मराठी भाषा दिवस उपक्रम- सुलेखन

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2019 - 00:55

नमस्कार माबोकर,
म भा दिवस २०१९ निमित्त सुलेखनाचा उपक्रम जाहीर करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
सुलेखन म्हणजे कॅलिग्राफी करून तुम्ही तुमची ह्या विषयातील कला सादर करू शकता.
नियम:
१. फक्त संयोजकांनी दिलेल्या वाक्यांचा वापरच सुलेखनाकरता करायचा आहे.
२. सुलेखन स्वतः केलेले असावे, टूल वापरून केले तरी चालेल.
३. स्वतःच्या हस्ताक्षरात सुलेखन केले तरीही चालेल.
४. सुलेखन प्रकाशचित्र स्वरूपात (.jpg image) सादर करावे. ही प्रकाशचित्रे याच धाग्यावर अपलोड करावीत.

सुलेखनासाठी खालीलपैकी कुठल्याही वाक्यांचा वापर करावा. एका आयडीने एकापेक्षा जास्त सुलेखने सादर केली तरी चालेलच.
१. वेडात मराठे वीर दौडले सात
२. निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
३. बकुळफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा
४. कोसळताना वर्षा अविरत, स्नानसमाधीमध्ये डुबावे
५. अलगूज वाजं मनात, भलतंच झालंया आज
६. सावळे सुंदर रूप मनोहर
७. खळखळुद्या या अदय शृंखला हातापायांत
८. मी गाताना गीत तुला लडिवाळा हा कंठ दाटुनी आला
९. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
१०. मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त उपक्रम.
शशांक पुरंदरे यांच्या आजच्या कवितेतील ओळही द्या ना एखादी.

मस्त उपक्रम..

प्रयत्न करतो एखदे सुलेखन करायचा

मस्तच पॅपिलॉन, रेषांमधून दौड दिसत्ये अगदी
तुमचे अजून काही सुलेखन बघायला आवडेल

मला आधी वाटलं, स्वतःच्या हस्ते लिहून ते फोटो काढून अपलोड करायचं... Sad

मग हे कसं केलंय ? तुषार ? मार्गदर्शन करा ना स्टेप बाय स्टेप... हा तर फोटू वाटतुया

स्वतःच्या हस्ते लिहून ते फोटो काढून अपलोड करायचं>> ते हि चालणारच आहे असं म्हटलंय वर .. दोन्हीही चालणार आहे
मलापण नव्हतं माहिती कि असं टूल वापरून सुलेखन करता येतं ते!! आज च पाहिलं

खूप धन्यवाद ! अंजली, किल्ली, हर्पेन आणि मयुरी

@ हर्पेन >> हो नक्कीच
@ मयुरी >> मी हे सुलेखन कोरल ड्रॉ ह्या सॉफ्टवेअर वर माउस चा वापर करून केलय
हो मात्र त्यासाठी थोडी प्रॅक्टिस हवी Happy आणि बॅकग्राऊंड साठी काही त्यातलीच इफेक्टस वापरली आहे.

मला आधी वाटलं, स्वतःच्या हस्ते लिहून ते फोटो काढून अपलोड करायचं >>> तुम्ही हातानेही सुलेखन करू शकता

पॅपीलॉन, अप्रतिम आहे.

त्या फाँटमधून होणारा पळणार्‍या घोड्यांचा आभास, तो लाल रंग आणि बॅकग्राऊंड सगळंच खूप परीणामकारक आहे.

>>> माझे काय चुकते आहे?
तुम्ही 'सूर्य'चा सू र्‍हस्व काढला आहे! Happy

मस्त आहेत सुलेखनं Happy
मला इतका वेळ हे धागे दिसतच नव्हते ग्रूपची सदस्य नसल्यामुळे - धागे पब्लिक करायला हवे आहेत का?

शाली, हे मस्त जमलंय. तो अडकल्याचा फील मस्त आहे.

फक्त तो 'सु'र्य आणि तो पण निळा? त्या रंगामागे तुमचा काही विचार असला तर तो समजला नाही. कारण 'मार्तंड जे तापहीन' अशा ओळीतही सूर्याला निळा कल्पणे कठीण आहे.

माधव थोडा बदल करुन तेच सुलेखन पुन्हा देत आहे. खरं तर कॅलीग्राफी करायचा प्रयत्न चार दिवसांपुर्वी केला. तेवढाच अनुभव आहे यातला. गोंधळ होतो. अगोदर रेड कलर केले होते पण पण पोस्ट करताना ब्लु लेयर डिलीट केलेच नाही. Happy
सुर्य फायनल.png

पॅपिलॉन आणि शाली, मस्तच झाली आहेत सुलेखने!
शाली, दुसऱ्या इमेजमधे मागचा सूर्याचा इफेक्टही गायब झालाय. तो छान दिसत होता आधीच्या इमेजमध्ये. आणि ते जरा 'सू' र्य करा की! सुर्य नको Happy

दुसऱ्या इमेजमधे मागचा सूर्याचा इफेक्टही गायब झालाय. तो छान दिसत होता >>> +१

ती बॅकग्राऊंड ग्रे स्केलने केली तर मस्त इफेक्ट येइल.

Sulekhan.jpg

Pages