मुलांच्या सहामाही परीक्षा संपलेल्या असतात.आपल्या मनात 'ते नवं पार्लर कसं आहे बघून येऊया' किंवा 'अमक्या पोराच्या बड्डे पार्टीला पोराला सोडून मस्त मॉल मध्ये (मुलाच्या)बापाबरोबर फिरुया' असे विचार घोळत असतात.बापांच्या मनात 'चला ऑफिसातून घरी लवकर येऊन मस्त मॅच बघू' इ. विचार घोळत असतात.इतक्यात शाळेतून ती नोटीस येते आणि नियती खदखदून हसते!
साधारण दोनेक वर्षांपूर्वी ही कल्पना मनात उगम पावली. आजूबाजूला अनेक मित्र मैत्रीणी छान छान कलापूर्ण आणि कौशल्यपूर्ण वस्तू करत असताना बघत होते. त्याचवेळी अशा वस्तूंना मागणीही खूप असते असं लक्षात आलं आणि मग यासाठी एक वेबसाईट सुरू करावी असा विचार डोक्यात घोळायला लागला. मग काही महिन्यांपूर्वी खरंच पावलं उचलली आणि आनंदाची बातमी ही की मी नुकतीच सर्व प्रकारच्या कला-कौशल्याच्या वस्तू विकण्यासाठी एक वेबसाईट सुरू केली आहे. www.skillproducts.com
गेल्या महिन्यात मला एका क्राफ्ट सामानाच्या दुकानात एक छोटसं दागिन्यांचं कपाट मिळालं होतं. स्वतःसाठी घरी आणून ते रंगवल्यानंतर एंड प्रॉडक्ट खूपच आवडला.
मग दिवाळीमध्ये जावांना भेट देण्यासाठी मुद्दाम परत त्या दुकानातून पाच कपाटं आणली. (खरंतर आम्ही सात जणी आहोत. मला सहा कपाटं हवी होती, पण पाचच मिळाल्यानी माझं कपाट पण मी भेटवस्तूंमध्ये दिलं. आता माझ्यासाठी नविन कपाट आणून रंगवायचं आहे.)
गावाला जायच्या आधी आठवडाभरात ती पाची कपाटं रंगवून (एक कोट प्रायमरचा, दोन कोट बेस कलरचे आणि मग त्यावर डीझाइन आणि सगळ्यात शेवटी एक हात वॉर्निशचा) तयार केली.
लेकीची शाळा, नविन वर्षं सुरू झालं आणि अचानक मला माझ्या शाळेतली एक गमाडीगंमत आठवली. लेकीला ती शिकवण्याच्या निमित्ताने बर्याच दिवसांनी हस्तकलेचा अनुभव घेतला.
ती गंमत म्हणजे शाळेचं वेळापत्रक. आठवतंय का कोणाला? पुठ्ठ्याचं, दोन्ही बाजूनं उघडणारं आणि जादूनं केवळ तीनच दिवसांचं वेळापत्रक दाखवणारं? आठवलं?
माझी मावस-आत्ये सून ( माझ्या बहिणीच्या नणंदेची सून ) एक गुणी कलाकार. तिच्या अनेक कलाकृती नेहमीच वाखाणण्याजोग्या. या वर्षी ती आणि तिच्या दोघी मैत्रिणी अन त्यांच्या लेकींनी त्यांच्या सोसायटीच्या गणपतीची सजावट फार फार सुरेख केली आहे. मला त्यांची ही कला इथे दाखवावी वाटली, अन त्या तिघींनी तशी लगेच परवानगीही दिली. त्या तिघींचे मनापासून आभार अन कौतुकही.