नुकसान भरपाई,..!
घडलेल्या या घटणेवरती
कुणी निसर्गावर रोष केला
तर जबाबदारी स्वीकारत
कुणी स्वत:लाही दोष दिला
मात्र मानवता जोपासत मदतीला
माणूस इथला थकणार नाही
पण झाल्या नुकसानाची भरपाई
कदापीही होऊ शकणार नाही,.!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
ऐक निसर्गा,...
हे आम्हाला मान्य आहे की
तु नैसर्गिक संपत्ती दिलीस
पण तुलाही मान्य करावं लागेल
की तुही नैसर्गिक आपत्ती दिलीस
मानवी कुकर्माचा सूड म्हणून
जरी तु नैसर्गिक प्रहार आहेस
पण झालेल्या या विध्वंसाचा
तु ही तितकाच गुन्हेगार आहेस
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
नैसर्गिक हाहा:कार
कधी अवकाळ छळतोय
कधी दूष्काळ जाळतोय
कधी भुकंपाचा धक्का
काळजालाच पोळतोय
यात माणसांच्या बळींसह
कुठे निसर्ग सुध्दा ठार आहे
अन् अभुतपुर्व आपत्तीचा
हा नैसर्गिक हाहा:कार आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
हे निसर्गा,...
तुझ्या सौंदर्याचे गाणेही
आम्ही इथे गायली आहेत
तुझी उग्रवादी रूपे ही
सदैव आम्ही पाहिली आहेत
हे निसर्गा सांग असा का
आम्हावरती कोपतो आहेस
कोपता-कोपता आमच्यावर
का स्वत:लाही कापतो आहेस,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
महत्वाचे पदं
ज्याच्याशी मैत्री केली
तो ही कात्रीत बघू शकतो
जवळचा समजला मित्रही
स्वार्थ पाहून वागू शकतो
राजकीय मैत्रीतही कधी
याच सुत्राने वादं असतात
अन् आकड्यांच्या लफड्यांत
सदा महत्वाचे पदं असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
पोलिस
जनतेच्या रक्षकांकडून
जनतेवरच वार आहेत
ज्यांचा आधार घ्यायचा
तेच कुठे गद्दार आहेत
पोलिस जरी असले तरी
गतानुगतिक वेश असावा
अन् कार्य असं करावं की
जनतेच्या मनी द्वेश नसावा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
मृत्युचे राजकारण
आपल्या जबाबदार्या नेहमीच
प्रत्येकाकडून झटकल्या जातात
मात्र आरोप-प्रत्यारोप करताना
कित्तेकांच्या सटकल्या जातात
सवयी प्रमाने विरोधकांच्या
दोषांचे डफडे बडवले जाते
अन् कुणाच्या मृत्युवरतीही
इथे राजकारण घडवले जाते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
निकालाचे वास्तव
निवडणूकांच्या निकालांचे
कुणाच्या मनी बिचुक असतात
तर अंदाजे लावलेले अंदाजही
कधी-कधी अचुक असतात
मात्र जय आणि पराजयानेच
प्रत्येक निवडणूक घेरलेली असते
अन् कुणाच्यातरी जिंकण्यामागे
कुणाची हार ठरलेली असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
इंटरनेट स्वातंत्र्य,...?
नेटच्या वाढत्या वापरावरती
कुणी व्हायरस सोडू पाहतात
वेग-वेगळ्या नेट वापरासाठी
वेग-वेगळा चार्ज जोडू पाहतात
असा टेलिकॉम कंपण्यांकडून
हा उतावळा पणा झाला आहे
नेटीझन्सच्या स्वातंत्र्यावरतीच
कंपन्यांकडून हा घाला आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
अंदाज अंदाजपंचे
निवडणूकांच्या निकालाचे
कित्तेकांना वेध असतात
अन प्रत्येक निकालातुन
प्रत्येकाला बोध असतात
डळमळणार्या मनांसाठी
सांत्वन फक्त मनचे असतात
जाहीर होणार्या निकालांचे
अंदाज अंदाजपंचे असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३