डिस्ने वर्ल्ड - ऑरलँडो फ्लोरिडा Joe Raedle/Getty Images
गेले काही दिवस डिस्नी आणि फ्लोरिडाचा गव्हर्नर रॉन डिसँटिस अर्थात आपला लाडाचा डिसँटिमोनिअस यांच्यातील वाद प्रतिवादाच्या अनेक बातम्या उडत उडत वाचत होतो. आज शांतपणे नक्की काय वाद आहे ते डीटेलवार वाचलं आणि फारच मजेदार गोष्टी समोर आल्या म्हणून इथे शेअर करतोय.
मला एक मदत हवी आहे. (त्वरित)
माझा आत्तेभाऊ MS in Cybersecurity करण्यासाठी Saint Leo University Florida येथे जातो आहे. त्याच्या सुरूवातीच्या काही दिवसांसाठी (२३ ऑगस्ट २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२१) राहण्याची खात्रीलायक सोय होऊ शकेल का? तिथले काही संपर्क मिळू शकतील का?
इथे हा प्रश्न अस्थायी असेल तर योग्य धाग्यावर हलवावा ही विनंती.
आगाऊ धन्यवाद.
२०१५ ला शेवटचे २ आठवडे सगळ्याना सुट्टी होती म्हणुन फ्लोरिडा आणि अॅटलांटा ची १० दिवसाची ट्रीप करायची ठरवली. सुट्टीचे दिवस असल्याने आधी विमानाची तिकिटे काढली. त्यात जाताना ओरलँडो आणि येताना अॅटलांटा वरुन तिकिटे मिळाली. त्यानुसार ३ दिवस मायामि, २ दिवस ओरलँडो आणि ३ दिवस अॅटलांटा आणि २ दिवस प्रवासात असा प्लान केला. ओरलँडो वरुन गाडी भाड्यानी घ्यायची आणि मायामि ला येउन ३ दिवस राहायचे तिथुन परत ओरलँडो ला येउन २ दिवस राहायचे आणि नंतर अॅटलांटा मध्ये ३ दिवस असा बेत केला. डिसनी, universal आणि केनेडी स्पेस मागच्या वर्षी केले असल्याने ओरलँडो मध्ये २ दिवस भरपुर होते.
मागच्या वर्षी मार्च मध्ये फ्लोरिडा ला जायचा योग आला होता ...म्हणजे आणावा लागला...त्याचे असे झाले कि मार्च मध्ये अमेरिकेमध्ये मुलांना स्प्रिंग ब्रेक असतो.
तसे बरेच ब्रेक असतात.तेव्हडेच मुलांना हुंदडायला बरे!
म्हटले यावेळी आपण का मागे राहावे! नवर्यानेही हो, नाही म्हणता म्हणता होकार दिला.मग आम्ही मी,आणि माझ्या मुलाने त्याला विचार करायला वेळच नाही दिला.
जास्त विचार करून ताण येतो ना!