Sangeeta009

झिम्माड पाउस...

Submitted by Sangeeta Kulkarni on 15 September, 2013 - 12:04

झिम्माड पाउस...

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर
झिम्माड पावसाला झाली सुरुवात...

भेटण्यासाठी अधीर झाले
समुद्रकिना-यावर धावत गेले...

तुफान सरी बेभान वारा
बेधुंद झाला आसमंत सारा...

अंगाशी झोंबत होता
लडीवाळ वारा...

मस्तीत स्पर्शून जात होत्या
फेसाळणा-या लाटा...

बेधुंद होउन मी
मजेत गात होते...

लाटांच्या संगीतावरही
थिरकत होते...

मनाला चिंब भिजवणा-या पावसात
मनसोक्त भिजावेसे वाटत होते...

शब्दखुणा: 

प्रेम म्हणजे...(Revised)

Submitted by Sangeeta Kulkarni on 31 August, 2013 - 14:51

प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे, एक कविता
आयुष्यभर करीत रहावे...

प्रेम म्हणजे, सुंदर गजल
नेहमी गुणगुणत रहावे...

प्रेम म्हणजे, सुंदर गिटार
आवडत्या व्यक्तीला ऐकवत रहावे...

प्रेम म्हणजे, सुगंध सहवासाचा
तुझ्या आसपास दरवळतच रहावे...

प्रेम म्हणजे, सहवासाची अनुभूती
आपल्या जवळच असल्यासारखे वाटत रहावे...

प्रेम म्हणजे, एक कविता
आयुष्यभर करीत रहावे..

शब्दखुणा: 

प्रेम म्हणजे...

Submitted by Sangeeta Kulkarni on 31 August, 2013 - 14:46

प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे, एक कविता
आयुष्यभर करीत रहावे...

प्रेम म्हणजे, सुंदर गजल
नेहमी गुणगुणत रहावे...

प्रेम म्हणजे, सुंदर गिटार
आवडत्या व्यक्तीला ऐकवत रहावे...

प्रेम म्हणजे, सुगंध सहवासाचा
तुझ्या आसपास दरवळतच रहावे...

प्रेम म्हणजे, सहवासाची अनुभूती
आपल्या जवळच वाटत रहावे...

प्रेम म्हणजे, एक कविता
आयुष्यभर करीत रहावे...

शब्दखुणा: 

अबोल प्रीत बोलली...

Submitted by Sangeeta Kulkarni on 21 July, 2013 - 13:56

अबोल प्रीत....

मिहीत रात्र रंगली
कमल पुष्पे फुलली...

अबोल प्रीत बोलली
हळूच गाली हसली...

नभी धुंद चांदणे
फुलाफुलांत हिंडले...

प्रीत आपुली पहिली
अबोल प्रीत बोलली ...

नवे रंग उमटले
अश्रु पुसून गेले...

उगवली पहाट
थांबली चंद्रकोर...

विसावली सागरी
झोपली गाढ कुशीत...

विसरली निळ्या आभाळास
अबोल प्रीत बोलली...
अबोल प्रीत बोलली...

शब्दखुणा: 

बोलावा विठ्ठल...

Submitted by Sangeeta Kulkarni on 18 July, 2013 - 13:47

---बोलावा विठ्ठल---

त्रिकाल वंदन विठुराया
मालक असशी युगा-युगांचा
प्रतिपालक तू चराचराचा
धरतीवरती तू अवतरलासी..

अवघे याचक तुझी लेकरे
दान मागती क्षमायाचनेचे
दु:खे त्यांची अगणिक
पाप हरती तुझ्या दर्शने..

चिंता हटू द्या दु:ख सरू द्या
मनीची आस पुरी करा
तुम्ही कृपेचे छत्र धरा
अवघे त्रिभुवन तुझ शरणार्थी..

अपार महती तुज मायेची
उचलून ज्योती कर्पुरारती
जीवन अमृते घेण्यासाठी..

शब्दखुणा: 

सहवास आठवणींचा ...

Submitted by Sangeeta Kulkarni on 13 July, 2013 - 13:37

सहवास आठवणींचा ...

आठवणी आठवणींना जोडतात
तुझं माझं नातं
अधिकच घट्ट करतात!

