बरेच धागे आणि लेख काही जणांना आवडत नाहीत. अशा वेळी न आवडलेले लोक प्रतिसाद देतात, मग त्याला लेखक उत्तर देवो ना देवो, लेखकाच्या बाजूने इतर लोक उत्तरे देऊ लागतात.
त्यामुळे होते काय की लेख/कथा चा विषय वेगळा आणि प्रतिसाद वेगळ्याच विषयावर असतात.
तुम्हाला न आवडलेले धागे इथे सांगा, इथे चर्चा करू,मूळ धाग्यावर गोंधळ नको.
आता न आवडलेला धागा म्हणून याच धाग्यापासून सुरुवात करू नका 
प्यायला बार मध्ये बसलो होतो आणि ही गझल लागली -
झूम के जब रिंदो ने पिलाई.. एक कमी थी ताजमहल मे हमने तेरी तस्वीर लगा दी.
एक कमी थी ताज महल मे??? 'तेरी तस्वीर लगा दी... वाह
काय लाईन आहे, मी रिपीट करायला लावली आणि रिपीट वर रिपीट होत राहिले, नंतर बार मधले बाकीचे पण वाह वाह करायला लागले..पेग्स वर पेग्स होत राहिले
नंतर मुन्नी बेगम चे लझ्झते गम बढा दिजिये लावली,मजा आला..
नंतर चमकते चांद को टुटा हुआ तारा बना डाला..
तुम्ही कोणती गझल ऐकता पिताना?
भावाचे १५ महिन्याचे बाळ अजून काहीच शब्द बोलत नाही. ब्लॅंकेट ला बा , बॉल ला बा , बाय ला देखील बा म्हणते.
Give me car/remote/blanket/phone म्हणाले की त्या त्या वस्तू आणून देतो.
नावाने हाक मारली की वळून बघतो.
Eye Contact व्यवस्थित आहे.
काही हवे असेल तर पॉईंट करतो पण बोलत नाही.
ताताताता, बचा बचा बचा असे आवाज काढतो.
अजून ममा , पपा असे काहीही म्हणत नाही.
काय करावे, काही सल्ला?
गोष्ट मागच्या रविवार ची आहे. असेच आम्ही काही मित्र मैत्रिणी बसून ड्रिंक्स घेत होतो. एकेकच ड्रिंक झाले होते आणि आमच्यापैकी एकीने विषय काढला की भारतात लहान मुली कशा सेफ नाहीत आणि कित्येक वेळा नातेवाईक कसे लैंगिक शोषण करतात. दुसऱ्या एकीने तर शिव्याच घालायला सुरू केले की सगळे पुरुष कसे mcp आहेत, मौका पाहिजे असतो वगैरे वगैरे. कायदे कसे कडक हवेत, शिक्षा कशा व्हायला हव्यात वगैरे वगैरे..प्रत्येकजण सहमत होता.
आणखी एक मित्र होता तो म्हणाला माझा स्वतःचा अनुभव आहे. तो लहान असताना त्यांच्या लांबच्या एका काकूने कसा त्याचा फायदा उचलला होता आणि कसे त्याच्या सहमतीशिवाय त्याचे शोषण केले गेले.
खालीलप्रमाणे -
१. वन्स इन अ व्हाइल सेक्स करता म्हणजे उपकार करता असे समजणे सोडा.
२. आमची आई जे बोलते किंवा वागते त्याच्यात प्रत्येक वेळी इंटरफियर करणे सोडा. आईने आम्हाला जन्म दिला आहे आणि कोणीही तो बॉण्ड तोडू शकत नाही.
३. तुझे आई बाबा आणि माझे आई बाबा यांना सेम ट्रीटमेंट द्यायला शिका.
४.आपली लाईफ स्टाईल दुसर्याशी तुलना करणे सोडा, त्यांनी एखादी गोष्ट घेतली म्हणजे आपण त्यापेक्षा महाग घेणे जरुरी नाही आहे.
५.चीड चीड करणे सोडा.
६.फालतू शॉपिंग करणे सोडा. लुई विटन पर्स घेतल्याने तुम्ही जगात सर्वोत्तम दिसणार नाही आहात.
काल उशिरा एक पी 1 issue आला आणि सगळी टीम काँफेरेन्स कॉल वर जमली. सगळे घरून लॉगिन होते कारण लेट नाईट कॉल होता.
सगळे पुरुष होते आणि फक्त एक स्त्री होती कॉल वर.
डिस्कशन चालू होते आणि अचानक लहान मुलाच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. कॉल interrupt झाला.
पी एम ने कॉल मध्ये एकदम त्या स्त्री ला सांगितले - कॅन यु प्लिज गो ऑन म्युट?
आणखी एकाने री ओढली, की बाई जेंव्हा बोलायचे असेल तेंव्हाच unmute करत जा, बाकी वेळ प्लिज म्युट ठेवत जा.
आहे का तुमच्याकडे एखादी सुपेरपॉवर जी फक्त तुम्हाला माहीत आहे? अशी फालतू पॉवर की जी तुम्हाला सुपरहिरो चा दर्जा देऊ शकत नाही पण वेगळी आहे ?
आता माझे बघा - मी कधी हवे तेंव्हा झोपू शकतो. अगदी ढोल ताशे वाजत असतील तरी मी ठरवले झोपायचे समजा तर मी पाच मिनिटात झोपू शकतो. दुपारी जेवून, संध्याकाळी 7 पर्यंत झोपून परत 1 तास डिनर करून परत झोपू शकतो. आहे ना फालतू पॉवर?
माझा रूममेट - त्याच्याकडे एक युनिक पॉवर आहे. त्याला झुरळांचा वास येतो. रूम मध्ये झुरळ असेल त्याला वास येतो आणि तो सांगतो पण कोणत्या बाजूने येतोय.
पु ल देशपांडे के किरदारो पर आधारित - नमुने अशी जाहिरात जोरात चालू आहे.
मालिका हिंदी आहे आणि मला आनंद आहे की यामुळे पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली देशभरात पोचतील.
मी नक्की बघणार, तुम्ही?
अडमीन - हिंदी सिरीयल वर धागा चालत नसेल तर कृपया उडवावा.