Submitted by कटप्पा on 20 July, 2018 - 15:32
पु ल देशपांडे के किरदारो पर आधारित - नमुने अशी जाहिरात जोरात चालू आहे.
मालिका हिंदी आहे आणि मला आनंद आहे की यामुळे पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली देशभरात पोचतील.
मी नक्की बघणार, तुम्ही?
अडमीन - हिंदी सिरीयल वर धागा चालत नसेल तर कृपया उडवावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
nakki baghnar
मी नक्की बघणार
बघणार हे नक्की पण अस्सल
बघणार हे नक्की पण अस्सल मराठीतले जोक्स आणि डायलाॅग्स हिंदीमधे कितपत भावतील माहिती नाही.
कोणत्या चॅनेलवर?? किती वाजता?
कोणत्या चॅनेलवर?? किती वाजता??? कधीपासून???
बघणार हे नक्की पण अस्सल
बघणार हे नक्की पण अस्सल मराठीतले जोक्स आणि डायलाॅग्स हिंदीमधे कितपत भावतील माहिती नाही...+१
वल्ली चं नमुने केलं. जिथे
वल्ली चं नमुने केलं. जिथे शाब्दीक कोट्या असतील तिथे कसं काय करणार ? कदाचित फक्त व्यक्तीचित्रे मांडणार असतील. खट्टा मिठा मांडणी असेल कदाचित
कोणत्या चॅनेलवर?? किती वाजता?
कोणत्या चॅनेलवर?? किती वाजता??? कधीपासून???>>>>>> 'सोनी सब टिव्ही' चॅनलवर 21 जुलैपासून शनि-रवि रात्री 9 वाजता.
हिंदीमधे करावंस वाटलं लोकांना
हिंदीमधे करावंस वाटलं लोकांना. बहुतेक कलाकार मराठीतलेच आहेत. मग सरळ मराठीतच काढायची ना सिरियल. कितीतरी बिनबुडाच्या सिरियल्स चालू आहेत. त्यातली एखादी बंद करायची.
मागे कधीतरी एकदा वैभव मांगलेने अंतु बर्वा केल्याचं आठवतंय.
सुबोध भावे नाथा कामत च्या
सुबोध भावे नाथा कामत च्या भूमिकेमध्ये आहे. मी तर बघणार. नसेल चांगली बनवली तर पिसं काढायला आपण आहोतच.
संजय मोने पुलं
संजय मोने पुलं
बघावीशी वाटतेय. बघु वेळ आणि लक्षात रहाण्याचं गणित जमतंय का?
कोणाला रिपीट टायमिंग कळलं तर
कोणाला रिपीट टायमिंग कळलं तर मला सांगा. घरी 'संभाजी' सोडून हे मला कोणी पाहू देईल असं वाटत नाही ९ वाजता.
चांगले करतील असं वाटतय
चांगले करतील असं वाटतय कास्टींग पाहून. पण पहाणार नाही.
एक तर पुलंची व्यक्तिचित्रे नुसती वाचलीच नाही तर ऐकलीत देखील. त्यामुळे डोक्यात एक वेगळंच कॉम्बो बसलय.
कुणी छाने म्हटलं तर पाहूही.
मी तर बघणार. नसेल चांगली
मी तर बघणार. नसेल चांगली बनवली तर पिसं काढायला आपण आहोतच. >>
आमच्या घरच्या ग्रुपवर
आमच्या घरच्या ग्रुपवर सकाळपासून टैम्पास चाललाय, मराठीतले विनोद हिंदीत कसे असतील यावरून...
Eventually, ते 'I am going out बरं का रे म्याकमिलन'च होणार ... सगळी खिचडी !
१-२ एपिसोडस बघून ठरवणार.
'परोपकारी गंपू'चा पहिला
'परोपकारी गंपू'चा पहिला एपिसोड पाहिला; दुसर्या दिवशी त्याचा दुसरा भाग पाहण्याचं आठवलंही नाही. थोडक्यात गंपू पहिल्या भागात तरी नीट उभा राहिला नव्हता.
पण, मालिकेची एकूण कल्पना आत्ता तरी तशी चांगली वाटते आहे... म्हणजे अगदी भन्नाट जमलीय असं नव्हे; पण लगेच write-off देखील कराविशी वाटली नाही.
ज्या व्यक्तीचित्रांमध्ये शाब्दिक विनोद कमी आणि प्रासंगिक विनोद अधिक आहेत, अशा व्यक्तिरेखा निवडल्या असण्याची शक्यता आहे, असं समहाऊ वाटतं आहे.
त्यामुळे पुढच्या शनिवारी बघणार.
सोनी सब टिव्ही' चॅनलवर 21
सोनी सब टिव्ही' चॅनलवर 21 जुलैपासून शनि-रवि रात्री 9 वाजता.>> ओहो... हे आता पाहिलं. आता पुढच्या शनिवारी लक्षात ठेवून बघेन.
सोनी च्या वेबसाईट वर दिसेल ना
सोनी च्या वेबसाईट वर दिसेल ना?
मला हे शिर्षक अतिशय खुपतंय
मला हे शिर्षक अतिशय खुपतंय डोळ्याला.
संजय मोने पुल आहे!
संजय मोने पुल आहे!
तारक मेहता का उल्टा चष्मा
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका कोणाकोणाला आवडते?आपण इथे चर्चा करूया का?