चित्रकला हस्तकला

हँडपेंटेड ज्वेलरी बॉक्स

Submitted by अल्पना on 6 November, 2013 - 05:57

गेल्या महिन्यात मला एका क्राफ्ट सामानाच्या दुकानात एक छोटसं दागिन्यांचं कपाट मिळालं होतं. स्वतःसाठी घरी आणून ते रंगवल्यानंतर एंड प्रॉडक्ट खूपच आवडला.
मग दिवाळीमध्ये जावांना भेट देण्यासाठी मुद्दाम परत त्या दुकानातून पाच कपाटं आणली. (खरंतर आम्ही सात जणी आहोत. मला सहा कपाटं हवी होती, पण पाचच मिळाल्यानी माझं कपाट पण मी भेटवस्तूंमध्ये दिलं. आता माझ्यासाठी नविन कपाट आणून रंगवायचं आहे.)

गावाला जायच्या आधी आठवडाभरात ती पाची कपाटं रंगवून (एक कोट प्रायमरचा, दोन कोट बेस कलरचे आणि मग त्यावर डीझाइन आणि सगळ्यात शेवटी एक हात वॉर्निशचा) तयार केली.

विषय: 

थर्माकोल पेंटींग

Submitted by NANDALE ART on 30 May, 2013 - 02:28

साहित्य - थर्माकोल,चमकी,फ्लोरोसंट कलर, फेव्हीकोल ई.
क्रुति - प्रथम थर्माकोल वर पेन्सीलने गोल आखुन मधे पिवळा फ्लोरोसंट कलर दिला.
नंतर थर्माकोल वर गणपतीचे स्केच करुन फेव्हीकोल मध्ये थोडे पाणी व रंग टाकून गणपतीला कलर दिला.
नंतर वरुन चमकी टाकून गणपतीचे पेंटींग पुर्ण केले.
गणपतीचे पेंटींग आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कळवा..
Ganesh 3.jpg

विषय: 
Subscribe to RSS - चित्रकला  हस्तकला