सुट्ट्यांची मजा
शालेय जीवना पासुनच मनाला
सुट्यांची आवड जडलेली असते
कित्तेक कामांची मुहूर्तमेढ सुध्दा
सुट्ट्यांवरतीच अडलेली असते
रोज-रोज सुट्ट्या शोधत मनं
सुट्ट्यांच्या आखणीत गुंग असतात
अन् लहाणा पासुन थोरांसहीत
लोक सुट्ट्यांसाठी उत्तुंग असतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
लँन्डलाईनचे वापर,...
मागे पडणारं लँन्डलाईन
मागे ना पडावं वाटतंय
मोफत सेवा देऊन तरी
लँन्डलाईन वाढावं वाटतंय
मात्र फ्री कॉलिंग करण्यासाठी
लोक लँन्डलाईन जोडून घेतील
अन् ठरेल ठरावीक वेळेतच
लँन्डलाईनचे वापर घडून येतील
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
मान-पान,...!
संधीचा लाभ घेण्यासाठी
हळदीने पिवळे असतात
मान-पान मिळावा म्हणून
सारेच उतावळे असतात
मान-पान मिळवण्यासाठी
अतोनात धडपडू शकतात
तर कधी माना-पानासाठी
नाराजीनाट्यही घडू शकतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
महाराष्ट्र माझा
घडले कित्तेक पराक्रम
या महाराष्ट्राच्या मातीमध्ये
किंचितही ना पडला मागे
जगाच्याही या गतीमध्ये
या महाराष्ट्रातल्या किर्तीचा
जगभरातही पडघम आहे
असाच होईल गौरव सदैव
अहो या मातीतच दम आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
संस्कृती
वेग-वेगळ्या धर्मांचे इथे
वेग-वेगळे नियम आहेत
समतेपासुन अजुनही कुठे
माणसंच दुय्यम आहेत
स्वाभिमान बाळगता येईल
अशी आपली संस्कृती असावी
मात्र कुणाच्याही संस्कृतीमध्ये
कधीच विषमतेची विकृती नसावी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सत्तेची वाटा-घाटी
सत्तेची साय चाटण्यासाठी
विरोधकासही लळा असतो
अन् महत्वाच्या पदांवरती
प्रत्येकाचाच डोळा असतो
महत्वाच्या पदांसाठी कधी
अंतर्गत आटा-आटी असते
तर कधी पदांच्या मलिद्यासाठी
इथे सत्तेचीही वाटा-घाटी असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सत्य काय,...?
ज्यांच्याकडून भविष्य घडवायचे
त्यांचेच भविष्य घडवले जातात
आपले पदाधिकारी निवडताना
इथे अशिक्षितही निवडले जातात
आता उच्चशिक्षिता पेक्षाही इथे
आम्ही अशिक्षित सरस जाणावा,.!
की आपले भविष्य घडवतानाही हा
मतदारांचा आंधळेपणा म्हणावा,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सत्यापनाची साक्ष
नवा होश,नवा जोश आणि
नव्या उमेदीचे वारे आहेत
एकामागुन एका ठिकाणी
राहूलजींचे दौरे आहेत
यामुळे कुणी आनंदी होईल
तर कुणी तोंडसुखही घेईल
अन् या गोष्टींच्या सत्यापनाला
साक्षीमहाराजही साक्ष देईल,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
आठवणींचे सत्य,...
कधी मनं खुलवणारे असतात
तर कधी हेलावणारे असतात
जिवनामधले कित्येक क्षण
आठवणींत सामावणारे असतात
आठवणींना उजाळा देत-देत
कधी-कधी मनं स्फूरले जातात
तर आठवणींच्या गाभार्यात
कधी मनं गहिवरले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
मदतीचा हात,...
माणसांमधली माणूसकी
माणसांनीच जपली जावी
आप-आपसातील आत्मीयता
आपुलकीने टिकली जावी
आलेल्या प्रत्येक संकटावर
सहकार्यानं मात पाहिजे
माणसांकडून माणसांसाठी
मदतीचा सदैव हात पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३