कॅलिग्राफी पेन (DIY)
माझ्या मित्राच्या कथांचा संग्रह प्रकाशित करायचे ठरले. मग काय, घरचे कार्य असल्यासारखा मला उत्साह आला. कथांची निवड, थोडेफार एडिटींग, कथासंग्रहाचे नाव या पासुन ते मुहूर्त कधीचा आणि प्रमुख पाहुणे कोण येथपर्यंत सगळ्या गोष्टींची धांदल उडाली. एकदा असच घरी बसलो असताना त्याच्या कथासंग्रहाचे नाव सुचले. मग नावाबरोबरच एक रफ स्केच काढुन मित्राला टेलेग्राम केले. त्याला नाव तर आवडलेच पण त्या स्केचवर तो खुप खुश झाला. त्यानंतर त्याने माझ्या मागे तगादाच लावला की कसेही होवो पण मुखपृष्ठ तुच करायचे. घरचेच पुस्तक आणि घरचेच प्रकाशन असल्याने मीही उत्साहात मुखपृष्ठ तयार केले.