श्री. अशोक जैन ह्यांनी १९७८ च्या ऑगस्ट ते १९८९ ह्या अकरा वर्षांच्या काळात महाराष्ट्र टाइम्स ह्या मराठी वृत्तपत्राचा दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. दिल्लीत असलेल्या विशेष प्रतिनिधीने तिथल्या राजकारणावर, सत्ता मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या चक्रावर नजर ठेवून आपल्या वाचकांपर्यंत त्या बातम्या पोचवणे, हे अपेक्षित होतंच. त्या व्यतिरिक्त दर सोमवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये दिल्लीतील घडामोडी सांगणारं ‘राजधानीतून’ हे सदर जैन लिहीत असत.
डिस्ने वर्ल्ड - ऑरलँडो फ्लोरिडा Joe Raedle/Getty Images
गेले काही दिवस डिस्नी आणि फ्लोरिडाचा गव्हर्नर रॉन डिसँटिस अर्थात आपला लाडाचा डिसँटिमोनिअस यांच्यातील वाद प्रतिवादाच्या अनेक बातम्या उडत उडत वाचत होतो. आज शांतपणे नक्की काय वाद आहे ते डीटेलवार वाचलं आणि फारच मजेदार गोष्टी समोर आल्या म्हणून इथे शेअर करतोय.
नुकतेच अफजलखानाच्या कबरीवर केलेले बांधकाम महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने हटवण्यात आले. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गेली अनेक वर्षे बांधकाम हटवा अशी मागणी हिंदुत्ववाद्यांकडून होत असे. आता तेच सत्तेत आल्यावर कबरीभोवतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे कारण देऊन ते हटवले गेले आहे.
या कारवाईला अपेक्षित विरोध झाला नाही. कारवाईनंतरही फारसे पडसाद उमटले नाहीत. त्यामुळे बांधकाम हटवण्याच्या मागणीला विरोध करणारे तत्कालीन सरकारमधले लोक आपल्या भूमिकेवर ठाम नाहीत का असे विचारले जात आहे. तसेच या प्रश्नाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्नही होत आहे.
विषय सर्वांनाच माहिती आहे. तरी कुणाला माहिती नसेल तर थोडक्यात.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली. प्रत्येक राष्ट्रपतीच्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडणारा हा औपचारिक, शिस्तबद्ध आणि दिमाखदार समारंभ. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 14 मे 1957 ला राष्ट्रपती अंगरक्षक दलाला पहिली राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली होती.
रात्रीचे अडीच वाजले आहेत.
लेखक डोळे मिटतो.
झोपण्याचा प्रयत्न करतो.
पण आत सगळा तोच घोंगा चालू होतो.
डोकं फुटायला हवं होतं एव्हाना.
थकून डोळे उघडतो.
तर अंधारात गरगरणारा पंखा दिसतो.
पूर्वी वाहनविषयक तंत्र आणि मंत्र असा ग्रुप होता. तो न सापडल्याने या ग्रुपात पोस्ट केले आहे. योग्य ग्रुपात हलवल्यास आभारी राहीन.
ब्रिटनचे राजे जॉर्ज (पंचम) आणि राणी मेरी यांचा भारताचे सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक सोहळा 12 डिसेंबर 1911 ला दिल्लीतील निरंकारी सरोवराजवळच्या बुरारी मार्गावर पार पडला होता. त्यासाठी खास ‘दिल्ली दरबार’ भरवण्यात आला होता. ब्रिटनच्या राजा आणि राणीचा भारताचा सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्लीत भरवण्यात आलेला हा तिसरा दरबार होता. राज्याभिषेकानंतर लगेचच सम्राट जॉर्ज (पंचम) याने ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित केल्याचे घोषित केले.
ठीक 75 वर्षांपूर्वी 9 डिसेंबरला घटना परिषदेची (Constituent Assembly) स्थापना होऊन स्वतंत्र भारतासाठीच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या कार्याचा शुभारंभ झाला होता. भारताच्या इतिहासात प्रथमच असे घडत होते. देशभर झालेल्या निवडणुकांमधून निवडून आलेल्या 299 सदस्यांची ही घटना परिषद होती.