खुप दिवसांपासुन मायबोलीवर अवल, जयवी-जयश्री आणि इतरांचे कोशा वर्क पॅटर्न पहात होते. आपणही करावे असे खुप मनाय यायचे ते पाहून. पूर्वी आई दोर्यावर विणकाम करायची. पण मला समजू लागले तोपर्यंत तिच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला म्हणून तिने सोडून दिले. पण तिने मला साखळी आणि खांब शिकवली होती. नंतर आजूबाजूचे पाहून कॉलेज लाईफच्या वेळी रुमाल वगैरे केले होते पण ते असेच पाहून केलेले होते. त्यात शास्त्रशुद्धपणा नव्हता. बेसीक नॉलेज नव्हते. कशाला काय बोलतात हेही माहीत नव्हते. शिवाय त्यात एवढा गॅप पडला होता. एकदा अवलच्या ऑनलाईन क्लासचे ऐकले. पण ऑनलाईन कितपत कळेल ह्याबद्दल मला शंकाच होती.
त्यात एक दिवस राधाच्या वाढदिवसाच्या दरम्यान शांकली आणि आरतीने मिळून गिफ्ट पाठवले. शांकलीने सुंदर गुलाबी फ्रॉक विणलेला राधासाठी आणि अवलने मोठ्या श्रावणीसाठी स्कर्ट. सोबत एक प्रेमळ पत्र. ते क्रोशा काम पाहून तर मी शिकायचे पक्केच केले. शांकली पण इतक्या लवकर इतके सुंदर विणते हे पाहून माझा उत्साह दुणावला. मग मी लगेच आरतीला सांगुन शिकण्याचे पक्के केले.
अवलने मला पहिला एक पर्स शिकवली. त्याचे फोटो मी सगळ्यांना पाठवले तेव्हा माझ्याच नात्यातले ४ विद्यार्थी माझ्यासाठी तयार झाले जाऊबाईंना तर शिकवायला पण सुरुवात केलेय. अवलची मी सगळ्यात डोकेदुखी विद्यार्थी असावे. कारण मी रात्री घरातली कामे आवरल्यावर, मुली झोपल्यावर ११.३० ला तिला छळायला सुरुवात करते. एक दिवस तर तिला १ वाजवला होता ऑनलाईन. सहनशिल आहे बिचारी. त्यात आमच्या गप्पा जास्त आणि विणकाम कमी असा प्रकार. गप्पांमध्ये सगळ्या विद्यार्थिनींचे ती कौतुक करत असते बरं.
पर्स नंतर मी तिच्याकडे मोठ्या मुलीसाठी फ्रॉक विणायला शिकायचे पक्के केले कारण छोट्या राधासाठी आधीच शांकलीने पाठवला होता. अवलने लगेच संमती दिली आणि गप्पा मारत, हसत खेळत तिने हा फ्रॉक माझ्याकडून करवून घेतला. तिची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे. लगेच समजते. खालील २६ इंची फ्रॉक करायला जवळ जवळ २० दिवस गेले. घरात तर सगळ्यांना आवडला. आहोंनी पण भरपुर कौतुक केले. पुतण्याला खरेच वाटत नाही मी केला म्हणून पण त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवावा लागला.
पहिला फ्रॉक गुरूचरणी समर्पीत.
शाब्बास... अवलताईंचा क्लास
शाब्बास... अवलताईंचा क्लास एकदम जोरात चालु आहे तर.... सर्व विद्यार्थी प्रथम वर्गात उत्तीर्ण होत आहेत आवडले, छान आहे.
वा, अवलगुरुंच्या सगळ्याच
वा, अवलगुरुंच्या सगळ्याच शिष्या अगदी तय्यार होताहेत की.... (अवलमाताकी जय !!!)
फारच सुंदर झालाय गं जागू ......
फोटु दिसत नाहियेत......
फोटु दिसत नाहियेत......
व्वा ... जागुताई किति
व्वा ... जागुताई किति मस्त झाला आहे.... अप्रतिम
मस्त {काश मी लहान आसते हा
मस्त
{काश मी लहान आसते हा फ्रॉक घालायला :)}
भारीच!!!!!!!!!!!!
भारीच!!!!!!!!!!!!
अवलताईंचा क्लास एकदम जोरात
अवलताईंचा क्लास एकदम जोरात चालु आहे तर.... सर्व विद्यार्थी प्रथम वर्गात उत्तीर्ण होत आहेत >>>> मेरे क्लासमें सभी फर्स्ट आते है, सेकंड कोई आताच नही ( लगे रहो मुन्नाभाई )
अवलताईंच्या क्लासमधे सगळे "अव्वल" दर्जाचे विद्यार्थी आहेत तर .....
