अंधारलेल्या आकाशात चमकणारी अग्निदळे पाहताना
प्रकाशाशी काळोखाचे अद्वैत
पाहिले आहे तुम्ही?
अवकाशाच्या काळोख्या कोपर्याकडे रोखून बघताना
मिणमिणारी अंधुक दिवली
दिसली आहे एकदम?
स्वतःतल्या अंधाराकडे हताश होऊन पाहताना
कल्पनेची अग्निशिखा अशीच चमकते,
आशेचा किरण देऊन.
अज्ञाताच्या पोकळीत दुमदुमला आहे कधी जयघोष?
"प्रज्ञेच्या सूर्या, प्रसन्न हो!"
"प्रतिभेच्या सूर्या, प्रसन्न हो!"
सूर्याने वाळूवर ठेवलेले कण चकाकतात क्षणभर
परंतु त्या प्रकाशमान सावल्यांत
प्रतिबिंब नसते त्याच्या उरातल्या कल्लोळाचे.
"जबतक बैठनेको कहां न जाये, शराफतसे खडे रहो! ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बापका घर नही"
"आपने हमेशा मुझसे... एक बिझिनेसमनकी हैसियतसेही बात की है डॅड"
================
स्वतःमधील कलागुणांच्या बळावर स्वतः महान आहोत हे सिद्ध करून दाखवणे व अधिकाधिक लोकप्रियता, जनाश्रय, पुरस्कार, आव्हानात्मक कलानिर्मीतीच्या संधी आणि एकमेवाद्वितीयता मिळवत जाणे, हे करणार्यांची शेकडो उदाहरणे भारतीय रसिकांनी आजवर पाहिली.
मोतीलाल, सोहराब मोदी, बलराज सहानी, अशोक कुमार पासून ते रणबीर कपूर आणि फरहान अख्तर! विनू मांकडपासून शिखर धवन! सेहगलपासून सोनू निगमपर्यंत! वगैरे वगैरे!
काही काही चेहर्यांमधेच एक जादू असते. असाच एक जादूभरा चेहरा प्राण यांचा. गेल्या साठ वर्षाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीमधे "व्हिलन्"चे काम करत असणारा हा अभिनेता जितका त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तितक्याच त्याच्या सहृदयतेसाठीदेखील.
यावर्षीचा चित्रपट्सृष्टीत सर्वात मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राण यांना देण्यात आलेला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन.
इथे लिहूया त्यांच्या ४०० हून अधिक असलेल्या चित्रपटांतील आपले काही आवडते क्षण.