Submitted by Sangeeta Kulkarni on 11 May, 2013 - 06:00
जीवन....
जीवन आहे माझे गुंतागुंतीचे
गर्द अरण्यातील दाट जाळीसारखे
नितळ भासणा-या जलाशयातील
वेलींच्या गर्दीसारखे.....
उसळली आहे मनात
गर्दी मिश्र भावनांची
दुथडी भरून वाहत आहे आज
नदीच्या प्रवाहासारखी.....
चौखूर उधळत आहेत
माझ्या भावना
असहाय्य निर्बल बनते आहे मी
आवरताना त्यांना.....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आ? परत??
आ? परत??
झेपली नाही , रस ग्रहणाची
झेपली नाही ,
रस ग्रहणाची नितांत आवश्यकता