चित्रकला

समुद्राकडे...

Submitted by मॅगी on 22 June, 2019 - 03:43

परतायलाच हवं आता समुद्राकडे
एकांड्या लाटा आणि रित्या आकाशाकडे

पुरेसं आहे एक होडकं आणि दिशेपुरता एक तारा
वल्ह्याची खळबळ, फडकते सफेद शीड अन सुम्म वारा

समोर चेहरा गोंजारणारे कबरे धुके आणि क्षितिजावर फुटणारा एक निर्मम दिवस...

60273141_10158519394495884_1208243140100620288_n.jpg

Watercolor on handmade paper

शब्दखुणा: 

माझे पहिले वाहिले oil painting on canvas

Submitted by यःकश्चित on 21 April, 2019 - 06:41

पहिलाच प्रयत्न केला आहे.. खुप चुका आहेत... हळु हळु सुधारणा करतोय
तुमच्या काही सूचना असतील तर आवर्जुन सांगाव्यात..

4AD8E499-E347-42E1-9E55-A30F6E596999.jpegAB8AF2E7-AAD4-484D-968D-896F1F9148FF.jpeg

सुलेखन (कॅलिग्राफी)

Submitted by हरिहर. on 26 March, 2019 - 23:29

मी केलेली काही सुलेखने. सुलेखनासाठी मायबोलीवरील काही कवितांच्या ओळी घेतल्या आहेत. सुलेखनाच्या नावाखाली बरेच ठिकाणी अक्षरांची वळणे रेखाटताना मोकळीक घेतली आहे.
वेळेचा अभाव आणि आयपॅडवर काम करताना येणारी अनेक बंधने या मुळे सुलेखनाला अर्थातच अनेक मर्यादा आल्या आहेत. कागद, ब्रश आणि रंग हाताशी येतील तेंव्हा पुन्हा प्रयत्न करेनच.
१.
purandares.jpg
२.
shashap.jpg
३.

मराठी भाषा दिवस उपक्रम- सुलेखन

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2019 - 00:55

नमस्कार माबोकर,
म भा दिवस २०१९ निमित्त सुलेखनाचा उपक्रम जाहीर करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
सुलेखन म्हणजे कॅलिग्राफी करून तुम्ही तुमची ह्या विषयातील कला सादर करू शकता.
नियम:
१. फक्त संयोजकांनी दिलेल्या वाक्यांचा वापरच सुलेखनाकरता करायचा आहे.
२. सुलेखन स्वतः केलेले असावे, टूल वापरून केले तरी चालेल.
३. स्वतःच्या हस्ताक्षरात सुलेखन केले तरीही चालेल.
४. सुलेखन प्रकाशचित्र स्वरूपात (.jpg image) सादर करावे. ही प्रकाशचित्रे याच धाग्यावर अपलोड करावीत.

Pages

Subscribe to RSS - चित्रकला