चित्रपट परिक्षण

हिंदुस्थानी ठगुल्या

Submitted by मकरंद गोडबोले on 14 November, 2018 - 03:11

आम्ही लक्ष्मी रस्त्यावर रहायचो. हे काही वाटते इतके वाईट नाही. त्याकाळी लक्ष्मी रस्त्यावर घर असणे ही खास पुणेकर स्वाभिमानाची गोष्ट होती. कुणाला पटणार नाही, पण सोमवारी आम्ही लक्ष्मी रस्त्यावर क्रिकेट खेळलेलो आहोत. ही वल्गना किंवा अतिशयोक्ती नाही, आणि मी अजून डायनोसाॅर काळात जमा झालेलो नाही.

विषय: 

मनात रेंगाळणारा ‘गुलाबजाम’

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 19 April, 2018 - 02:35

तुम्हाला भारतीय स्वयंपाकातील सर्वात जास्त काय आवडतं? असं जर कोणी विचारलं तर मी तात्काळ सांगेन, सगळंच. अगदी पदार्थाच्या तयारीपासून(म्हणजे निवडणे, चिरणे, सोलणे इ.इ.) ; ते तो पदार्थ तयार करण्यापर्यंत, तिथून त्याचा ताटापासून पोटापर्यंतचा प्रवास, सगळंच
आवडतं मला. काल “गुलाबजाम” बघितला. तो बघतानाही असंच वाटलं, एक भन्नाट रेसिपी जमून गेलीय.

चाखायलाच हवा असा - गुलाबजाम!

Submitted by निक्षिपा on 19 February, 2018 - 10:25

चाखायलाच हवा असा - गुलाबजाम!

चित्रपट परिक्षण म्हणजे नेमकं काय हे मला माहित नाही, कारण ते मी कधी केलेलं नाही. पण जे आवडतं, जे मनाला भावतं किंवा जे आतपर्यंत पोहोचतं ते मला कागदावर उमटवायला आवडतं. ‘गुलाबजाम’ चित्रपटाबाबतही नेमकं हेच झालंय.

चित्रपट सुरु होतो ते आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या मुंबई-पुण्याच्या डेक्कन क्वीनच्या सीनने. सिद्धार्थ बरोबर आपणही त्याच्या वर्तमानाचा आणि भूतकाळाचा प्रवास सुरु करतो आणि बघता बघता या गाडीच्या वेगानेच हा चित्रपट वेग पकडत जातो.

विषय: 

धुम - ३

Submitted by उदयन.. on 21 December, 2013 - 05:54

वर्षाचा सर्वात महागडा आणि आतुरतेने वाट पहायला लावणारा चित्रपट "धुम-३" काल बघण्यात आला .

यशराज बॅनरच्या "रोजगार हामी योजना" अंतर्गत अभिषेक आणि उदय यांना काम देण्याकरीता "धुम" या चित्रपटांची साखळी तयार केली आहे असे फेबु ट्विटर भाष्य केले आहे......काही अर्थी हे बरोबरच आहे..:)
खरतर धुम -१ आणि धुम-२ हे चित्रपट तयार करताना काही लॉजिक वापरलेले होते..

विषय: 

जॉली - एल.एल.बी.- सरळ साधा वॅनिला स्कुप....

Submitted by मोहन की मीरा on 18 March, 2013 - 03:34

काही काही सिनेमा आपल्याला का आवडतात ह्याचा विचार केल्यावर आश्चर्य वाटते. त्या सिनेमांत वेगळं काहीच घडत नाही.. सर धोपट मार्गाने ते चालत रहातात. पुर्वी साधारण ७०-८० च्या दशकात असे अनेक सिनेमा बनले. ज्यात काय होणार आहे हे प्रेक्षक अगदी सहज ओळखायचे. पण त्यातले हिरो आणि हिरवीणींची जबर्दस्त क्रेझ आणि अप्रतिम गाणी ह्या मुळे असे सिनेमा फारसा डोक्याला ताप न करता पहिले जायचे. कारण आपल्या अपेक्षा फार नसायच्या... हळु हळु प्रेक्षकांच्या जाणीवा बदलायला लागल्या. सामान्य प्रेक्षकांनाही उत्तम अभिनय आणि टाकलेल्या पाट्या ह्यातला फरक कळत होताच .. पण त्या कडे जागरुकतेने पाहायला पाहिजे हे समजायला लागले.

विषय: 

"The Debt" च्या निमित्ताने... : पुर्वार्ध

Submitted by विशाल कुलकर्णी on 4 May, 2012 - 08:58
Subscribe to RSS - चित्रपट परिक्षण