पाटलांच्या http://www.maayboli.com/node/47295 या धाग्यावरील चर्चेमध्ये मायबोलीवर ऑनलाइन जलरंग कार्यशाळा घ्यावी असा विचार पुढे आला.
मायबोलीवर अनेक कलाकार /चित्रकार मंडळी आहेत. काही आमच्यासारखे बर्याच वर्षांनी परत रंगवायला सुरु करणारे आहेत तर काहीजण अगदी सुरवातीपासून शिकण्यासाठी उत्सूक आहेत. आमच्यासारख्यांना बर्याचदा रंगवण्यासाठी कुणाच्यातरी मार्गदर्शनाची गरज असते. बर्याचवेळा एखादा क्लास /वर्कशॉप /शिबीर इ. ठिकाणी जाणं जमेलच असंही नसतं. अश्या लोकांना या कार्यशाळेच्या माध्यमातून शिकायची संधी मिळेल.
Music: Life
मिक्स मिडिया ऑन कॅनव्हास पॅनल
साइझ : ८" * १० "
मिक्स मिडिया ऑन एमडीएफ
( हे खूप छोटं आहे, २-३" व्यासाचं. याचा काय म्हणून वापर करावा अजून कळालं नाहीये. मागच्या बाजूने आरसा चिटकवून पर्समध्ये ठेवायचा छोटा आरसा बनू शकेल कदाचीत, पण हँडल /कव्हर शिवाय आरसा कसा वाटेल माहित नाही. )
बर्याच दिवसांनी परत जलरंगामध्ये चित्र रंगवून बघितलं. जलरंगामध्ये रंगवता येत नाही म्हणून हे माध्यम गेले वर्षभर वापरायचं टाळत होते.
गेल्या महिन्यात नेटवर एका ब्लॉगमध्ये खूप सारे जलरंगामधले मोर दिसले होते. मी कितीतरी वेळ ते मोर बघत बसले होते. आपणही कधीतरी असं रंगवायचं हे त्याच वेळी ठरवलं. रंगवल्यानंतर इथे लिंक द्यावी म्हणून ते चित्र शोधत होते पण सापडलं नाही. काल खूप शोधल्यावर तो ब्लॉग सापडला आणि त्या ब्लॉगलेखिकेला /चित्रकाराला मी माझं चित्र दाखवून तिच्या बॉगची लिंक देण्याची परवानगी मागितली.
http://arealpe.wordpress.com/tag/peacock-watercolor-painting/ हे या मोरासाठीचं इंस्पिरेशन.
हँडमेड कागदावर जलरंग.
साईझ -अंदाजे ए-४ (अॅक्चुअली हा कागद गोलाकर आहे )
गेल्या ४-५ दिवसात मी यामिनी रॉय या चित्रकाराची काही चित्रं बघितली. अगदी कमी रेषांमधली साधी आणि तरी एकदम मनाला भिडणारी त्यांची चित्रं खूप आवडली. आपणही त्याच प्रकारे प्रयत्न करावा या विचाराने हे चित्र काढलं.
यामिनी रॉय (की जामिनी रॉय??? ) यांच्या चित्रातल्या बायकांना चेहरा असतो आणि खूप बोलके डोळे असतात. पण मी हे रेखाटल्यावर मला आत काही रंगवावं असं वाटलंच नाही.