साधारण दोनेक वर्षांपूर्वी ही कल्पना मनात उगम पावली. आजूबाजूला अनेक मित्र मैत्रीणी छान छान कलापूर्ण आणि कौशल्यपूर्ण वस्तू करत असताना बघत होते. त्याचवेळी अशा वस्तूंना मागणीही खूप असते असं लक्षात आलं आणि मग यासाठी एक वेबसाईट सुरू करावी असा विचार डोक्यात घोळायला लागला. मग काही महिन्यांपूर्वी खरंच पावलं उचलली आणि आनंदाची बातमी ही की मी नुकतीच सर्व प्रकारच्या कला-कौशल्याच्या वस्तू विकण्यासाठी एक वेबसाईट सुरू केली आहे. www.skillproducts.com
या साईटचं वैशिष्ट्य असं की केवळ नियमीत व्यवसाय करणार्यांपुरतीच ही साईट मर्यादित न ठेवता कितीही छोट्या प्रमाणावर अशा वस्तू करून विकणार्या व्यक्तींनाही यात सामील होण्याची संधी ठेवली आहे. त्यामुळे गृहिणी असोत, आपला नोकरी व्यवसाय सांभाळून फावल्या वेळात हौशीखातर काही वस्तू बनवणारे असोत, काही ठराविक सणांपुरत्याच त्या त्या सणांना उपयोगी अशा वस्तू बनवणारे असोत किंवा कॉलेजच्या सुटीत पॉकेटमनी मिळवण्यास काहीतरी बनवून विकणारे असोत सगळ्यांचं या साईटवर स्वागत आहे.
काही जणांच्या बोटात कला असते, काहींच्या डोक्यात असते तर काहींच्या नजरेत असते. अशा कोणत्याही प्रकारे कलेशी निगडीत असलेली व्यक्ती www.skillproducts.com वर आपलं नाव रजिस्टर करून वस्तू देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकते. म्हणजे कसं की काही जणी स्वतः वस्तू बनवून यावरून विकतील तर काहीजणी आपल्या डोक्यातील कल्पना दुसर्यांकडून करवून घेऊन त्या विकतील ( आणि त्यामुळे गरजू स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देतील. ) शिवाय जर तुम्ही कलारसिक असाल, तुमच्याकडे कलात्मक नजर असेल, तर अशा वस्तू बनवणार्यांकडून ( विशेषतः विविध राज्यातील पारंपारीक कलाकार) वेचक आणि वेधक वस्तू निवडून भारतभरच्या ग्राहकांना पुरवू शकता. प्रत्येकासाठी हे व्यासपीठ खुलं आहे.
आपल्या देशातल्या प्रत्येक राज्याची वेगळी अशी हस्तकलेची परंपरा आहे. त्या त्या राज्यातल्या पारंपारीक शोभेच्या वस्तू, कपडे, चपला, दागिने, बॅग्ज, भांडी कुंडी, खेळणी अशा सुरेख वस्तू ग्राहकांना नेहमीच आकर्षित करतात. याव्यतिरीक्त क्रोशा, क्विलिंग, पर्सेस, दुलया, दुपटी, लहान मुलांचे कपडे, फॅब्रिक पेंटिंग, भरतकाम, वॉलहँगिंग्ज, शिवणकाम, रुखवताचं सामान, घरगुती डेकोरेशन, रेडीमेड रांगोळ्या, दिवे, तोरणं, फ्रेम्स, दागिने, वायरवर्क, स्वेटर्स, शाली, अगरबत्ती, ग्लास पेंटिंग, विविध प्रकारच्या आणि आकाराच्या बॅग्ज, फुलं, पॉलिमर क्ले, पेपरमॅशे, सिरॅमिक इ. च्या पारंपारीक आणि आधुनिक वस्तू अशा सर्व प्रकारांना बाजारात नेहमीच मागणी असते. विविध कलाविष्कारांतून निर्माण होणार्या शोभेच्या अथवा उपयोगी वस्तू एकत्रितरित्या उपलब्ध करून देण्याची सोय या साईटद्वारे मिळणार आहे.
अनेक सणसमारंभ आणि लग्नकार्य इ मुळेही अनेकविध वस्तूंना सतत मागणी असते. लग्नसमारंभ आणि दिवाळी, राखी पौर्णिमा, होळी, गुढीपाडवा, गणपती सारखे मोठे सण हे अशा वस्तूंच्या उलाढालीकरता अगदी योग्य संधी असते. लग्नात तर जितकी हौस करावी तितकी कमीच असते. हौशीबरोबरच कलाकारांनी आपली कला दाखवायला भरपूर वाव मिळतो. याकरता मेंदी, अनेक भेटी, त्या भेटी देण्यासाठी सुबक, सुंदर रंगसंगती वापरून केलेली वैशिष्ट्यपूर्ण गिफ्ट पॅकिंग्ज, रूखवतासाठी लागणार्या विविध वस्तू, मुंडावळ्या, मण्यांनी नटवलेले नारळ, कलश, रंगित बास्केट्स आणि ट्रे. कितीतरी गोष्टी असतात. हल्ली तर मोत्यांचा आंतरपाटही बनवला जातो. तर या अशा आणि अजूनही कितीतरी वस्तू ग्राहकांसाठी साईटवर एकत्रित उपलब्ध असाव्यात असा प्रयत्न आहे. म्हणूनच अशा विविध वस्तू बनवणार्या कलाकारांनी इथे जरूर यावं असं आवाहन करावसं वाटतं.
