मराठी भाषा दिवस उपक्रम- सुलेखन

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2019 - 00:55

नमस्कार माबोकर,
म भा दिवस २०१९ निमित्त सुलेखनाचा उपक्रम जाहीर करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
सुलेखन म्हणजे कॅलिग्राफी करून तुम्ही तुमची ह्या विषयातील कला सादर करू शकता.
नियम:
१. फक्त संयोजकांनी दिलेल्या वाक्यांचा वापरच सुलेखनाकरता करायचा आहे.
२. सुलेखन स्वतः केलेले असावे, टूल वापरून केले तरी चालेल.
३. स्वतःच्या हस्ताक्षरात सुलेखन केले तरीही चालेल.
४. सुलेखन प्रकाशचित्र स्वरूपात (.jpg image) सादर करावे. ही प्रकाशचित्रे याच धाग्यावर अपलोड करावीत.

सुलेखनासाठी खालीलपैकी कुठल्याही वाक्यांचा वापर करावा. एका आयडीने एकापेक्षा जास्त सुलेखने सादर केली तरी चालेलच.
१. वेडात मराठे वीर दौडले सात
२. निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
३. बकुळफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा
४. कोसळताना वर्षा अविरत, स्नानसमाधीमध्ये डुबावे
५. अलगूज वाजं मनात, भलतंच झालंया आज
६. सावळे सुंदर रूप मनोहर
७. खळखळुद्या या अदय शृंखला हातापायांत
८. मी गाताना गीत तुला लडिवाळा हा कंठ दाटुनी आला
९. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
१०. मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages