श्री. अच्युत गोडबोले हे मूळचे संगणकतज्ज्ञ. अनेक बड्या कंपन्यांचे सीईओ आणि संगणकशास्त्रावरील पुस्तकांचे लेखक. पण ही काही त्यांची संपूर्ण ओळख नाही. किंबहुना त्यांची संपूर्ण ओळख करून देणं शक्यही नाही. संगीत, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य, तंत्रज्ञान, विज्ञान, गणित या विषयांचा त्यांचा अभ्यास चकित करणारा आहे.
घोटाळे
ज्याच्या-त्याच्या कार्यासाठी
ज्याचे-त्याचे कक्ष असते
अन् कुठे काय खाता येते
यावर सर्वांचे लक्ष असते
जिथे विकास करायचा तिथे
भ्रष्टाचारी बिंब वाजत आहेत
अन् विकासापेक्षाही जास्त
इथे घोटाळे गाजत आहेत,.!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
भानगड खर्चाची
ऐपत जर असेल तर
खर्च कुठेही करता येतो
विनाकारण खर्चाचाही
कधी भुर्दंड भरता येतो
मात्र ऐपत जर नसेल तर
गरजांनाही शमवावं लागतं
अन् काहीतरी गमवण्यासाठी
काहीतरी कमवावं लागतं,...!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
भानगड खर्चाची
ऐपत जर असेल तर
खर्च कुठेही करता येतो
विनाकारण खर्चाचाही
कधी भुर्दंड भरता येतो
मात्र ऐपत जर नसेल तर
गरजांनाही शमवावं लागतं
अन् काहीतरी गमवण्यासाठी
काहीतरी कमवावं लागतं,...!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
"क"ची किंमत
कुणाला कमी समजत
आकलेचे तारे पिंजु नये
कुणाची किंमत कुणीही
कधीही कमी समजु नये
रोडवरती असणाराही कुणी
कधी-कधी करोडपती होतो
अन् किंमतीचा "क" गेला तर
करोडपतीचाही रोडपती होतो
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
भारतीय संस्कृती ही पर्यावरण विचारी आणि निसर्गसंवर्धक आहे. प्राचीन संस्कृत वाड्मयात त्याचे दाखले सर्वत्र मिळतात. वराहपुराणात सांगितलंय की -
यावत् भूमंडलात् धत्ते सशैलवनकाननम् ।
तावत् तिष्ठान्ति मेदिन्यां संतति, पुत्र पौतृकी ॥
म्हणजे जोपर्यंत या भूतलावर पर्वत, वने, आणि सरोवर आहेत तोपर्यंत तुम्ही, तुमची मुले व भावी पिढ्या सुखाने जगतील. हे वाक्य प्रश्नार्थक झालंय ना?
यशाची उमेद
यशासाठी प्रयत्न असतात
अपयशानं हरायचं नसतं
प्रयत्नापासुन दूर कधीच
अपयशानं सरायचं नसतं
मिळालंच अपयश तरी
मनी नाराजी मिरवु नये
प्रयत्नांती यश मिळतंच
आपली उमेद हरवू नये
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
तंबाखु,...!
कुणी विरोधात आहेत तर
कुणी-कुणी हितचिंतक आहेत
तंबाखु टिकवण्याच्या बाता
आता भलत्याच भंपक आहेत
तंबाखुच्या योग्य-अयोग्यतेवरती
अकलेचे कांदे ना फूत्करले जावे
ज्यांनाही तंबाखुने बरबाद केले
त्यांनाच वास्तव विचारले जावे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३