फ्रॉक
क्रोशा फ्रॉक
खुप दिवसांपासुन मायबोलीवर अवल, जयवी-जयश्री आणि इतरांचे कोशा वर्क पॅटर्न पहात होते. आपणही करावे असे खुप मनाय यायचे ते पाहून. पूर्वी आई दोर्यावर विणकाम करायची. पण मला समजू लागले तोपर्यंत तिच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला म्हणून तिने सोडून दिले. पण तिने मला साखळी आणि खांब शिकवली होती. नंतर आजूबाजूचे पाहून कॉलेज लाईफच्या वेळी रुमाल वगैरे केले होते पण ते असेच पाहून केलेले होते. त्यात शास्त्रशुद्धपणा नव्हता. बेसीक नॉलेज नव्हते. कशाला काय बोलतात हेही माहीत नव्हते. शिवाय त्यात एवढा गॅप पडला होता. एकदा अवलच्या ऑनलाईन क्लासचे ऐकले. पण ऑनलाईन कितपत कळेल ह्याबद्दल मला शंकाच होती.
विणकामाचे काही नवीन पॅटर्न्स
नुकतेच काही नवीन विणले त्याचे हे फोटो
हा दोन सुयांवरचा, योक पद्धतीने केलेला जाळीच्या डिझाईनचा स्वेटर , टोपी आणि मोजे
हा मी तयार केलेला एक नवाच पॅटर्न. ब-याचदा बाळाला गुंडाळून घेतल्यावर शाल एकीकडे अन बाळ एकीकडे असे होते. फार सांभाळावे लागते. त्यावर हा उपाय. वरती टोपी अन त्यालाच जोडलेली शाल. पूर्वीची कापडी कुंचीच. जरा नव्या पद्धतीने याला मी नाव दिलं "कॅपकेप"
डावी कडे गुंडाळल्या नंतर आणि उजवी कडे पूर्ण उघडल्यावर