प्रेम म्हणजे...(Revised)

Submitted by Sangeeta Kulkarni on 31 August, 2013 - 14:51

प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे, एक कविता
आयुष्यभर करीत रहावे...

प्रेम म्हणजे, सुंदर गजल
नेहमी गुणगुणत रहावे...

प्रेम म्हणजे, सुंदर गिटार
आवडत्या व्यक्तीला ऐकवत रहावे...

प्रेम म्हणजे, सुगंध सहवासाचा
तुझ्या आसपास दरवळतच रहावे...

प्रेम म्हणजे, सहवासाची अनुभूती
आपल्या जवळच असल्यासारखे वाटत रहावे...

प्रेम म्हणजे, एक कविता
आयुष्यभर करीत रहावे..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे वाहता बाफ
तिशीला टेकताच पुन्हा टीनएजचा (१५) येतो ताप