आठवणी सहवासात अधिकच खुलतात
एकमेकांच्या हृदयास हृदय जोडतात..

आठवणींच्या कोषात रमले
आठवणींच्या रंगात रंगले..

मनातली आठवण पाकळी
बनून फुल झाली..

फुलाला रंग देउन
खुलून आली..

आठवणी आठवणींना जोडतात
तुझं माझं नातं
अधिकच घट्ट करतात!

शब्दखुणा: 

आठवण (पाउस)

Submitted by Sangeeta Kulkarni on 12 July, 2013 - 15:23

आठवण (पाउस)

निसर्गाच्या हिरव्या गालीच्यावर
मुसळधार पावसात निसर्ग पाहत उभी होते..

पावसात चिंब होउन
निसर्गाच्या कुशीत विसावले होते..

हिरव्यागार गालीच्यावर पहुडले होते
सप्तरंगात नहात होते..

मुसळधार पावसात
चिंब होत होते..

सुर्योदयाच्या गुलाबी रंगात
मन उमलुन गेले होते..

सतत गळणा-या पाउसधारांनी
मन भिजुन चिंब झाले होते..

हिरवी झाडे खळखळणारा ओढा
यात मन लोभावलं होतं..

इंद्रधनुष्याच्या साक्षीने मी
तुझी झाले होते..

तुझ्या आठवणींच्या झोक्यावर
हिंदोळत होते..

कुणीतरी मला आपलं मानलं होतं
मुसळधार पावसात मन चिंब होत होतं ...

शब्दखुणा: 

अचानक .....

Submitted by Sangeeta Kulkarni on 7 July, 2013 - 12:29

अचानक .....

वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या
झाडासारखी अचानक समोर येते ..

वळवाच्या पावसासारखं
भिजवून टाकते..

जाणवलेला सुगंध जास्त
मनोहारी वाटतो ..

एखादाच प्रसंग खूण
पटवायला पुरेसा असतो..

तिचा.. निव्वळ स्नेह
खडकामागच्या झुळझुळ
झ-यासारखा-- प्रसन्न ताजा...

शब्दखुणा: 

निसर्गराजा...

Submitted by Sangeeta Kulkarni on 29 June, 2013 - 14:57

निसर्गराजा...

जलधारांच्या वर्षावाने
आसमंत न्हाउन निघाला ..

हिरव्याकंच शालीने
सजून निघाला..

वृक्षांच्या फांद्यांवर पालवीचा
तजेलदार रंग खुलू लागला ..

दवबिंदूच्या चमकेने पालवीचा
टवटवितपणा द्विगुणीत केला..

डोंगरकुशीतून शुभ्र खळाळ
झेपावू लागला ..

कोवळी उन्हं – धुक्याचा खेळ
रंगू लागला..

सप्त – रंगांचा झळाळ घेउन
इन्द्रधनुष्य पडतं ..

धरणीच्या कुशीतून आभाळाकडं
रानफुल डोकावू लागतं..

लांबवर पसरलेले गालीचे
वा-याच्या झोतांवर डोलू लागतात..

सुंदर मनमोहक रानफुलांचे सम्मेलन
चिंब झालेल्या धरतीवर जमते ..

तेव्हा मात्र भान हरपते..

शब्दखुणा: 

पाउसथेंब

Submitted by Sangeeta Kulkarni on 22 June, 2013 - 14:12

"पाउसथेंब”

पाउसथेंबाबरोबर पुष्पवैभव
धरतीवर अवतरले ....

काळ्या जांभळ्या पोलादी कातळावर
नटखटपणे विसावले ..

जगायचं कसं हे
त्यांच्या कोषातचं नसतं..

जगणं कसं निरागस
निर्व्याज असतं ..

निखळ सहजतेने आपल्या
मस्तीतही झुलतात..

विझलेल्या मनावर
हळूच फुंकर घालून जातात..

पुष्पवैभवाशी तयार होतं
मैत्रीचं नातं ..

परत परत भेटल्याशिवाय
पडत नाही चैन ..

वाट बघत गाणं
गुणगुणावसं वाटतं की ..

“चिंब पावसाने रानं झालं आबादानी”..
"चिंब पावसाने रानं झालं आबादानी"..

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - Sangeeta009