मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.
मुघल ए आझम

नखशिखांत सौंदर्य !
कुणीतरी पुटपुटलं म्हणून राजकपूरनं मागं वळून पाह्यलं तर हिंदी सिनेमातला शरीफ हिरो शशीकपूर नकळत मधूबालाच्या सौंदर्याला दाद देत होता. कपूर घराण्याच्या कुठल्यातरी कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान टीव्हीवर प्यार किया तो डरना क्या हे गाणं चालू असताना घडलेला हा किस्सा...!
काही दिवसांपूर्वी एचबीओ वाहिनीवर 'अफगाण स्टार' ही डॉक्युमेंटरी पाहिली. आपल्याकडचे 'सा रे ग म प' किंवा अमेरिकेतले 'अमेरिकन आयडॉल' ह्यासारखा टॅलेंट हंट शोजची अफगाणी आवृत्ती म्हणजे अफगाण स्टार. २००९ मधली ही डॉक्युमेंटरी अफगाण स्टारच्या तिसर्या सिझनचा आढावा घेते. ह्या डॉक्युमेंटरी मधली मुख्य पात्र म्हणजे ४ स्पर्धक रफी, हमीद, लेमा आणि सेतारा आणि स्पर्धेचा सुत्रधार दाऊद. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता गाणारे हे तरुण खरच स्फुर्तीदायक आहेत.
उद्याच्या शुक्रवारी (१९ मार्च) विहिर हा उमेश कुलकर्णीचा (वळु चित्रपटाचा दिग्दर्शक) सती भावे-गिरिश कुलकर्णींच्या कथा/पटकथेवरचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मी जानेवारीमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बघितला होता. त्याच दिवशी हे टिपण लिहिले होते पण इतके दिवस इथे डकवायचे राहून गेले. आता चित्रपट प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने आज इथे पोस्ट करत आहे.
------------------------------------------------------------------------------
कठोपनिषद:
बहूनामेमि प्रथमो बहूनामेमि मध्यम:
किंस्विद् यमस्य कर्तव्यं यन्मयाऽऽद्य करिष्यति
'नटरंग'च्या प्रोमोजनी चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली होतीच. गाण्यांच्या क्लिप्स पाहून तर कधी एकदा पूर्ण गाणी ऐकायला मिळतील असं झालं. वर्तमानपत्रांत जेव्हा 'नटरंग'बद्दल लिहून आलं, तेव्हा त्यात अतुल कुलकर्णीशिवाय एक नाव प्रामुख्याने होतं, ते गुरु ठाकुर ( Guru Thakur ) यांचं. या चित्रपटाचे संवाद आणि गाणी - दोन्ही गुरु ठाकुर यांनीच लिहिलंय. मुळात त्यांची गाणी केवळ अप्रतिम, आणि त्यांना लाभलेली अजय-अतुलच्या संगीताची साथ म्हणजे दुग्धशर्करा योगच! एव्हाना ही गाणी सर्वांच्या ओठांवर खेळत आहेत यात नवल नाही. 'नटरंग'च्या संवादांत वापरलेली भाषा ही अस्सल कोल्हापुरी माणसाने लिहिलीय, असं वाटतं.