गजरे

'चांदोबा'तील हार, गजरे आणि माटुंगा मार्केट

Submitted by मामी on 14 November, 2014 - 22:49

'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्‍याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.

तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.

सखे तुझ्या केसांमधले

Submitted by मिल्या on 14 April, 2014 - 07:02

सखे तुझ्या केसांमधले गजरे दरवळतात किती
जीभ, कान, डोळे माझे नाकावर जळतात किती

पर्वत बघुनी कळते का, उन्हे त्यास छळतात किती
असंख्य डोळ्यांतुन त्याच्या अश्रू ओघळतात किती

घातलेस तू माझ्यावर जगावेगळे घाव असे
खपल्या धरल्यावर सुद्धा जखमा भळभळतात किती

प्रवासात आयुष्याच्या, पदोपदी हे जाणवते
मी सरळच चालत असतो पण रस्ते वळतात किती

तुझ्यासारखा गाव तुझा, आहे पवित्र अन् निर्मळ
झरे सोड डबकीसुद्धा, इथली खळखळतात किती

एक असा क्षण येतो की, स्तब्ध किनारा होते मन
शब्दांच्या उत्कट लाटा, येउन आदळतात किती

दारावर येते जेव्हा, मोहमयी ही झुळुक तुझी
भले भले निश्चय माझे, तेव्हा डळमळतात किती?

विषय: 
Subscribe to RSS - गजरे