नवऱ्याच्या बायकोकडून अपेक्षा

Submitted by कटप्पा on 26 August, 2018 - 22:11

खालीलप्रमाणे -

१. वन्स इन अ व्हाइल सेक्स करता म्हणजे उपकार करता असे समजणे सोडा.

२. आमची आई जे बोलते किंवा वागते त्याच्यात प्रत्येक वेळी इंटरफियर करणे सोडा. आईने आम्हाला जन्म दिला आहे आणि कोणीही तो बॉण्ड तोडू शकत नाही.

३. तुझे आई बाबा आणि माझे आई बाबा यांना सेम ट्रीटमेंट द्यायला शिका.

४.आपली लाईफ स्टाईल दुसर्याशी तुलना करणे सोडा, त्यांनी एखादी गोष्ट घेतली म्हणजे आपण त्यापेक्षा महाग घेणे जरुरी नाही आहे.

५.चीड चीड करणे सोडा.

६.फालतू शॉपिंग करणे सोडा. लुई विटन पर्स घेतल्याने तुम्ही जगात सर्वोत्तम दिसणार नाही आहात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईने आम्हाला जन्म दिला आहे आणि कोणीही तो बॉण्ड तोडू शकत नाही.

३. तुझे आई बाबा आणि माझे आई बाबा यांना सेम ट्रीटमेंट द्यायला शिका.>>>>>>>>>> हा फरक लक्षात ठेवला की त्रास होत नाही.मुलीविषयी जे आतून प्रेम असते ते सुनेबाबत येत नाही.तीच गोष्ट आईबाबत.आईविषयी जे प्रेम असते ते सासूबाबत लगेच वाटू शकत नाही..सहवासाने, वागण्याने एकमेकींमधे प्रेम, आपुलकी वाढत जाते.

काही म्हणा,
फक्त 6 अपेक्षा??
एक तर तुमचे लग्न झाले नाहीये, किंवा समर्थांच्या जगी सर्व सुखी, प्रश्नाचे तुम्ही उत्तर आहात Happy

काही म्हणा,
फक्त 6 अपेक्षा??
एक तर तुमचे लग्न झाले नाहीये, किंवा समर्थांच्या जगी सर्व सुखी, प्रश्नाचे तुम्ही उत्तर आहात Happy
Submitted by सिम्बा on 27 August, 2018 - 11:38

एवढ्याच अपेक्षा??
Submitted by सस्मित on 27 August, 2018 - 11:45

>>>>>>>

पुढच्या श्रावणी सोमवारी आमची “आदर्श पत्नी स्पर्धा” येत आहे. त्यात तुम्हाला भरपुर अपेक्षा वाचायला मिळतील Happy

तुमच्या स्वतः च्या आईवडीलांच्या वाऱ्याला उभं राहणं बायकोला outsource न करता स्वतः करुन बघा आणि मग ह्या एक ते .... अपेक्षा लिहून काढा.

पुढच्या श्रावणी सोमवारी आमची “आदर्श पत्नी स्पर्धा” येत आहे. त्यात तुम्हाला भरपुर अपेक्षा वाचायला मिळतील>>>>> येउद्या येउद्या Happy

पण मी काय म्हणते, हे स्वतःच्या बायकोला सांगितलंयत ना?
नाही म्हणजे ती नसेलही मायबोली वाचत. किंवा तुमचा हा आयडी तिला माहिती नसेल. किंवा.. अजून काही.
पण तुमच्या अपेक्षा पूर्ण व्हायच्या तर बायकोला नक्की सांगा हं.
इथल्या बायका आपापल्या नवर्‍याच्या अपेक्षा पूर्ण करण्यात गुंतलेल्या असतील ना. मग तुमच्या बायकोला शोधून तिला वाचायला सांगणे वगैरेसाठी वेळ नाही होणार.

1. बाहेर गेल्यावर इतर बायकांकडे निरखून पाहू नये.
2. विचारात असताना भॉ केल्याप्रमाणे कुठल्याही अनोळखी बाईचा ड्रेस दाखवू नये
3. नवरा कुठे पाहतोय त्याच दिशेला पाहू नये.
4. कोण होती ती हा प्रश्न वेळेत विचारावा. आपले लक्ष नव्हते म्हणून उगाच चुटपूट लागते. (शापवाणी उच्चच्चाराविशी वाटते )

शाबास dagdar.

मी मुख्य अपेक्षा टाकल्या आहेत. बाकी मॅटर नाही करत.

निधप - या सर्व बायकांना ऍप्लिकेबल आहेत. तुम्ही नाही तुमचे पती नक्कीच सहमत असतील.

