फ्लोरिडा येथे राहण्याची सोय (तात्पुरती)

Submitted by दक्षिणा on 4 July, 2021 - 09:30

मला एक मदत हवी आहे. (त्वरित)

माझा आत्तेभाऊ MS in Cybersecurity करण्यासाठी Saint Leo University Florida येथे जातो आहे. त्याच्या सुरूवातीच्या काही दिवसांसाठी (२३ ऑगस्ट २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२१) राहण्याची खात्रीलायक सोय होऊ शकेल का? तिथले काही संपर्क मिळू शकतील का?

इथे हा प्रश्न अस्थायी असेल तर योग्य धाग्यावर हलवावा ही विनंती.

आगाऊ धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बजेट किती आहे? "एअर बीएनबी"चा पर्याय बघितला का? इतर एखाद्या विद्यार्थ्याबरोबर कदाचित सोय होऊ शकेल का ते पण बघा.

एअर बि एन बी चा पर्याय पाहिला आहे तो थोडा महाग पडतो आहे. बाकि विद्यार्थ्यांबरोबर १ तारखेपासून सोय होणार आहे. म्हणून विचारते आहे कारण माझा भाऊ २३ ला पोहोचतो आहे फ्लोरिडाला.

माझा भाऊ ३५ पेक्षा जास्त वयाचा आहे त्यामुळे कॉलेज ग्रुप वगैरे त्याला अ‍ॅप्लिकेबल नाहीये. तिथल्या माबो च्या पानावर आधिच मेसेज केला आहे, तरिहि बाकीचे प्रयत्न सुरू आहेत.

हॉटेल घ्या थोडे लांब...स्वस्त आणि मस्त... किंवा मोटेल घ्या...जेवण बाहेर करावे लागेल मात्र...
तुमच्या आते भावाचे अभिनंदन.. 35 नंतर मास्टर्स करतोय त्याबद्धल जास्त कौतुक आहे...

माझा भाऊ ३५ पेक्षा जास्त वयाचा आहे त्यामुळे कॉलेज ग्रुप वगैरे त्याला अ‍ॅप्लिकेबल नाहीये.

>>

@दक्षिणा: कॉलेज ग्रुप म्हणजे तो जिथे चालला आहे त्या कॉलेज/युनिवर्सिटीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा एक ग्रुप असेल. बरेचदा हे ग्रुप्स नवीन येणार्‍या मुलांची मदत करतात - जसे एअरपोर्टवरून पिक अप करणे, तिथे राहणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या घरी नवीन येणार्‍या मुलांची/मुलींची सुरुवातीच्या काही दिवसांकरिता बोर्डिंगची सोय करणे वगैरे. तुमचा भाऊ ३५वर्षांचा असला तरीही त्याला फेसबूक ग्रुपमधून नक्की मदत मिळेल.

मी orlando च्या suburb मध्ये राहते, तेव्हा इथे विचारुन बघते आणि काही कळल्यास कळवते. Tampa Bay मायबोली मेळावा मंडळ किंवा orlando मराठी मंडळाच्या फेसबुक ग्रुप वर विचारा. option मिळतील, St Leo पेक्षा tampa / clearwater किंवा Claremont मध्ये राहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे.

हे कॅथलिक स्कूल आहे. पाद्र्याला विचारल्यास अगदी स्वच्छ पण स्वस्त अशी सोयही होउ शकेल चर्च ची काहीतरी जागा असतेच.
खरंच मना पासून सांगते आहे.

College मधील इंडियन student association ला संपर्क साधा. ते करतात सोय. वयाचा कशी प्रोब्लेम नाही.
मी विद्यार्थी होतो तेव्हा ह्या वयाच्या बऱ्याच जणांची सोय केली होती. अर्थात माझी युनिव्हर्सिटी वेगळी होती.