नवीन मराठी चित्रपट

मनात रेंगाळणारा ‘गुलाबजाम’

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 19 April, 2018 - 02:35

तुम्हाला भारतीय स्वयंपाकातील सर्वात जास्त काय आवडतं? असं जर कोणी विचारलं तर मी तात्काळ सांगेन, सगळंच. अगदी पदार्थाच्या तयारीपासून(म्हणजे निवडणे, चिरणे, सोलणे इ.इ.) ; ते तो पदार्थ तयार करण्यापर्यंत, तिथून त्याचा ताटापासून पोटापर्यंतचा प्रवास, सगळंच
आवडतं मला. काल “गुलाबजाम” बघितला. तो बघतानाही असंच वाटलं, एक भन्नाट रेसिपी जमून गेलीय.

अकल्पित..सत्य कल्पनेपलीकडले (मराठी चित्रपट)

Submitted by छोटी on 2 March, 2014 - 21:14

एक चित्रपट नवीन धाटणीचा, नवीन कलाकारांचा, नवीन दिग्दर्शकचा. चित्रपटात काही चांगल्या गोष्टी आणि काही चुकाही असतात पण जेव्हा चांगल्या गोष्टींची संख्या जास्त असते तेव्हा काही चुका विसरतात येतात, तेव्हाच चित्रपट आवडला असं म्हणता येत, असच काहीसं “अकल्पित” च झालंय...
चांगल्या गोष्टी:
१) चित्रपटला चक्क कथा(जी आजकालच्या चित्रपटात बहुतेक वेळा नसते.)
२) दिग्दर्शक जरी नवीन असला तरी शॉट मध्ये काय हव ते माहिती होते.(संवाद नसलेले सगळेच शॉट खूप सुरेख आहेत तर काही संवाद असलेले शॉट अप्रतिम आहेत)
३) उगाच फालतू गाणे नाहीत.(एकच गाणं आहे)
४) चित्रपटाचा वेग बऱ्यापैकी सांभाळला आहे

नवीन मराठी चित्रपट-'दुनियादारी'

Submitted by मी मधुरा on 17 December, 2012 - 11:10

'दुनियादारी' नावाचे सुहास शिरवळकरांचे पुस्तक होते. त्यावर आधारित एक नवा मराठी चित्रपट घेऊन संजय जाधव येणार असल्याचे कळले आहे.
त्यात 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' मधला 'घना/घनश्याम' उर्फ स्वप्नील जोशी असून सई ताम्हणकर आणि उर्मिला कानेटकर या दोघी देखील असल्याची बातमी कळली आहे. सध्या त्या चित्रपटाच शुटींग सध्याच चालू झाल आहे. ह्या चित्रपटाची कथा कॉलेज वयीन मुलांची असून लव त्र्यान्गल ची कथा आहे.

१९ जुलै २०१३ ला हा सिनेमा येणार आहे.
आशा आहे, कि मराठीतला हा सिनेमा तरी चांगली करमणूक करेल.....!!!!

विषय: 
प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - नवीन मराठी चित्रपट