काही काही सिनेमा आपल्याला का आवडतात ह्याचा विचार केल्यावर आश्चर्य वाटते. त्या सिनेमांत वेगळं काहीच घडत नाही.. सर धोपट मार्गाने ते चालत रहातात. पुर्वी साधारण ७०-८० च्या दशकात असे अनेक सिनेमा बनले. ज्यात काय होणार आहे हे प्रेक्षक अगदी सहज ओळखायचे. पण त्यातले हिरो आणि हिरवीणींची जबर्दस्त क्रेझ आणि अप्रतिम गाणी ह्या मुळे असे सिनेमा फारसा डोक्याला ताप न करता पहिले जायचे. कारण आपल्या अपेक्षा फार नसायच्या... हळु हळु प्रेक्षकांच्या जाणीवा बदलायला लागल्या. सामान्य प्रेक्षकांनाही उत्तम अभिनय आणि टाकलेल्या पाट्या ह्यातला फरक कळत होताच .. पण त्या कडे जागरुकतेने पाहायला पाहिजे हे समजायला लागले. टि.व्ही> च्या आक्रमणामुळे सिनेमा वाले जागरुक झाले. नव्या गोष्टी, नव्या जाणिवा सिनेमातुन बघायला मिळायला लागल्या. नव्या दमाचे दिग्दर्शक, निर्माते, मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या बिजनेस मधे आल्या... सहाजिकच नवे वारे इथेही वाहु लागले. चांगलीच गोष्ट आहे.
तरीही काही निर्माते / दिग्दर्शक जुन्या वॅनिला ब्रँड ला कवटाळुन आहेत.... जॉली एल.एल.बी पण असाच आहे. वॅनिला आयस्क्रीम सगळ्यांना आवडतं... सगळ्यात जास्त खपणारा फ्लेवर आहे तो... ह्या सिनेमातही कथा अशीच फिरत जाते. ती कथा कोणीही लिहु शकतं... अगदी तुम्ही, मी... कोणीही... काहीच नाविन्य नाही....
तरीही मला हा सिनेमा आवडला... उगाच डोक्याला ताप नाही... गडबड नाही... तरीही काही तरी कमी... जाउदेना.. सगळ्यांनी कायम अवघड राग म्हंट्ले म्हणजेच तो मोठा काय? कोणी साधं गाणं म्हणुच नये काय.....
हा सिनेमा का बघायचा?===== अर्शद वारसीच्या टेंशन फ्री वावरा साठी... तो मुर्तिमंत जॉली वाटतो.... नावाप्रमाणे हसमुख, सगळ्यांशी दोस्ती करणारा, अपयश येतय म्हंटल्यावर बावरुन जाणारा, पामर वकील... पण वेळ येताच कणखरपणा दाखवणारा... हवा हवासा मुलगा.... आपल्या मर्यादा त्याला उत्तम माहित आहेत..... आपण काय करु शकतो हेही माहित आहे... अर्शद जरा वयस्कर दिसतो आता... तरीही त्याचा वावर मात्र खुप म्हणजे खुपच अल्हाददायक...
बरं मग काय फक्त आर्शद साठी पैसे घालायचे?----- नाही ना बमन आहे की.... बमन ह्या सिनेमात एकदम होम पिच वर खेळल्या सारखा वावरला आहे... भुमिका पण एकदम अॅटिट्युडेड वकिलाची... त्याची उंची, फिगर, अॅटिट्युड, चेहेर्यावरचा पॉलिशनेस, ह्या सगळ्याचा हा सिनेमा बनवताना प्रचंड म्हणजे प्रचंड फायदा झालेला आहे... कोर्टात त्याचा जपला जाणारा इगो, नखरा ह्याचं चित्रण अप्रतिम आहे... एकदम सुरेख....
त्यात काय आहे.. असा बमन तर अनेक सिनेमात भेटतो. अजुन काय==== हा सिनेमा ज्या व्यक्तिने एका खुर्चीवर बसुन खल्लाय तो म्हणजे सौरभ शुक्ला.... हा माणुस बाप आहे बाप.... ह्या माणसाला इंडियन ऑस्कर असेल तर ते द्यायला पाहिजे.... चेहेर्याची रेषान रेषा त्याच्या कंट्रोल मधे आहे... ह्याचा वावर म्हणजे एकदम सरप्राइज पॅकेज आहे.... काय अप्रतिम काम केलय!!!! ह्याचा रोल जज चा... एका खुर्चीवर बसलेला दाखवलाय... पण देह बोली ह्यालाच म्हणत असावेत बहुतेक.... ह्या माणसा कडे चेहेरा नाही, उंची नाही, जाडी म्हणावी अशी शरीरयष्टी तरीही आणि तरीही हा आणि हाच माणुस लक्षात रहातो..... निव्वळ अप्रतिम... हॅट्स ऑफ....
बाकी चित्रिकरण मस्त्च आहे.... कोर्टातलं वातावरण फार छान पकडलं आहे... जुने टाइपरायटर घेवुन बसलेले आशावादी वकिल, त्यांच्याच बाजुला ज्योतिष कार्यालय उघडलेले कुडमुडे ज्योतिषी, आशीलाच्या मागे असलेले वकिल, कोर्टाच्या आत विटनेस बॉक्स चा उरलेला फक्त चबुतरा.. गरगरणारे फॅन्स, गलिच्छ वातावरण, फायलिंचा बुजबुजाट, कावलेले जजेस, दिल्लीची बोली, पोलिस स्टेशन मधे बदल्या रेग्युलेट करणारा महान हवालदार, सरळ सरळ लाच घेताना होणारे सौदे, सामान्य वकिलांना परवडणारे कँटिन ( ह्या कँटिन वाल्याची भुमिका आपल्या रमेश देवांनी केली आहे. एक सुखद धक्का), जज लोकांची जुनी पानी चेंबर्स... हे सगळे बारकावे खुप छान टिपले आहेत.
