कांद्याच्या धंद्यात
कांद्याचा तुटवडा भासताच
व्यापार्यांनी भाव वाढवले
ज्यांनी कांद्याला घडवले
कांद्याने त्यांनाही रडवले
व्यापारी मित्रांनाही कांदा
शेतकर्यांनीच पुरवला आहे
मात्र या कांद्याच्या धंद्यामधून
शेतकरी जणू हरवला आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कांद्याचा भाव,...
ज्यांनी पिकवले कांदे
त्यांचेच झालेत वांदे
तरीही जोरात आहेत
इथे कांद्याचेच धंदे
कांद्याची झालेली भाववाढ
हा कटू नीतीचा डाव आहे
ज्यांनी कांदे पिकवले नाही
त्यांच्याच कांद्याला भाव आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
यश मिळवताना
यश मिळवायचं असेल तर
प्रयत्न हे करावे लागतात
ध्येयपुर्तीचे ध्येय वेडे
मनामध्ये भरावे लागतात
ध्येयही त्यांचेच पुर्ण होतात
ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते
मात्र इच्छा हिन माणसांकडून
उदासिनतेचीच खळबळ असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
छोटे दुकानदार, शो- रुम, सर्विस स्टेशन, डॉक्टर, वकील, बॅन्क, पतसंस्था, समाजसेवी संस्था, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, वाचनालय इत्यादी साठी उपयुक्त!
महोदय,
आपण सुरु करणार असणार्या / सुरु असलेल्या सर्व उपक्रमांमध्ये आपल्या सर्व सहकार्यांिना व ग्राहकांना सामावुन घेण्यासाठी त्यांचेशी जलद व तत्पर सम्पर्कात असणे गरजेचे आहे.
फिल्मी रेकॉर्ड
कुणी तरी बनवुन जातो
बाकीचे मग मोडत बसतात
वेग-वेगळ्या कमाईने
नवा रेकॉर्ड जोडत असतात
कुणी दुसर्याचे तर कुणी
स्वत:चेच तोडत असतात
पण त्यांचे रेकॉर्ड घडवण्यासाठी
प्रेक्षकच धडपडत असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
लाच
कधी टेबला वरून असते
कधी टेबला खालुन असते
कधी-कधी न बोलताच तर
कधी-कधी बोलुन असते
दिली-घेतली जाणारी लाच
दोन्हीही बाजुने गुन्हा असते
कायद्यानं गुन्हा असली तरी
वास्तवात पुन्हा-पुन्हा असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आधार
याचा त्याला आधार असतो
त्याचा याला आधार असतो
आधार देता-घेताना कधी
आधार हाच गद्दार असतो
मना-मनातुन मना-मनावर
घाता-पाताचा वार नसावा
विश्वासानं दिला घेतलेला
आधार कधी गद्दार नसावा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
छुप्या संपत्ती
कमावण्याला बंधन नाही
हेतु शुध्द असायला हवा
कमावलेला एक-एक पै
नीतीबध्द दिसायला हवा
ज्यांनाही याचे भान आहेत
त्यांच्या श्रीमंतीला मान आहे
नसता छुप्या संपत्ती या तर
काळ्या बाजारची घाण आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
नुकतेच माझे ऑफिसात जायचे काळे बूट वापरून वापरून नरम झाले आहेत. आज घालुन बघता असे लक्षात आले की या बुटांचे चामडे लवकरच राम म्हणेल.
त्यामुळे बुट पायातून अलगद मधेच सटकतो.
असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे चामडे कायमस्वरुपी कडक होऊन पायात व्यवस्थित बसतील?
बुट कोणत्या प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेला आहे व कोणत्या प्राण्याच्या कातड्यावर तो चढविला जाणार आहे त्यावरही कडक/नरमपणा अवलंबुन असतो का?
कृपया जाणकार/तज्ञांनी सल्ला द्यावा.
मझि एक मैत्रिन बडोद्यात अस्ते ... ति एथे पुण्यात ड्रेस material पथावते ... आनि मि एथे विकनर ,,,,
any suggestions for this...
व्यवसाय मार्ग्दर्शन ,.
सध्याची नोकरी सोडून करावं? का हे चालू आहे तेच करावं ?