याचबरोबर काही अगदी वैशिष्ट्यपूर्ण वस्तूही उदा. कॅलिग्राफी वापरून हातानं लिहिलेली आमंत्रणं, एखाद्या व्यक्तीला आवडतील अश्या निवडून बनवलेली परफ्यूम्सची गिफ्ट हँपर्स, पर्सनलाईज्स गिफ्ट पॅकिंग्ज, कस्टममेड टी-शर्ट प्रिंटिंग, वाढदिवसाला लागणारी रिटर्न गिफ्ट्स, टेबल-टॉप गुढ्या किंवा रेडिमेड गुढ्या, रेडिमेड पारंपारिक रांगोळ्या, राखीकरता राखी-कार्ड-कुंकूतांदूळाच्या छोट्या डब्या आणि एखादी भेट अशी एकत्र पॅकेट्स, होळीकरता रंग भरलेल्या मडक्यांचं गिफ्ट हँपर, दिवाळीसाठी दिव्यांची गिफ्ट हँपर्स, इकोफ्रेंडली गणपती अशा अनेक गोष्टींना मागणी असते. असे कोणी कलाकार असतील तर त्यांनी या साईटद्वारे आपला व्यवसाय अधिक वाढवता येइल.
लहानमोठ्या, व्यावसायिक-हौशी अशा कलाकारांव्यतिरीक्त काही संस्थाही विविध वस्तू विकत असतात. अपंगांच्या संस्था, मतिमंद मुलांच्या संस्था, अंधशाळा, स्त्रीयांचे बचतगट अशा सर्व प्रकारच्या संस्थांनाही याद्वारे जोडून घेण्याची माझी इच्छा आहे. ज्या संस्थांकडे कॉम्प्युटर आहे, इंटरनेटची सोय आहे आणि वस्तू बनवणारे हात आहेत त्या संस्थांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांच्या वस्तूंची बाजारपेठ अधिक मोठी करण्याची ही संधी जरूर घ्यावी. याबरोबरच जर कोणी कला कौशल्यावर आधारीत व्यवसाय करत असतील, क्लासेस घेत असतील (उदा. रांगोळी काढणे, मेंदी काढणे, केक बनवणे) किंवा खाद्यपदार्थ बनवून विकण्याचा व्यवसाय करत असतील तर त्यांनाही या साईटवर आपली जाहिरात अत्यंत वाजवी खर्चात देता येईल.
अशी ही सर्वसमावेशक आणि पूर्णपणे कलेला वाहिलेली साईट आहे. आपल्यातलेच जास्तीतजास्त कलाकार या व्यासपीठावर एकत्र यावेत आणि त्यांनी स्वतःच्या सृजनशीलतेला पूर्ण वाव द्यावा हाच या साईट काढण्यामागचा हेतू आहे. सध्यापुरती ही साईट केवळ भारतातच सेवा देणार आहे. पुढे भविष्यात अधिक व्यापक होईलही.
तर मायबोलीकरांनो, कलाकार विक्रेते म्हणून आणि कलारसिक ग्राहक म्हणून दोन्ही प्रकारे या वेबसाईटला आपण पाठिंबा द्यावा अशी विनंती. तुमच्या ओळखीतले कलाकार, व्यावसायिक, तुम्ही निगडीत असलेल्या संस्था अशा सर्वांपर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा.
www.skillproducts.com इथे नक्की भेट द्या. आमचं फेसबुक पेज लाईक करायलाही विसरू नका.
वा मामी, मस्त अभिनव उपक्रम
वा मामी, मस्त अभिनव उपक्रम सुरु केलात. अभिनंदन तुमचे! आता साईट बघते. आणी इतर मैत्रिणीना पण कळवते.
मामी अभिनंदन ! साईट बघितली.
मामी अभिनंदन !
साईट बघितली. छानच आहे .
मामी छान आहे साईट.
मामी छान आहे साईट.
वा मामी, मस्त अभिनव उपक्रम
वा मामी, मस्त अभिनव उपक्रम सुरु केलात. अभिनंदन तुमचे!>>>>>+१
साईट मस्त आहे.
वाह फारच छान उपक्रम ! जमल्यास
वाह फारच छान उपक्रम ! जमल्यास काही करायला आवडेल. शुभेच्छा !
छान आहे साईट मामी! उपक्रमाला
छान आहे साईट मामी!
उपक्रमाला शुभेच्छा!
(धाग्याचं नाव बदलता येईल का? हे नाव वाचून कलाकौशल्याच्या वस्तूण्साठी रॉ प्रॉडक्टससंबंधी धागा वाटतोय.
