डेली रूटींग
त्याच-त्याच गोष्टी करून
कधी मनंही विटले जातात
रोज-रोजच्या गोष्टींपासुन
मुद्दामहून टर्न घेतले जातात
कोणी सांगण्याची गरज नाही
आपणंच समजुन घ्यावं लागतं
कितीही टर्न घेतले तरीही
डेली रूटींगवर यावं लागतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
लोकशाहीच्या सक्षमतेला
कीतीही मारू द्या थापा
कुणाकडेच स्वबळ नाही
लोक सहभागा शिवाय
लोकशाही प्रबळ नाही
लोकशाहीतील लोकांचं महत्व
लोकांना समजुन दिले पाहिजे
अन् लोकशाहीच्या सक्षमतेला
लोकांनी जागृत झाले पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
शिकताना
शिकण्यासाठी खुप आहे
शिकणाराने जाणले पाहिजे
सदैव शिकण्याचे ध्येय
नसा-नसात भिनले पाहिजे
कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी
कधीच कुठलेही भय नसते
कधीही काहीही शिकू शकतो
शिकण्याला ठराविक वय नसते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सत्य
नैतिकतेचा आजकाल
का राहिला नाही धाक
सत्य जरी दिसलं तरी
का असते डोळेझाक,.?
सत्य बघतात लोक
सत्य जगतात लोक
सत्य बघता-जगता का
सत्य झाकतात लोक,.!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
---------- सरजी --------
शाळा आणि कॉलेज सह
जगण्यातुनही शिकतो आहोत
जेव्हा-जेव्हा आठवेल तेव्हा
सरजी तुम्हाला घोकतो आहोत
आपली शाळा अन् कॉलेजही
हल्ली मनामध्ये भरतंय
तुमच्या एका-एका आठवणीनं
मन पुन्हा पुन्हा स्फूरतंय
ते दिवस भुतकाळी असले
तरी वर्तमानात भारी आहेत
अन् आमचे भविष्यकाळही
त्यांच्याच तर दारी आहेत
तुमच्या ज्ञानाची पुरचुंडी
अजुनही पुरली आहे
सगळ्यांना वाटत आलो तरी
अजुनही तेवढीच उरली आहे
दिलंत तुम्ही ज्ञान असं
जे वाटल्यानं वाढतं आहे
ओथंबलेल्या माणूसकीनं
माणसांना माणूस जोडतं आहे
ज्याच्या-त्याच्या पध्दतीनं
जो-तो गुरूजी सांगतो आहे
प्रत्येक-प्रत्येक यश संबंध
तमाम गुरू जनांस
स्वत:च्या विसरून वेदना
ज्ञान वाटलंय तुम्ही
प्रगतीच्या उत्कर्षाचे
जग थाटलंय तुम्ही
आज बुध्दीच्या जोरावरच
समाज सारा जोमानं स्फूरतो
तमाम गुरू जनांस मी
शतश: शाब्दिक प्रणाम करतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
वागणे माणसांचे
नैसर्गिक असली तरीही
अनैसर्गिकता वाढत आहे
माणसांतली माणूसकीही
माणूसच तर तोडत आहे
विश्वासाचे नाते देखील
विश्वासबाह्य वागु लागलेत
माणसांच्या वागण्यालाही
माणसंच त्रागु लागलेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
मानसांनी
माणसांच्या मनात इथे
माणसांची तेढ आहे
माणसांशी झूंजण्याचे
माणसांना वेड आहे
माणसांच्या मनामध्ये
माणूसकी कृपावी
माणसांनी माणसांशी
माणूसकी जपावी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
माणसांनो
माणसांच्या झूंडीत या
आज माणूस शोधतो मी
माणसांच्या वागण्यातुन
आज माणूस बोधतो मी
रासवी विचारांचे कधीही
ना कुणालाही फूस द्यावे
अन् माणसांशी वागताना
माणसांनी माणूस व्हावे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
विचारवंत मारणारांनो
विचारवंत मारण्यासाठी
फूसके ठूसके वार असतात
अविचारी माणसांकडूनच
भ्याड गोळीबार असतात
विचावंत मारण्या आधी
विचार त्यांचे वाचुन पहा
जे दुष्कृत्य करत आहात
त्याला स्वत: टोचुन पहा
तुमच्यातील अविवेकाला
विवेकाने विराम कराल
विचारवंतांच्या विचारांना
सदैव तुम्ही सलाम कराल
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३