धंदा अपना अपना
प्रत्येकाच्या स्वभावाचे
वेग-वेगळे पैलु असतात
कुणाचे वागणे चकचकीत
तर कुणाचे मैलु असतात
इमानदारीचा धंदा इथे
बेइमानी मध्ये घोळतो
मात्र बेईमानीची धंदा
इमानदारीत चालतो,.?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
तीचा संसार
त्याच्या विना तीची हौस
फिटता फिटणार नाही
त्याच्या सहकार्याविना
तीचा संसार थाटणार नाही
आता या गोष्टीचीही
येऊ लागलीय साक्ष
ती आहे केबल टि.व्ही.
तो आहे सेट-टॉप-बॉक्स
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
पॅनकार्ड अनिवार्य
व्यवहारांचे कार्यही
आता अडले जातील
वेग-वेगळ्या व्यवहारांत
पॅनकार्ड धाडले जातील
कुणाला वाटेल खोळंबा
कुणाला वाटेल गार्ड आहेत
वेग-वेगळ्या क्रियांसाठी
अनिवार्य पॅनकार्ड आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
उपेक्षितांचा थर्टी फर्स्ट
कवी :- विशाल मस्के
मो.नं. :- 9730573783
त्या बदलत्या क्षणांचे,साक्षीदार होऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| धृ ||
त्या रंगीन दूनियेत
चल प्रकाशात लख्ख
मिळेल तो आनंद
वाटेल थोडं दू:ख
आपल्या जगण्यावरती दू:खी नको होऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| १ ||
तुझ्या-माझ्या जगण्याला
दारिद्रयानं घेरलंय
आपलं बालपणही सारं
मायेविना सरलंय
त्यांच्या आनंदाची मजा डोळेभरून घेऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| २ ||
ते आतिशबाजी रंग
झाले आकाशात दंग
जागतीया आज
रात चांदण्यांच्या संग
फूटत्या फटाक्यांना साद टाळ्यांची देऊ
ग्राहकांची खेचा-खेची
जेवढी पब्लिसिटी जास्त
तेवढा बिझनेस जास्त
पब्लिसिटीला कमी तर
जणू बिझनेसचाच अस्त
म्हणूनच तर शोधतात की
कशात असेल रूची
ऑफर्सने करतात सदा
ग्राहकांची खेचा-खेची
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
धाडस
कमवता येते
गमवता येते
दानात प्रॉपर्टी
सामवता येते
मात्र कमवण्या
कस लागते
अन् दान देण्या
धाडस लागते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
वादांचे सिनेमे
कमी खर्चात मोठा धमाका
पब्लिसिटी स्टंटची जादू आहे
सिनेमांवरती वाद घडणे ही
हल्ली फायद्याची बाजु आहे
आता घडणारे वाद देखील
कधी पाहिले जातील प्रेमाने
येतील सिनेमांच्या वादावरती
भविष्यात पुन्हा नवे सिनेमे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
वाईन फेवर
दारूबंदीचे नारे देखील
सर्रास इथे स्थावर आहेत
मात्र वाईन निर्मिती मध्ये
हल्ली नव-नवे फेवर आहेत
नव-नवे फेवर पिऊन-पिऊन
लोकही नको तसे झिंगतील
मात्र ही शरमेची बाब देखील
कुणी अभिमानाने सांगतील
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
सल्ले
कधी फूकटचे असतात
कधी विकतचे असतात
असे एकमेकांना सल्ले
अगदी निकटचे असतात
कधी सल्ले महत्वाचे
कधी कल्ले असतात
तर कधी सल्ल्या मार्फत
घमासान हल्ले असतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
डिजिटल धोका
व्यवहार डिजिटल होऊन
कॅशलेस ठरू लागले
पैशांऐवजी व्यवहारात
आता आकडेच फिरू लागले
व्यवहारात आकडे फिरवणे
हा डिजिटल झरोका आहे
मात्र या डिजिटल व्यवहारांना
डिजिटलचाच धोका आहे...?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३