स्वत: वृत्तपत्र विक्रेता असणारा तरुण पहाटे ३:३० ते ४ वाजता लवकर उठून आपल्या मी उद्योजक होणारच! या यशस्वी उपक्रमाची जाहिरात वृत्तपत्र वित्तरण करत स्वत: मेहनत करताना दिसतोय. मी उद्योजक होणारच! या उपक्रमाची एक, दोन, तीन….. नव्हे तर तब्बल 10 पर्व ठाणे, मुंबईसारख्या शहरात तरुणाईच्या उस्पुर्त उत्साहात पार पाडली. स्वताची संकल्पना यशस्वी करण्यामागे उतुंग धेय्यशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वास असलेला, दिवसरात्र काम करुन स्वप्नातील संकल्प सत्यात उतरवणारा हा धेय्यवेडा तरुण म्हणजे या उपक्रमाचा सर्वेसर्वा निलेश मोरे.
मुलुंड, ठाणे, परेल, विलेपार्ले, डोंबिवली, गिरगाव अशा ठिकाणी ९ पर्व पार पाडल्यानंतर दहावे पर्व थेट षन्मुखानंद सभागृह, माटुंगा येथे तेही यशस्वी पर्व जवळ जवळ ३५०० ते ४००० हजार प्रेक्षकांच्या उपस्थित. हे सर्व ज्यांना स्वप्नवत् वाटत होत ते निलेश मोरे आणि त्यांची सर्व टीम जी सावली सारखी मेहनत करत राहिली. हेमंत मोरे, अनीश सरवणकर, अमित परब यांसारखे अनेक साथीदार अखंड परिश्रम घेत होते. मी उद्योजक होणारच! चे आयोजक हे स्वत: वृत्तपत्र विक्रेते आहेत.
मी स्वता वृत्तपत्र विक्रेता आहे अस छाती ठोकुन सांगणारा तरुण “मी उद्योजक होणारच!” हे ब्रीद आज मुंबईकरांच्या मनावर उतरवण्यास यशस्वी झाला.
हां कार्यक्रम सुरु असतानाचा एक प्रसंग सांगतो. कार्यक्रम संपत आला होता. सिने अभिनेते व् उद्योजक श्रेयस तळपदे याचं मार्गदर्शन पर व्याख्यान संपल आणि सूत्रसंचालन करणारी समिरा गुज्जर यांनी मी उद्योजक होणारच च्या आतापर्यन्तच्या यशाचे मानकरी, ज्यांची ही संकल्पना आज मराठी माणसाच स्वप्न बनली होती त्या धेय्यवेड्या तरुणाचा या व्यासपीठावर गौरव व्हावा म्हणून निलेश मोरे याचं नाव घेतल. आणि व्यासपिठाच्या पाठीमागे सगळीकड़े चर्चा सुरु झाली. “अरे निलेश मोरे कुठे आहेत, अरे निलेश मोरे कुठे आहेत” कोणत्याही प्रसिद्धिची हाव नसलेला हां माणूस व्यासपीठावर जाण्यास तयार न्हवता. मी स्वत: व् इतर साथीदारांनी त्याला तिथपर्यंत पोहचवला.
व्यासपीठावर उपस्थित सर्व उद्योजकांनी त्याची पाठ अभिमानाने थोपटली. अशा जनजागृतीच काम करणाऱ्या निलेश मोरे सारख्या तरुणाच्या आम्ही सदैव पाठीशी उभे राहु अस विट्ठल कामत, रविंद्र प्रभुदेसाई, सुरेश हावरे, मधुकर तळवलकर, पवन आग्रवाल, अरुण दरेकर, अजित मराठे यांसारखे उद्योजक म्हणाले. एव्हढच नाही तर त्याचं तोंडभरून कौतुकही केल. मराठी माणूस आणि वृत्तपत्र विक्रेता हा व्यवसायात यावा यासाठी निलेश मोरे आणि त्यांची टीम गेली २वर्षे अविरत झटत आहेत.
मराठी माणूस आणि नोकरी हे न जुळणार समीकरण बदलण्याचा प्रयत्न आम्ही गेली २ वर्षे करत आहोत.