'माझी नवी वेबसाईट' असं काहितरी नावात असतं तर लई कॅची झालं असतं.)
धन्यवाद मंडळी. साती, बरं
धन्यवाद मंडळी.
साती, बरं
बदलते.
मस्त उपक्रम मामी! भरघोस
मस्त उपक्रम मामी! भरघोस वाटचालीकरता अनेक शुभेच्छा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता किती हिट्स मिळतील बघा
आता किती हिट्स मिळतील बघा मामी सकाळपर्यंत!
छान उपक्रम मामी. समजा मला
छान उपक्रम मामी.
समजा मला एखादी गोष्ट करून हवी असेल तर मी माझी requirement वेबसाईट वर टाकू शकतो का ? जेणे करून मला जे हवे आहे ते बनवून देणारे मला संपर्क करू शकतील?
मी वेबसाईट वर शोधले पण मला सापडले नाही.
अशी सोय आहे का ? नसेल तर करता येईल का ?
अभिनंदन, अतिशय स्तुत्य
अभिनंदन, अतिशय स्तुत्य उपक्रम. हार्दीक शुभेच्छा ! साईटला भेट देत राहीनच.
अतरंगी, सध्या तरी तशी सोय
अतरंगी, सध्या तरी तशी सोय नाही. मी देखिल अशी सोय असावी असा विचार करत होतेच. तुम्ही लिहिलंय त्यामु़ळे अशी सोय गरजेची आहे असं दिसतंय. लवकरच ही सोय आणण्याचा प्रयत्न करेन.
तोवर तुम्ही जर साईटवर तुम्हाला नक्की काय हवंय ते लिहून इमेल केलंत तर मी सगळ्या वेंडर्सना विचारू शकेन.
दिनेशदा, धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, त्या त्या उत्पादनावर
मामी,
त्या त्या उत्पादनावर क्लीक केल्यावर त्याची मोठी इमेज दिसेल असे काहीतरी कर प्लीज. लोकांना वस्तू निरखून बघायच्या असतात. मोअर वर क्लीक केल्यावर मोठी इमेज दिसतेय पण ती जास्त क्लीयर हवीय.
तसेच मोअर या शब्दाच्या जागी, क्लीक फॉर क्लोजर लूक.. असे काहीतरी लिही.
क्या बात है, मामी!!!! अभिनव
क्या बात है, मामी!!!!
अभिनव उपक्रम. मनापासुन अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा!!!!
मामी, मस्त दिसते आहे
मामी, मस्त दिसते आहे वेबसाईट!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनापासुन अभिनंदन आणि शुभेच्छा
नव्या उद्योगाबद्दल अभिनंदन
नव्या उद्योगाबद्दल अभिनंदन मामी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे कल्पना मामी !!
छान आहे कल्पना मामी !! वेबसाइट चे बहुधा अजून काम सुरु असेल पण डिझाइन अजून थोडे कलात्मक केले तर अजून छान होईल.
अभिनंदन आणि शुभेच्छा !!
खुप खुप अभिनंदन आणि
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा... साईट बघितली...छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन मामी. मस्त विचार.
अभिनंदन मामी. मस्त विचार.
मामी, मस्त काम! अभिनंदन आणि
मामी, मस्त काम! अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी अभिनंदन आणि शुभेच्छा.
मामी अभिनंदन आणि शुभेच्छा.
मामी , अभिनंदन आणि हार्दिक
मामी , अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
मला शक्य होईल तेव्हा नक्कीच सहभागी व्हायला आवडेल.
मामी, अभिनंदन, शुभेच्छा व छान
मामी, अभिनंदन, शुभेच्छा व छान कल्पना.
>>समजा मला एखादी गोष्ट करून
>>समजा मला एखादी गोष्ट करून हवी असेल तर मी माझी requirement वेबसाईट वर टाकू शकतो का ? जेणे करून मला जे हवे आहे ते बनवून देणारे मला संपर्क करू शकतील?>> अशी सोय ट्रेड इंडियावर उपलब्ध आहे.
अभिनंदन आणि शुभेच्छा मामी.
आधीही पाहिली होती साइट आणि
आधीही पाहिली होती साइट आणि आता प्रॉड्क्ट्स लॉन्च झाल्यावर छान च दिसतेय.
अभिनंदन आणि शुभेच्छा मामी.
अभिनंदन! स्तुत्य उपक्रम.
अभिनंदन!
स्तुत्य उपक्रम. हार्दीक शुभेच्छा.
मामी अभिनंदन ! साईट बघितली.
मामी अभिनंदन !
साईट बघितली. छानच आहे .
धन्यवाद सायो. मला हे माहित
धन्यवाद सायो. मला हे माहित नव्हते.
मामी, उद्योजक गृप मधे स्वागत.
मामी, उद्योजक गृप मधे स्वागत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमच्या उपक्रमासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा. मला वाटतं की वेबसाईटवर आणखी काम करावं लागेल.
अतिशय सुंदर आहे साइट. अभिनंदन
अतिशय सुंदर आहे साइट. अभिनंदन आणि शुभेच्छा.
Pages