watercolor

समुद्राकडे...

Submitted by मॅगी on 22 June, 2019 - 03:43

परतायलाच हवं आता समुद्राकडे
एकांड्या लाटा आणि रित्या आकाशाकडे

पुरेसं आहे एक होडकं आणि दिशेपुरता एक तारा
वल्ह्याची खळबळ, फडकते सफेद शीड अन सुम्म वारा

समोर चेहरा गोंजारणारे कबरे धुके आणि क्षितिजावर फुटणारा एक निर्मम दिवस...

60273141_10158519394495884_1208243140100620288_n.jpg

Watercolor on handmade paper

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - watercolor