दुर्ग भटकंती
साद देती सह्यशिखरे
साद देती सह्यशिखरे
या मातीशी अमुचे नाते
दर्या कड्यांची ओढ सांगे
निसर्गा संगतीच आम्हा
स्वर्ग-सुखाची चाहूल लागे
हरपून भूक तहान
विसरुन देहभान
गाठणे गडमाथा
हाच अमुचा सन्मान
केवळ भटकणे अन् फिरणे
जरी असे हाच छंद
धडपडूनही न थांबणे
यातच अमुचा आनंद
सह्यभ्रमंतीच्या ह्या क्षणांची
करितो मनी साठवण
तरिही क्षुधा शांत न होई
फिरूनी येई आठवण
महाराष्ट्राचा इतिहास सांगत
सह्याद्री असे उभा खडा
त्याला भेटून येताना मात्र
ओलाविती अमुच्या नेत्र कडा
शिवछत्रपती दैवत अमुचे
आम्हीच त्यांचे मावळे खरे
शिव-शंभूचे पराक्रम सांगत
साद देती सह्यशिखरे
चांदण्यात चढताना... गोरखगड
मार्च पर्यंतच सगळे महत्वाचे ट्रेक सुखरुप पार पडले होते... उन्हाळ्याच्या दिवसात सह्याद्रीतील ट्रेक म्हणजे फारच खडतर काम असते... तोरणा-राजगड करून महिना उलटला होता... संधन व्हॅली, उल्हास व्हॅली हे सोप्या कॅटेगीरी मोडणारा ट्रेक करायचा कट शिजला होता... पण शिजलेला कट उधळण्यास वेळ लागत नाही.
झाले ही तसेच... दिनदर्शिका चाळताना सोमवार १८ एप्रिलला चैत्र पौर्णिमा येत असल्याचे निर्दशनास आले... लगेचच मी शनिवार १६ अप्रिलच्या moonlight trekचे सुतोवाच भटकंती कट्ट्यावर केले... तरी जायचे कुठे या वर मात्र प्रश्णचिन्हच होते...
"गोरखगड!" तो प्रश्ण Yo Rocks ने सोडवला.
कुलंगशी कुस्ती ..... अन माबोसंगे मस्ती....
साद सह्याद्रीची
ह्या कथानकावर कोण किती विश्वास ठेवेल हे मला माहीत नाही, आणि ठेवावा असा माझा आग्रहही नाही. पण जे काही घडले ते माझ्या साठी नक्कीच अद्भुत होते. निसर्ग मनकवडा असतो का? Man Desires - Universe Conspires हे जे म्हणतात ते कितपत खरे आहे? अनेक प्रश्न आणि उत्तरे मात्र शून्य. इयत्ता ७ वी पासून मी अव्याहत हिंडतो आहे. पण गेली ५ वर्षे म्हणजे सुवर्णकाळ. गड, किल्ले, डोंगर, घाट हे जीवनातले महत्त्वाचे घटक झाले. रोटी, कपडा, मकान प्रमाणेच बॅकपॅकिंग आणि ट्रेक्स ही जीवनातली मूलभूत गरज झाली. जे मित्र भेटले ते ही सर्व असेच. पायाला सतत भिंगरी लागलेली. मग त्यातूनच Private Wilderness ही संकल्पना उदयास आली.