पावसाची सर.....
हळूवार पावसाची सर
अलगद येऊन जावी...
एक सुंदरशी संध्याकाळ
हळूच खुलून यावी...
अलगद पडणा-या गारांचा
एक प्रवास सहवासाचा...
न बोलता बरंच काही सांगणारा
स्पर्श न करता मनाला भिडणारा...
मनाला उभारी देणारा
शून्यातून नवे जग साकारणारा...
मनातील भावना...
मनातील भावनांचा
समुद्र आहे शांत ..
आठवणींच्या लाटा अशा
उसळवू नकोस..
स्वप्न बनून माझी
झोप उडवू नकोस ..
मनाला झाल्या आहेत
ब-याच जखमा..
स्वप्नात येउन
अस्वस्थ करू नकोस..
अतूट नाते.....
तुझे माझे अतूट असे नाते
कधीही न तुटणारे .....
वा-यासारखे स्वछंद
बंधमुक्त करणारे.....
जीवनाला रंगवून जाणारे
लख्ख लख्ख उजळवणारे ....
धरतीसारखे सृजन
एक-एक बी फुलविणारे....
कधीही न संपणारे -
पुन्हा-पुन्हा आयुष्यात
येत रहावे असे वाटणारे....
पुन्हा-पुन्हा आयुष्यात
येत रहावे असे वाटणारे.....
जीवन....
जीवन आहे माझे गुंतागुंतीचे
गर्द अरण्यातील दाट जाळीसारखे
नितळ भासणा-या जलाशयातील
वेलींच्या गर्दीसारखे.....
उसळली आहे मनात
गर्दी मिश्र भावनांची
दुथडी भरून वाहत आहे आज
नदीच्या प्रवाहासारखी.....
चौखूर उधळत आहेत
माझ्या भावना
असहाय्य निर्बल बनते आहे मी
आवरताना त्यांना.....
जीवन....
जीवन आहे माझे गुंतागुंतीचे
गर्द अरण्यातील दाट जाळीसारखे
नितळ भासणा-या जलाशयातील
वेलींच्या गर्दीसारखे.....
उसळली आहे मनात
गर्दी मिश्र भावनांची
दुथडी भरून वाहत आहे आज
नदीच्या प्रवाहासारखी.....
चौखूर उधळत आहेत
माझ्या भावना
असहाय्य निर्बल बनते आहे मी
आवरताना त्यांना.....
खंत...
उमजलेले शब्द
हृदयातून काढू कसे?
फुललेल्या फुलाला
स्पर्श करू तरी कसे?
भीती होती मनात
फुल निख़ळण्याची
म्ह्णूनच मजा लुटली
फक्त निरख़ण्याची..
खंत वाटते मला
तू न समजू शकलेल्या
माझ्या नजरेची..
अशी का होते मनाची चलबिचल
कळीतून उमललेल्या फुलाची?
प्रेमाची ओळख....
प्रेमाची ओळख, होते अलगदपणे
नवे नाते, उमलते अलवारपणे
दोन मनांना जोडून, ठेवते हळूवारपणे....
जशी ...
गाण्याची एखादी मैफील
उत्तरोत्तर रंगत जाते
आयुष्याला संगीतमय करत राहते....
चेहरा नाही दिसला
तरी मनं मात्र नक्की दिसतं....
मनाला चिरकाळ आनंद देणा-या
गोड सुरेल गाण्यासारखं
कायम मनात जपण्यासारखं....
खास....
जगात ... क्षणोक्षणी आपल्याला
खूप माणसं भेटतात..
पण काहीच माणसं
मनात घर करतात..
एखादीच व्यक्ती
संपूर्ण आयुष्याला
व्यापून टाकते..
पण.. ती सगळ्या जगापेक्षा
जरा जास्तच खास असते..
“ना”ती
नाती सांभाळता सांभाळता
दूरवर येऊन पोहचले..
वाटत होती आपली
करता करता आपलसं--
स्वत:लाच हरवून बसले..
मनात साचलेयं खूप दु:ख
पण – ओठावरचं स्मित
सांभाळूनच मी खूप थकले..
नाती सांभाळता सांभाळता
दूरवर येऊन पोहचले
खूप दूरवर येऊन पोहचले.....
संवेदना....
संवेदना आहे
हळूवार कोमल
आहे कठिण
बांधणे शब्दांत...
गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे
हातातून निसटतं
दुर जाउन
मनमोहक हसू लागतं...
नाही उगम
नाही जन्म
तरी इतकं
दृढं का?
गुंफली गेली
घट्ट दृढता
संस्मरणीय वाटली
आनंदी ठेवण्याची क्षमता...