मैत्री
मैत्री पाण्यासारख़ी निर्मळ करा
दूर जाऊनसुद्धा क्षणोक्षणी आठवेल अशी करा..
चंद्रता-यासारखी अतुट करा
ओंजळीत घेउनसुद्धा न मावेल अशी करा..
दिव्यातल्या वातीसारखी
करा निसर्गापेक्षाही सुंदर करा..
शेवटपर्यंत निभावण्याकरता
मरणसुद्धा जवळ क़रा..
--आराधना --
गोफ हळव्या भावनांचा
अनुराग आहे..
प्रेम काळजाने छेडलेला
राग आहे..
जीवनाला देई सुर अशी
संवेदना आहे..
बासरीचा सुर सांगे
प्रेम राधा शाम आहे..
मीरेच्या मुखी
मोहनाचे नाम आहे..
प्रेमभक्ती प्रेमशक्ती
प्रेम आहे प्रार्थना..
प्रेम आहे साधना
प्रेम हिच आराधना..
आयुष्याच्या वाटेवर भेटलास तु
निर्व्याज प्रेमाला साथ दिलीस तु II
तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
हा एकच ध्यास असेल II
तुझी खुप भरभराट होवो
ही एकच आस असेल II
तुझे दु:ख मला मिळो
सर्व सुखे तुला मिळोत II
परमेश्वराकडे ही एकच प्रार्थना करीन
निरंतर तुझ्यावर प्रेम करत राहीन II
फक्त तुझीच होउन जगत राहीन
फक्त तुझीच होउन जगत राहीन II
....फक्त तुझ्याचसाठी....
आकाशात असशील तर
चांदणे होवून चमकत राहीन....
देव्हा-यात असशील तर
दिवा होवून जळत राहीन....
ह्र्दयात असशील तर
श्वास होवून जगत राहीन....
मनापासुन प्रेम करते
तुझीच सावली बनुन राहीन....
आली कितीही संकटे
तरी सोडणार नाही साथ
फक्त तुझीच बनुन राहीन....
फक्त तुझीच बनुन राहीन....
प्रेम म्हणजे...
प्रेमाचा साक्षात्कार काव्य
रुपाने पडतो बाहेर...
ह्रदयाची तार
सुरेलपणे झंकारते
प्रेमाचे क्षण म्हणजे
आयुष्यातील घडी असते...
तिचा पुसटसा स्पर्श, आभास
जीवनाची दिशाच बदलून टाकते
काहीतरी करण्याची,काहीतरी बनण्यासाठी
प्रेरणादायक ठरते...
काहीतरी हरवलेले
कधीतरी गवसते
अंधकारमय जीवनात
प्रकाशाची ज्योत पेटवते...
क्षण आनंदाचे....
एकमेकांना भेटण्यासाठी आतुर होतो
एकमेकांच्या सानिध्यात जगण्यास प्रत्येक क्षण
हवाहवासा वाटतो...
एकमेकांच्या स्पर्शाने मोहरुन जातो
परस्परांचे बोलणे
मन:पुर्वक ऐकुन घेतो...
सुखाचा आनंदाचा झरा
झुळूझुळू वाहतो
पण.... आनंदाचे क्षणचं उराशी बाळगतो...
....रेशीमगाठी....
प्रेमात असतो विश्वास
असतं अतुट बंधन ..
सहवास असतो हसता खेळता
त्याच्यासाठी नही व्याख्या..
असतात त्या रेशीमगाठी
थंडगार स्पर्श करणारी..
पहाटेच्या दवासारखी
तनामनात सुगंध पसरवणारी.. केवड्यासारखी
मनाला नवचैतन्य देणारी.. सुर्योदयासारखी
तावुन सुलाखून चमचमणा-या.. सोन्यासारखी
फक्त तुझीच...
माडाच्या बनात तुझ्याजवळ उभी होते
अलगद तुझ्या मिठीत विसावले होते..
प्रीतित आकंठ बुडाले होते
मन मात्र बेभान झाले होते..
तुझ्या मिठीत सारे जग विसरले होते
क्षणाचा विलंब न करता --
...फक्त तुझीच झाले होते
...फक्त तुझीच झाले होते
...तुझ्या नजरेत शोधताना....
तुझ्या नजरेत शोधताना
तु हसलीस गोड गालात ...
चांदण्यांचे आभाळ हळूच आले खाली
अबोल प्रीत अबोल भाव झंकारले मनात...
अंतरीच्या मनात हळूच झाली पहाट
आणि मिलनाचे स्वप्न साकारले क्षणात...
सुईने विणले रेशमी अतुट धागे
धाग्यात गुंफलेले धागे जागे झाले स्वप्नात...
एकमेकांच्या हृद्यात कोरलेली भाषा
फक्त तुला व मलाच कळली
फक्त तुला व मलाच कळली.....
--मकर संक्रांत--
मकर संक्रांत हा आनंदाचा सण असतो
तीळगुळ घ्या आणि गोड बोला हा संदेश द्यायचा असतो...
तीळगुळाची देवाण घेवाण करायची असते
नवीन स्नेहसंबंध जोडायचे असतात....
जुने असलेले समृध्द करायचे असतात
तुटलेले आवर्जुन पुर्ववत करायचे असतात...
स्नेह वाढवायचा असतो
जीवनात आनंद फुलवायचा असतो...
----- तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला----