मानस कथा

कथाशंभरी - लहानगे देव - मुग्धमानसी

Submitted by मुग्धमानसी on 7 September, 2022 - 03:01

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले….
"अरे हे काय... डोकं मागून फाटून गेलंय तुझं!"
"हो ना. तूच माझी टोपी दे ना नीट बसवून..."
"कुठून देऊ? माझाच हात तुटलाय बघ."
"आणि हे काय? तोंड काय रंगित करून ठेवलंय? केसांचं पार वाळकं गवत झालंय."
"या घरात आपण आलो तेंव्हा काय सुंदर दिसत होतो!"
"मी गोंडस गुबगुबीत, तू गोरीपान सडपातळ…. आणि आता..."
"आपल्या नशिबी असेच हाल. लहानग्या देवांना खेळवायचं, हसवायचं हेच आपलं सार्थक!"

मी झोपलेली आहे...

Submitted by मुग्धमानसी on 13 December, 2017 - 01:59

मी मीरा.

साधारण मध्यमवयीन, मध्यमवर्गीय, मध्यम बांधा, मध्यम वर्ण, मध्यम उंची, मध्यम राहणीमान... वगैरे वगैरे. थोडक्यात कुठल्याच बाबतीत कुठलंच टोक गाठण्याचा अट्टाहास नाही माझा. आता याहून जास्त स्वत:विषयी काय काय सांगावं म्हणजे मी जे सांगणार आहे ते सांगणारी कोण याचा अंदाज वाचणार्याला - म्हणजे तुम्हाला - येईल? मुळात असा अंदाज आलाच नाही तर काय बिघडतं....? तरी पण सांगतेच...

शब्दखुणा: 

गुब्बी

Submitted by मुग्धमानसी on 28 February, 2017 - 05:27

फेणीची अख्खी बाटली रिचवून तर्र झालेल्या अस्सल बेवड्यासारखी बेताल झोकांड्या घेत मी त्या करड्या गुळगुळीत डांबरी रस्त्याशी अचानक फारकत घेउन तोर्‍यानं मागे वळून तरातरा खाली दरीत उतरू लागते तेंव्हा माझी मलाच मी कुणी ’वेगळी’ आणि ’छानदार’ असल्यासारखं वाटतं. मी मोकळी हसते त्या वळणापाशी. खिदळते म्हणाना...!

शब्दखुणा: 

प्रायश्चित्त

Submitted by मुग्धमानसी on 19 July, 2016 - 05:05

पायरीवर निवांत पाय पसरून बसला होता तो. समोरच्या रेताड मातीत अस्ताव्यस्त सांडलेल्या उबदार सोनजर्द उन्हासारखा. दुपारचे तीन वाजले असावेत. पायरीभोवतालच्या गार सावलीत रेंगाळणारा आळसावलेला थोडा थोडा कंटाळा... आणि त्यातच मिसळणारा त्याच्या सिगारेटचा धूर. एकेका झुरक्यासोबत अथर्व तल्लिन होत चालला होता! हे असं सगळंच जमून आलेलं असलं की त्याचं असं ’हरवणं’ अगदी हमखास. ’तंद्री लागणं’ हा अथर्वला अगदी लहानपणापासून जडलेला जुनाट रोग. त्यापायी कित्येकदा घात झाला... पण हे ’तंद्री लागणं’ काही सुटलं नाही.

शब्दखुणा: 

संकेत - भाग ६ (अंतिम)

Submitted by मुग्धमानसी on 27 December, 2015 - 23:50

याधीचे भागः
'संकेत' भाग १ - http://www.maayboli.com/node/56790
'संकेत' भाग २ - http://www.maayboli.com/node/56815
'संकेत' भाग ३ - http://www.maayboli.com/node/56845
'संकेत' भाग ४ - http://www.maayboli.com/node/56884
'संकेत' भाग ५ - http://www.maayboli.com/node/56917
__________________________________________

मी आरशासमोर उभी आहे.
कधीकधी स्वत:ला समोरासमोर भेटावसं वाटलं की मी अशीच आरशासमोर उभी राहते. त्यावेगळा आरशाचा माझ्या घरात दुसरा कुठलाच उपयोग नाही.
ही माझ्यासमोरच्या आरशात उभी असलेली एकमेव व्यक्ती आहे जी माझ्या चेहर्‍यावरचे विद्रूप डाग पाहून दचकत नाही. किळस करत नाही.

शब्दखुणा: 

संकेत - भाग ५

Submitted by मुग्धमानसी on 24 December, 2015 - 02:05

याधीचे भागः
'संकेत' भाग १ - http://www.maayboli.com/node/56790
'संकेत' भाग २ - http://www.maayboli.com/node/56815
'संकेत' भाग ३ - http://www.maayboli.com/node/56845
'संकेत' भाग ४ - http://www.maayboli.com/node/56884
_____________________________________________

"मॅडम... तुमची तब्येत आज बरी नाहिये का?" ऑफिसला पोचल्या पोचल्या स्वातीनं विचारलं.
काय सांगणार तिला? वाटेत पसरलेले फुटल्या मडक्यांच्या खापरांचे तुकडे चुकवत चालणं किती अवघड असतं ते हिला कसं कळणार?

शब्दखुणा: 

संकेत - भाग ४

Submitted by मुग्धमानसी on 21 December, 2015 - 01:07

याधीचे भागः
'संकेत' भाग १ - http://www.maayboli.com/node/56790
'संकेत' भाग २ - http://www.maayboli.com/node/56815
'संकेत' भाग ३ - http://www.maayboli.com/node/56845
_____________________________________________

शब्दखुणा: 

संकेत - भाग ३

Submitted by मुग्धमानसी on 18 December, 2015 - 02:36

याधीचे भागः
'संकेत' भाग १ - http://www.maayboli.com/node/56790
'संकेत' भाग २ - http://www.maayboli.com/node/56815
___________________________________________

आर्ट गॅलरीच्या भिंतीवर टांगलेल्या अनेक चित्रांपैकी एका चित्रासमोर मी उभी होते. चित्रातून आरपार मला भलतंच काहीतरी दिसत असल्यासारखी.

शब्दखुणा: 

संकेत - भाग २

Submitted by मुग्धमानसी on 16 December, 2015 - 04:32

'संकेत' कथेचा या आधीचा पहिला भाग - http://www.maayboli.com/node/56790
____________________________________
तर ही फक्त सुरुवात.

त्या दिवशी पेडणेकरांसोबतची ती मिटींग मी आटोपतीच घेतली. शेवटपर्यंत तो निळा शर्ट, शाईचा डाग, चमकते डोळे, कागदाची पुडी आणि ती तीन मडकी.... सगळे तिथेच होते. माझ्या शेजारी, अवती-भवती, आत-बाहेर...

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मानस कथा