दिसले फोटु......
दिसले फोटु...... अप्रतीम......
व्वा! जागु, मस्तच. अभिनंदन!
व्वा! जागु, मस्तच. अभिनंदन!
अवलच्या सगळ्याच विद्यार्थीनी हुशार आणि चुणचुणीत आहेत. (एक सोडून )
मस्तच..
मस्तच..
क्यूट फ्रॉक आहे एकदम
क्यूट फ्रॉक आहे एकदम
मस्तच !!!!!!!
मस्तच !!!!!!!
वा.. मस्तच !!!
वा.. मस्तच !!!
खूप मस्त जागू
खूप मस्त जागू
क्यूट फ्रॉक आहे एकदम
क्यूट फ्रॉक आहे एकदम
असे गुरू असे शिष्य! जागू फार
असे गुरू असे शिष्य!
जागू फार सुंदर झालाय फ्रॉक!
फार सुंदर झालाय. एकदा शिकलेलं
फार सुंदर झालाय. एकदा शिकलेलं नाही विसरलं जात. करत रहा. नक्की जमेल.
जागुतै, मस्त.. कलर कॉम्बीनेशन
जागुतै, मस्त.. कलर कॉम्बीनेशन एकदम मस्त..
सुंदर झालाय फ्रॉक
सुंदर झालाय फ्रॉक
जागू मस्तच, अवल ताईंच्या
जागू मस्तच, अवल ताईंच्या क्लासमधे मी पण अॅड्मिशन घेतले होते...पण काहीच केले नाही, जागू चा उत्साह पाहून पुन्हा अॅड्मिशन घ्यायचा विचार करतेय्...होप अवल ताईंनी मला ब्लॅक लिस्ट केले नसेल.
मला पण ब्लॅक लिस्ट केले असेल.
मला पण ब्लॅक लिस्ट केले असेल. मी पण क्लासमधे अॅड्मिशन घेतले होते...पण काहीच केले नाही. सगळ अर्धवट ठेवल आहे.
जागू, खरोखर सुंदर झालाय फ्रॉक
जागू, खरोखर सुंदर झालाय फ्रॉक
अन अशा न कंटाळता करणा-या विद्यार्थिनी असल्या की छान होणारच ना विणकाम. जागूचे कौतुक अशासाठी की इतके सगळे व्याप, नोकरी, मुलं हे सगळे सांभाळूनही रात्री ११.३० नंतरही तिचा उत्साह बघण्यासारखा असतो. अन जराही न कंटाळता, हसत खेळत करते ती सारे. हॅट्स ऑफ टु यु जागू
>>>त्यात आमच्या गप्पा जास्त आणि विणकाम कमी असा प्रकार.<<< दे टाळी
सामी, आकांक्षा अग नाही ग, या पुन्हा आपण नक्की करू. मला कल्पना आहे घर. संसार, नोकरी इतर जबाबदा-या सगळे सांभाळून हे करायचे सोपे नाही, पण मिळेल तेव्हा विणत रहा. ताणतणाव, आळस, नैराश्य, कंटाळा घालवण्याचा खूप सुंदर मार्ग आहे हा! जागू, शांकली, पिंकस्वान खरे ना ?
खुप छान
खुप छान
जागुतै, मस्त फ्रॉक! अवलतै,
जागुतै, मस्त फ्रॉक!
अवलतै, सहीच थोडा वेळ मिळाला की पळत येणार मीपण!
जागू मस्तच
जागू मस्तच
जागुतै, मस्त फ्रॉक! सगळा
जागुतै, मस्त फ्रॉक!
सगळा व्याप सांभाळून शिकवायचं आणि शिकायचं दोन्ही सोपे नाही.
अवलतै, सहीच थोडा वेळ मिळाला की पळत येणार मीपण!>>>> जरा सवडीने मी पण नक्की येणार आहे क्लाससाठी.
क्युट!
क्युट!
अगं कसला गोड झालाय फ्रॉक!!
अगं कसला गोड झालाय फ्रॉक!! फारच सुंदर! हॅट्स ऑफ टु यू!! खूप आवडला....:स्मित:
जागू, अगदी खास फर्माईश
जागू,
अगदी खास फर्माईश म्हणून, एक छानसा मासा विण. खवल्यांसारखी रचना क्रोशात जमेल. तू आणि अवल
अगदी मनापासून कराल हे आणि तूझ्या लेकी पण आवडीने खेळतील. या आकारात बॅग, कुशन सहज होईल.
मस्त झालाय फ्रॉक. रंगसंगती
मस्त झालाय फ्रॉक. रंगसंगती आवडली
Pages