खुप दिवसांपासुन मायबोलीवर अवल, जयवी-जयश्री आणि इतरांचे कोशा वर्क पॅटर्न पहात होते. आपणही करावे असे खुप मनाय यायचे ते पाहून. पूर्वी आई दोर्यावर विणकाम करायची. पण मला समजू लागले तोपर्यंत तिच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला म्हणून तिने सोडून दिले. पण तिने मला साखळी आणि खांब शिकवली होती. नंतर आजूबाजूचे पाहून कॉलेज लाईफच्या वेळी रुमाल वगैरे केले होते पण ते असेच पाहून केलेले होते. त्यात शास्त्रशुद्धपणा नव्हता. बेसीक नॉलेज नव्हते. कशाला काय बोलतात हेही माहीत नव्हते. शिवाय त्यात एवढा गॅप पडला होता. एकदा अवलच्या ऑनलाईन क्लासचे ऐकले. पण ऑनलाईन कितपत कळेल ह्याबद्दल मला शंकाच होती.
त्यात एक दिवस राधाच्या वाढदिवसाच्या दरम्यान शांकली आणि आरतीने मिळून गिफ्ट पाठवले. शांकलीने सुंदर गुलाबी फ्रॉक विणलेला राधासाठी आणि अवलने मोठ्या श्रावणीसाठी स्कर्ट. सोबत एक प्रेमळ पत्र. ते क्रोशा काम पाहून तर मी शिकायचे पक्केच केले. शांकली पण इतक्या लवकर इतके सुंदर विणते हे पाहून माझा उत्साह दुणावला. मग मी लगेच आरतीला सांगुन शिकण्याचे पक्के केले.
अवलने मला पहिला एक पर्स शिकवली. त्याचे फोटो मी सगळ्यांना पाठवले तेव्हा माझ्याच नात्यातले ४ विद्यार्थी माझ्यासाठी तयार झाले जाऊबाईंना तर शिकवायला पण सुरुवात केलेय. अवलची मी सगळ्यात डोकेदुखी विद्यार्थी असावे. कारण मी रात्री घरातली कामे आवरल्यावर, मुली झोपल्यावर ११.३० ला तिला छळायला सुरुवात करते. एक दिवस तर तिला १ वाजवला होता ऑनलाईन. सहनशिल आहे बिचारी. त्यात आमच्या गप्पा जास्त आणि विणकाम कमी असा प्रकार. गप्पांमध्ये सगळ्या विद्यार्थिनींचे ती कौतुक करत असते बरं.
पर्स नंतर मी तिच्याकडे मोठ्या मुलीसाठी फ्रॉक विणायला शिकायचे पक्के केले कारण छोट्या राधासाठी आधीच शांकलीने पाठवला होता. अवलने लगेच संमती दिली आणि गप्पा मारत, हसत खेळत तिने हा फ्रॉक माझ्याकडून करवून घेतला. तिची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे. लगेच समजते. खालील २६ इंची फ्रॉक करायला जवळ जवळ २० दिवस गेले. घरात तर सगळ्यांना आवडला. आहोंनी पण भरपुर कौतुक केले. पुतण्याला खरेच वाटत नाही मी केला म्हणून पण त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवावा लागला.
पहिला फ्रॉक गुरूचरणी समर्पीत.
सुबक आणि क्यूट! रंगसंगतीपण
सुबक आणि क्यूट! रंगसंगतीपण आवडली.
वॉव, अवल गुरुजी खूश झाली
वॉव, अवल गुरुजी खूश झाली असेल गं तुझ्यावर जागु, मस्त , सुबक केलायेस
एकदम मस्त.
एकदम मस्त.
अव्वल ताई हा फ्रोक मरुन आणि
अव्वल ताई हा फ्रोक मरुन आणि पिवळा छान वाटेल का?
किती मस्त विणला आहेस, ऑनलाइन
किती मस्त विणला आहेस, ऑनलाइन क्लास लावून विणलायस असे वाटत नाही. फारच सुबक !
मानलं तुम्हाला!
मानलं तुम्हाला!
अप्रतिम रंगसंगती.. जागु,
अप्रतिम रंगसंगती..
जागु, तुस्सी ग्रेट हो!!
मस्त केलयंस गं.. वेळ काढतेस
मस्त केलयंस गं.. वेळ काढतेस ते महत्वाचे.
मला खरे तर काहीच काम नसतानाही मला अजिबात वेळ नसतो. काय करते मी हा एक मोठ्ठा प्रश्न आहे. तु मायबोलीच्या व्यसनातुन काहीतरी क्रियेटिव करतेयस. मी नुसतीच व्यसनाधीन...
अरे वा! मस्तच झालाय.
अरे वा! मस्तच झालाय.
जागू फ्रॉ़क सुरेख झालाय. तु
जागू फ्रॉ़क सुरेख झालाय.
तु काय्काय करतेस बाई!!! एक शिसान
बाई नक्की काय काय कला आहेत
बाई नक्की काय काय कला आहेत तुझ्याकडे .
क्या बात है यार..मस्तच
क्या बात है यार..मस्तच !!
अवल....तुस्सी छा गये
जागुले, मस्त दिसतोय हा फ्रॉक.
जागुले, मस्त दिसतोय हा फ्रॉक. कॉम्बिनेशनही मस्त आहे. अवल एकदम छान गुरु आहे हे तर नक्कीच.
गुरु आणि शिष्या दोघींचही खुप
गुरु आणि शिष्या दोघींचही खुप कौतुक.
अग जागु दी....मला टॉप बनवुन
अग जागु दी....मला टॉप बनवुन दे ना....... विकत घ्यायला आवडेल....
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. काही दिवस ऑफिसला आले नव्हते त्यामुळे प्रतिसाद द्यायचे राहीले.
मलाही सिकायचा आहे अवल
मलाही सिकायचा आहे अवल माडकदेडफ्रोच्\क
परफेक्ट...रंग संगति आवडलि
परफेक्ट...रंग संगति आवडलि
मस्तच दिसतोय फ्रॉक जागु आणी
मस्तच दिसतोय फ्रॉक जागु आणी ते मध्ये फुल तर छानच.
वा! जागू, मस्त झाला आहे
वा! जागू, मस्त झाला आहे फ्रॉक! रंग तर खुपच गोड आहे. तुमच्या गुरु शिष्येचे खरंच कौतुक वाटते. तुझी कमाल आहे रात्री ११.३० ला शिकवणी! बापरे!
खुप मस्त मी तर पंखाच झाले
खुप मस्त मी तर पंखाच झाले तुमची ....
ताणतणाव, आळस, नैराश्य, कंटाळा
ताणतणाव, आळस, नैराश्य, कंटाळा घालवण्याचा खूप सुंदर मार्ग आहे हा! >>+100000
बापरे, जागु
बापरे, जागु ______________________/\______________________ तुस्सी ग्रे८ हो!
Pages