेब! त्यापैकी ताजमहाल हा शहाजहान बादशहाने भारताला दिला की तो आधीपासूनच अस्तीत्वात होता हा वादाचा विषय आहे आणि औरंगजेब............ असो! परंतु फार प्रसिद्ध नसलेली आणि केवळ आपल्या कार्यामुळे भारताला उपयुक्त ठरलेली शहाजहानची आणखी एक देणगी म्हणजे त्याचा ज्येष्ठ पुत्र - दारा शिकोह.
इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात औरंगजेबाने मारलेल्या भावंडाच्या यादीतला एक भाऊ, केवळ इतकाच काय तो दाराचा आणि आपला परिचय. यापेक्षा त्याबद्दल अधिक काही वाचनात येत नाही.
सर्वाचि जाहिर मफि मगतो हा धाईसी प्रश्न विचर्तो म्हनुन.
गोत्र खरच असत का हो ? काहि जण् म्हण्तात ब्रम्ह ने हे विश्वा तयार केल . त्यानेच प्रिथ्वि वरति प्रथम पहिल जिव आणला. म्हण्जे आपण सर्व त्यान्चिच मुले . मग आपाप्ल्यत गोत्र वेगल का. आप आपले गोत्र एकच पाहिजे.
गार्ग्य रुशि , भारद्वाज रुशि ह्यन्चे वडिलान्च गोत्र कुथल होत.
एखद्या मनुश्या कडे बघुन आपन त्यच गोत्र का नाहि सान्गु शकत.
समाण गोत्र असणार्या लोकान मध्ये कोनते गुनधर्म सार्खे असतात?
हे पुर्ण विश्वा ब्रम्हा ने तयार केल. ह्याप्रमाणे पश्चिमात्य देशाति ल लोकन्मध्ये गोत्र कुथल्या स्वरुपात आहे.
उपनिषदांचा अभ्यास - भाग ४ - न तत्र चक्षुर् गच्छति
केनोपनिषद
ॐ केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः ।
केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुः श्रोत्रं क उ देवो युनक्ति ॥ १ ॥
कुणाच्या इच्छेने आणि प्रेरणेने मन धाव घेते ? कुणी योजलेला प्रथम प्राण हालचाल करतो ? कुणाच्या इच्छेने प्रेरिलेली ही वाणी (लोक) बोलतात ? कोणता देव चक्षु आणि श्रोत्र यांना त्या-त्या कामी योजतो ?
श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यत् वाचो ह वाचं स उ प्राणस्य प्राणः ।
चक्षुषश् चक्षु: अतिमुच्य धीराः प्रेत्यास्माल्लोकात् अमृता भवन्ति ॥ २ ॥
उपनिषदांचा अभ्यास - भाग २
उपनिषदे - सहा दर्शनांपैकी (षड्दर्शन) एक दर्शन. उपनिषदे म्हणजेच वेदांत किंवा उत्तरमीमांसा किंवा श्रुती. वेद-वाङ्मयातील शेवटचा भाग म्हणून याला वेदांत असे म्हटले जाते.
'आरण्यक' म्हणजे अरण्यातच ज्या ब्राह्मणभागाचे किंवा वेदभागाचे पठण करावयाचे तो भाग. मुळात उपनिषदे हीच आरण्यके होत. अनेक प्राचीन उपनिषदे वर्तमान आरण्यकांचे भाग आहेत. उपनिषद म्हणजे गुरुसन्निध बसून शिकावयाची अध्यात्मविद्या. उपनिषदाचा हा व्युत्पत्यर्थ असला, तरी उपासना, रहस्य किंवा गूढ ज्ञान असाही त्याचा अर्थ आहे. (मराठी विश्वकोश)