ह्या सिनेमात तो बाळबोध आहे, नेहेमीच्या पठडीतला आहे, प्रेडिक्टेबल आहे म्हणुन पाठ फिरवलीत तर चांगल्या गोष्टींना मुकावं लागेल.... नीदान सौरभ शुक्ला साठी तरी हा सिनेमा बघायलाच हवा !!!!!
.
.
मस्त............आज जाणार आहे
मस्त............आज जाणार आहे
नीदान ऋषभ शुक्ला साठी तरी हा
नीदान ऋषभ शुक्ला साठी तरी हा सिनेमा बघायलाच हवा >>
'सौरभ' आहे ना तो ??
मटाच्या परीक्षणात ही सौरभ
मटाच्या परीक्षणात ही सौरभ बद्दल चांगलं लिहीलं आहे..... आज बघतोच हा शिणुमा.
केला बदल केला... स्लीप ऑफ
केला बदल केला... स्लीप ऑफ टंग...
त्यात काय आहे.. असा बमन तर
त्यात काय आहे.. असा बमन तर अनेक सिनेमात भेटतो. अजुन काय==== हा सिनेमा ज्या व्यक्तिने एका खुर्चीवर बसुन खल्लाय तो म्हणजे सौरभ शुक्ला.... हा माणुस बाप आहे बाप.... ह्या माणसाला इंडियन ऑस्कर असेल तर ते द्यायला पाहिजे.... चेहेर्याची रेषान रेषा त्याच्या कंट्रोल मधे आहे... ह्याचा वावर म्हणजे एकदम सरप्राइज पॅकेज आहे.... काय अप्रतिम काम केलय!!!! ह्याचा रोल जज चा... एका खुर्चीवर बसलेला दाखवलाय... पण देह बोली ह्यालाच म्हणत असावेत बहुतेक.... ह्या माणसा कडे चेहेरा नाही, उंची नाही, जाडी म्हणावी अशी शरीरयष्टी तरीही आणि तरीही हा आणि हाच माणुस लक्षात रहातो..... निव्वळ अप्रतिम... हॅट्स ऑफ....
>> +१००
वेगवेगळ्या पठडीतले चांगले
वेगवेगळ्या पठडीतले चांगले चित्रपट येत आहेत आता.. माझी विशलिस्ट वाढत चाललीय.
मोकीमी मस्त परीक्षण!!! मी
मोकीमी मस्त परीक्षण!!!
मी चित्रपट पाहायला गेले, त्याची कारणं होती. एक - अर्शद वारसी. आणि दुसरं - बोमन इराणी. आणि तिसरा... सौरभ शुक्ला!! येस्स!! याचं ही काम अत्यंत आवडतंच! सौरभ अभिनयाचा खरंच बाप आहे... काय मोबाईल फेस आहे त्याचा!!! रेष नी रेष बोलते चेहर्याची!! यातही तिघे अप्रतिम!!! अर्शद आणि सौरभचे छोटे छोटे हावभाव खूप आवडून गेलेत... बोमनला त्या मानाने फुटेज जास्त नव्हतंच पण असलेलं काम त्याच्या डाव्या हाताचा मळ!!! साधं सरळ कथाबीज... साधं सोप्पं टेकींग उग्गाच ग्लोरीफाय करायच्या भानगडीत पडलेले नाहीयेत... तरीही कुठेतरी वाटत राहील काही काही ठिकाणी अजूनही छान घेऊ शकले असते...
सुरूवातीच्या नामावलीला बुडबुडे सोडत जाणारा माणूस पाहून फूटपाथवर झोपणार्या क्षणभंगूर आयुष्याची आणि त्या बुडबुड्यातील प्रतिबिंबाकडे पाहत श्रीमंत बेगडीपणाची कल्पना येते....
अर्शद-बोमन्-सौरभ या त्रिकुटासाठी तर नक्की वन टाईम सी आहे...
परिचयासाठी आभार, पाहावासा
परिचयासाठी आभार, पाहावासा वाटू लागला आहे.
>>> आशीलाच्या मागे असलेले वकिल, <<<
हे अगदी मायबोलीसारखेच वाटले![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
परिचयासाठी आभार, पाहावासा
परिचयासाठी आभार, पाहावासा वाटू लागला आहे.>>> +१
छान लिहीलय
अॅटिट्युडेड << म्हणजे काय?
अॅटिट्युडेड <<
म्हणजे काय?
कणखर्पणा म्हणजे शूर्पणखेची
कणखर्पणा म्हणजे शूर्पणखेची बहीण असेल असे वाटून एकदम हसू आले. अर्शद आणि बमन, सौरभ छान काम करतात.
अॅटिट्युडेड << म्हणजे
अॅटिट्युडेड <<
म्हणजे काय?>>>
माजोरडा.....
अमा....
कधी कधी की बोर्ड काय काय घ्वटाळे करतो......
ह्म्म मी हा शब्द पहिल्यांदाच
ह्म्म मी हा शब्द पहिल्यांदाच ऐकलाय.