तुम्ही हे धागे ललित लेखन विभागात का काढता?
ललित्/संकीर्ण/स्फुट यापैकी कुठला साहित्यप्रकार आहे तुमच्या धाग्यात ? योग्य ग्रूप माहित नसल्यास मदत समितीला वा अ‍ॅडमिनला विचारून बघणार का एकदा? सध्या तरी तुमच्या धाग्यांपाई पूर्ण ललित ग्रूपचे सभासदत्व रद्द करावेसे वाटत नाही पण अ‍ॅडमिनना हे ललित वाटत असल्यास तसे करण्याशिवाय पर्याय नाही.
तुमच्या धाग्यांविरोधात काही म्हणणे नाही तुम्ही अवश्य अजून धागे काढा पण हे ललितात येत नाहीत आणि ललित ग्रूपच्या सदस्यांना विनाकारण ते दिसत रहातात. सहाकार्य अपेक्षित.

राजसी आपली कंमेंट कळलीच नाही. --- तुमच्या आईवडिलांची सकाळी उठल्यापासून काय काय कामं / सेवा तुम्ही करता? कोणकोणत्या सेवा तुमच्या बायकोला, तुमची बायको झाल्याचे भाग्य लाभले म्हणून कराव्या लागतात? सकाळी उठल्यावर प्यायला कोमट पाणी लागते पासून सुरवत करु....

सध्या तरी तुमच्या धाग्यांपाई पूर्ण ललित ग्रूपचे सभासदत्व रद्द करावेसे वाटत नाही पण अ‍ॅडमिनना हे ललित वाटत असल्यास तसे करण्याशिवाय पर्याय नाही.
>>> पर्याय असतात हो. तुम्हाला शोधून काढावे लागतील.
बाकी जर अडमीन म्हणाले तर मी योग्य जागी धागा काढेन, फक्त तुमच्या वैयक्तिक सोयीसाठी नाही.

ललित विभागात ललितच लिहावेत असे अ‍ॅडमिनना प्रत्येकाला वैयक्तिकरित्या सांगावे लागू नये म्हणून सभासदांच्या सौजन्यावर आणि समंजसपणावर भरवसा ठेऊन त्यांनी सगळ्यांच्या सोयीसाठी वेगवेगळे विभाग काढून दिले आहेत.
आपण हे घालून दिलेले संकेत पाळावेत म्हणजे सगळ्यांच्याच सोयीचे होईल... योग्य विभाग ऊपलब्ध नसल्यास अ‍ॅडमिन नवा विभाग करूनही देतात... ज्यांना तुमचे धागे आवडतात त्यांना ते योग्य विभागात शोधणेही सोपे जाईल.
ज्यांना नको आहेत ते त्या विभागाचं सदस्यत्व रद्दही करू शकतात.

तुमचे लेखन ललित आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

>> वन्स इन अ व्हाइल सेक्स करता म्हणजे उपकार करता असे समजणे सोडा.
Lol
ह्या विषयावर एखादा बॉलीवुडी पिक्चर काढा. तुफान करमणूक होईल Wink

सशल +१
अँड अल्सो, डिफाईन वन्स इन अ व्हाइल Lol

ओके... आता माझाही गोंधळ होतोय, कारण कटप्पा टाकतत् ते ललित नाही तर बाकी लोक जे टाकत असतात ते तरी कुठे ललित आहे. सध्या लेख या विभागात जाऊन पाहिले, सगळी व्हरायटी आहे तिथे.

बाकी कटप्पा यांच्यासाठी वेगळा विभाग काढून दिला तर आम्हाला त्यांचे लेख कसे दिसणार?

च्रप्स, दोन ऑप्शन्स आहेत. कटप्पा ज्या विभागात लिहितील त्याचं सभासद होणं किंवा कटप्पा ह्यांचे चाहते होणं. ह्यातलं एक किंवा दोन्ही ऑप्शन्स निवडू शकता.

ह्या विषयावर एखादा बॉलीवुडी पिक्चर काढा. तुफान करमणूक होईल Wink>>>>
आहेत कि अलरेडी. तो कुठला तो ज्यात विवेक ओबेरॉय, लारा दत्ता वगैरे आहेत. २ पार्ट्स आहेत.
मला मात्र हे वाचून रेमंडचे बरेच एपिसोड्स आठवले. एक ज्यात डेब्रा ,इन्स्ट्रक्टर हँडसम असल्याने खुश असते तो. दुसरा ज्यात डेब्रा आणि रेमंडच्यात कॉपिटीशन सुरु होते कारण 'अँग्री सेक्स'. आणि तिसरा 'हॅलोवीन कँडी'.

Pages