इतिहासाचे पान
ज्यांनी पारतंत्र्य भोगलं आहे
त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळते
स्वातंत्र्यासाठी सांडलेल्या रक्ताने
स्वातंत्र्य लढ्याची हिंमत मिळते
या स्वातंत्र्यासाठीही क्रांतीवीरांनी
पारतंत्र्यात दु:ख सोसलेलं आहे
त्यांच्या इतिहासाचं पानन् पान
आजही रक्तानं माखलेलं आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
वंदन तिरंग्याला
भक्ती-भावाने गात राहू
तिरंग्याचे गुण-गाण सदा
मनात राहील उंचच उंच
या तिरंग्याची शान सदा
मना-मनातुन मना-मनात
राष्ट्रप्रेमाचे स्पंदन भरू
अबाधित राखुन एकात्मता
तिरंग्याला हे वंदन करू
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
या जगण्याला
पारतंत्र्याचे दु:ख सोसुन
स्वातंत्र्याचे सुख वाटले
या देशाच्या क्रांतीवीरांनी
भारत मॉ चे रूप थाटले
त्या वीरांच्या क्रांती लढ्याने
स्वातंत्र्याची चव कळाली
अगाध त्यांच्या परिश्रमाने
या जगण्याला ढव मिळाली
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सलाम
रक्तरंजित क्रांती घडवुन
हे स्वातंत्र्य आलेले आहे
कित्तेक क्रांती वीरांनीही
आपले बलिदान दिलेले आहे
त्यांच्या त्या बलिदानानेच
इथले स्वातंत्र्य नांदवले आहे
आजही त्यांना मी सलाम करतो
ज्यांनीही रक्त सांडवले आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सदरील वात्रटिका ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
व्हाटस्अप इफेक्ट
व्हाटस्अपच्या अति वापराने
कौटुंबिक संबंध चिरू लागले
अन् घटस्फोटांना कारणीभुत
म्हणे व्हाटस्अप ठरू लागले
प्रत्येकाच्या पाहण्याचे दृष्टीकोण
कुठे राइट कुठे लेफ्ट जात आहेत
अन् ज्याच्या त्याच्या वापरानुसार
व्हाटस्अप इफेक्ट होत आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
फ्रेंडशिप डे
ह्रदयापासुन निघालेला
ह्रदयापर्यंत वे असतो
शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी
फ्रेंडशिपवाला डे असतो
आपुलकीच्या वर्षावाचा
रोजच इथे वारा वाहतो
मात्र "फ्रेंडशिप डे" हा
आहे म्हणून साजरा होतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.9730573783
सदरील वात्रटिका ऑडीओ स्वरूपात ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर : 9730573783
यावर्षी एकूण जमा झालेल्या देणगीतील रुपये २५,०००/- (पंचवीस हजार) फक्त एवढी देणगी सावली सेवा ट्रस्टला देवदासींच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी देण्यात आली.
सदर देणगीतून ट्रस्टने मुलांच्या शाळा-कॉलेजेसचे शुल्क भरणे तसेच गणवेश, चपला, बूट, दप्तरे इत्यादींची खरेदी केली. त्यांच्या पावत्या त्यांनी पाठवल्या आहेत.
तसेच देणगीदार आणि सावली सेवा ट्रस्टला मदतीचा हात पुढे करणार्या सर्व स्वयंसेवकांचे आभार मानणारे पत्रही त्यांनी मुलांच्या प्रगतीच्या अहवालासकट पाठवले आहे.
१) आभारपत्र
भारताचा नकाशा पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येईल. सिक्किम असं एकमेव राज्य आहे ज्याची सरहद्द भारताच्या दुसर्या एकाच राज्याशी आहे. ओके, ओके! ही क्विझ प्रोग्रॅमसाठी तयारी नव्हे. वीस वर्षांपूर्वी सिक्किममध्ये पेलिंग आणि वर्सेला गेलो होतो. म्हटलं अनुभव शेअर करावेत.
इथून ट्रेननी कलकत्ता, मग रात्रभरच्या ट्रेन प्रवासानंतर सिलिगुडी. तिथून आठ तास बस प्रवास – पेलिंग. वाचूनच दमल्यासारखं होतं खरं पण प्रत्यक्षात तसं नाही. ग्रुपबरोबर गेलं की आपल्यासारखेच बोलघेवडे आणि बोलघेवड्या बरोबर असतात. प्रवास मजेत होतो. नवीन ओळखी. नवीन गप्पा. नवीन अनुभव.
हा माझा लेख तुम्ही 'स्वीट टॉकर' या आय डी वर वाचला असेलच. आता स्वतःची आय डी घेतली आहे तर त्यातही ठेवावा हा विचार.
ओझे आणि विद्यार्थी
प्रत्येक-प्रत्येक पालकालाही
आता पाल्य चाप्टर व्हावं वाटतं
पण दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी
वजनदार दप्तर घ्यावं लागतं
विद्यार्थ्यांच्या पाठीवरती
दप्तराचेच ओझे आहेत
उंची आणि वजन पाहता
नवे तोडगेही खुजे आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३