स्वप्न
रम्य पहाटेचा आस्वाद घेत
फेरफटका मारायला गेले होते
सोनेरी सूर्योदय डोळे भरून पहात होते ll
पक्षांचा किलबिलाट मन प्रसन्न करीत होता
हे तर सगळे हवेहवेसे वाटत होते ll
हिरव्यागार झाडाजवळ एक वठलेले झाड
सुंदर दिसत होते कारण...
त्यामधे पालवी फुटल्याचे स्वप्न दिसत होते ll
तु फक्त एकदा हो म्हण...
तु फक्त एकदा हो म्हण
तुझी व्हायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण
सगळं जग विसरायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण,
सगळं समर्पित करायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण
तुझ्यात आकंठ बुडायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण
पूर्णपणे तुझ्यात सामावयाला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण..
आपल्या मैत्रीला सुंदर प्रेमाचं रुप द्यायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण.... तु फक्त एकदा हो म्हण.....
नववर्ष
नव्या वर्षाकडे जात असता
देऊ निरोप सरणा-या वर्षाला..
मात्र अजुनही काही कटु गोष्टी
सलतात या मनाला..
भारतीय राजकारणाची नौका
अजुनही हेलकावते..
सामाजिक पातळीवर घडणा-या
धक्कादायक घटनांनी मन काळवंडते...
या पार्श्वभूमीवर 2013 सालात
करू प्रवेश जिद्दीने..
समोर ठाकणारी कितीही कठीण आव्हाने
पेलू आपण एकदिलाने...
----तुला कधी कळलेच नाही..-----
मी कळीचे फुल झाले
ते तुला कळलेच नाही..
पाकळ्यांना स्पर्श करणे
तुला जमलेच नाही..
तुला पाहुन थोडे झुकावेसे वाटते पापण्यांना
गालीच्या गाली हसावे वाटते या खळीला
हे वेड तुला कसे दिसलेच नाही..
मोकळ्या केसात माझ्या
तु फुले माळू नकोस
लाज-या ह्रद्यास असा तू जाळू नकोस
मखमलीच्या वेदना सांगायला तुला धजावलेच नाही...
बोलक्या मौनामधुनी मी केले इशारे
अन् गाण्यामधुनी नवे हितगुज केले
पण अरसिका ....
तुझ्या काळजाला कसे उमगलेच नाही
मी कळीचे फुल झाले....
- प्रेम -
बोलण्यासाठी गरज नसते शब्दांची
आनंद दाखवायला गरज नसते हास्याची
दु:ख दाखवायला गरज नसते आसवांची
ज्यामध्ये सारे समजते ते म्हणजे...
मनाला ठेवते जवळ करून
सुख-दु:खात स्वत:ला घेते सामावून
विश्वासाचा धागा असतो एक
जोडले जाते ते नाते
जडते ती सवय
थांबते ती ओढ
वाढते ते प्रेम
संपतो तो श्वास
निरंतर राहते ते ....प्रेम.
-श्रावण आला-
भिजऱ्या आषाढlला निरोप देत श्रावण येतो
श्रावण म्हणजे उत्साह चैतन्य
मानवाच्या मनात झिरपणारा
वयाची मर्यादा आड येऊ न देणारा
हातपाय पसरून विसावलेला
पावसाच्या गंधात न्हाऊन निघणारा
मनातही खेळ रुणझुणत राहणारा
कवितांच्या सरी facebook वर बरसात राहणारा
भावाबहिणीच्या नात्याचे अस्सल रंग दाखविणारा
श्रावणात इंद्रधनुष्याची कमान क्षितिजावर उमटविणारा
अस्सल गर्भरेशमी हिरवा रंग तसाच ताजा दाखविणारा .....
-लंडन ऑलिम्पिक-
लंडन आणि ऑलिम्पिक हे समानार्थी शब्द बनलेत
जगातील सर्व रस्ते, विमानमार्ग, जलमार्ग त्या दिशेने वळलेत ll
विविध वर्णांचे लोक एकमेकांत वर्तुळा प्रमाणे गुंफले
जसा ऑलिम्पिकचे वर्तुळ मिरवणारा लंडनचा टॉवर ब्रिज ll
जगभरातले खेळाडू एकत्र आलेत
विश्वबंधुता, समानता, एकता ह्यांची शिकवण देत आलेत ll
कोण हरणार कोण जिंकणार हे कोणालाही माहित नाही
पण त्या निमित्ताने परस्परांची कला संस्कृती भाषा -
यांचा गोफ गुंफण्याची संधीही सोडत नाही ll