आक्कांच्या आठवणी - डॉ. आसावरी संत
डॉ. आसावरी संत या इंदिराबाईंच्या नातसून. आपल्या आक्कांच्या आठवणी त्यांनी खास मायबोलीसाठी लिहून पाठवल्या आहेत.
डॉ. आसावरी संत या इंदिराबाईंच्या नातसून. आपल्या आक्कांच्या आठवणी त्यांनी खास मायबोलीसाठी लिहून पाठवल्या आहेत.
'निराकार' हा इंदिरा संतांचा शेवटचा काव्यसंग्रह. त्यांच्या मृत्यूपूर्वी काही महिने प्रसिद्ध झालेला. बर्याच अवधीनंतर हा काव्यसंग्रह प्रसिद्ध होत असल्याने इंदिराबाईंच्या चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता होती. हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यावर समीक्षकांनी आणि वाचकांनी या कवितांचं कौतुक केलं, पण 'हा माझा शेवटचा संग्रह असेल' हे इंदिराबाईंनी लिहिलेलं वाचून अनेक हेलावले.
निर्मल निर्भर वातावरणी
धुके तरंगे धूसर धूसर,
झगमगते अन् नक्षी त्यावर
सोनेरी किरणांची सुंदर...
किंवा
तिचे स्वप्न दहा जणींसारखे
चविष्ट भरल्या ताटाचे. दोन वेळच्या बेतांचे.
इस्त्रीच्या कपड्यांचे. सजलेल्या घराचे.
कधी नाटक, कधी मैफिलीचे– शेवटच्या रांगेचे.
थट्टामस्करीचे. गप्पा गोष्टींचे.
तिचे स्वप्न दहा जणींसारखें.
पण ते पडण्यापूर्वीच तिला जाग आली
आणि मग कधी झोप लागलीच नाही.
किंवा
तुला विसरण्यासाठी