निलेश मोरे यांना हि संकल्पना _मुंबईतील ४० हजार वृत्तपत्र विक्रेत्यांकडे पाहून सुचली. वृत्तपत्र विक्रेता हा किती मेहनती आणि कष्टाळू असतो हे सर्वांनाच माहित आहे पहाटे ३.३०, ४.०० वाजल्यापासून त्यांचा व्यवसाय चालू होतो.
कित्येक वर्ष झाली त्यांच्या कमाईत भर पडत नाहीय. आणि ती पडावी म्हणून वेगवेगळ्या पद्दतीने व्यावसायिक मार्केटिंग, जाहिरात साठी त्यांनी या ४० हजारच्या नेटवर्कचा वापर करण्याच ठरवलं आणि त्याला प्रचंड प्रतिसादही लाभला. शिवाय मराठी माणसाला उद्योजक बनता याव म्हणून मार्गदर्शन चालू केल. मी उद्योजक होणारच ! हे व्यासपीठ त्याचाच एक भाग.
महाराष्ट्रातील आजच्या आघाडीच्या यशस्वी उद्योजकाना एकत्रित आणून “मी उद्योजक होणारच!च्या या उपक्रमातुन १ लाख लोकांना उद्योजकतेच् बाळकडू पाजणारे निलेश मोरे स्वत:च एक मेहनत, चिकाटी, आत्मविश्वास आणि उद्योगतेच् मूर्तिमंत उदाहरण आहेत.
-गणेश पावले
मी उद्योजक होणारच! समूह
काही क्षणचित्रे -
छान
छान
छान...
छान...
अभिनन्दन ............ !!!!
अभिनन्दन ............ !!!!
.---- अत्यन्त कौतुकस्पद
.---- अत्यन्त कौतुकस्पद .... जरा श्री मोरे आनी त्यान्चा उद्योग .. वाटचाल ...बद्दल अजुन कळाले तर बरे होयिल.......
कौतुकास्पद आहे. पण जरा या
कौतुकास्पद आहे. पण जरा या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती मिळाली तर बरं होईल.
निलेश नक्की काय करतात? म्हणजे
निलेश नक्की काय करतात? म्हणजे हाउप्क्रम काय आहे? करीअर गाईडन्स वगैरे?
मराठी माणूस आणि नोकरी हे न
मराठी माणूस आणि नोकरी हे न जुळणार समीकरण बदलण्याचा प्रयत्न आम्ही गेली २ वर्षे करत आहोत.
निलेश मोरे यांना हि संकल्पना _मुंबईतील ४० हजार वृत्तपत्र विक्रेत्यांकडे पाहून सुचली.
वृत्तपत्र विक्रेता हा किती मेहनती आणि कष्टाळू असतो हे सर्वांनाच माहित आहे
पहाटे ३.३०, ४.०० वाजल्यापासून त्यांचा व्यवसाय चालू होतो.
कित्येक वर्ष झाली त्यांच्या कमाईत भर पडत नाहीय.
आणि ती पडावी म्हणून वेगवेगळ्या पद्दतीने व्यावसायिक मार्केटिंग, जाहिरात साठी त्यांनी या ४० हजारच्या नेटवर्कचा वापर करण्याच ठरवलं
आणि त्याला प्रचंड प्रतिसादही लाभला.
शिवाय मराठी माणसाला उद्योजक बनत याव म्हणून मार्गदर्शन चालू केल.
मी उद्योजक होणारच ! हे व्यासपीठ त्याचाच एक भाग.
या उपक्रमामार्फत १ लाख मराठी तरुणांपर्यंत पोहचून व्यवसाय का आणि किती महत्वाचा आहे हे पटवून दिले.
अनेक यशस्वी मराठी उद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणि व्यावसायिकतेचे धडे ते मराठी तरुणाला देत असतात. आणि आहेत.
गणेश, हा वरचा प्रतिसाद मूळ
गणेश, हा वरचा प्रतिसाद मूळ धाग्यातच अॅड करा प्लीज.. म्हणजे हा सुंदर लेख पुर्ण होईल.
हो नक्की आत्ताच करतो -धन्यवाद
हो नक्की आत्ताच करतो
-धन्यवाद
छानच ! अभिनंदन
छानच ! अभिनंदन
गणेश पावले, लेखाबद्दल
गणेश पावले,
लेखाबद्दल धन्यवाद! या योजनेबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल!
आ.न.,
-गा.पै.
अरे वा. कौतुकस्पद
अरे वा. कौतुकस्पद