Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
खूप वाईट बातमी. भावपूर्ण
खूप वाईट बातमी. भावपूर्ण श्रद्धांजली. ☹
अमांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
अमांना मनःपूर्वक श्रद्धांजली. खूप छान होत्या त्या.
खूप वाईट वाटलं.
फारच वाईट बातमी, अमा..
फारच वाईट बातमी, अमा.. श्रद्धांजली! किती सकारात्मक व धीराच्या होत्या..! खूप वाईट वाटलं..खरं तर धक्का बसला
एकदम 80 पोस्ट बघून धस्स झालं
एकदम 80 पोस्ट बघून धस्स झालं होतं.
फार फार वाईट बातमी अमा यांची
कधीही न भेटलेल्या व्यक्तीबद्दल डोळ्यात पाणी यायची वेळ क्वचितच येते.
अमा जिथे असाल तिथे तुम्हाला शांती मिळो
फार बेकार
फार बेकार
मला दुसरी च दुःखद घटना वाटली होती..
घरातले कोणी गेले असे झाले ऐकून..
भारी होत्या अमा
माझ्याशी मध्येच तिरसट बोलायच्या.. पण कधी राग यायचा नाही.
कारण कधी अचानक इतक्या आपुलकी आणि मायेने बोलायच्या की जणू त्यांच्या बहिणीच्या मुलाशी बोलताहेत..
मूड नुसार बिनधास्त व्यक्त व्हायच्या..
म्हणून आवडायच्या..
पोस्ट मिस होतील त्यांच्या..
पण जुने धागे वर येत राहतील आणि आठवत राहतील
>>>>मूड नुसार बिनधास्त व्यक्त
>>>>मूड नुसार बिनधास्त व्यक्त व्हायच्या..
मलाही त्यांचा जिंदादिल स्वभाव फार आवडायचा. दैन्यास वाव नाही सतत हसतमुख. शिकण्यासारखे होते.
होय धनु रास
>>>माझ्याशी मध्येच तिरसट बोलायच्या..
हाहाहा मीही नोटिस केले होते.
अमाना भावपूर्ण श्रद्धांजली
अमाना भावपूर्ण श्रद्धांजली
एकदा त्यांना भेटले होते. वेगळंच व्यक्तिमत्व होतं त्यांचं!
त्याच्या मुलीसाठी खूप वाईट वाटतंय.
अमा, श्रद्धांजली _/\_
अमा, श्रद्धांजली _/\_
अमांना श्रद्धांजली.
अमांना श्रद्धांजली.
Amazing personality. You will be missed.
आईग... खूपखूप वाईट झालं..
आईग... खूपखूप वाईट झालं.. त्यांच्या आजारपणाची कल्पना होती.. पण इतक्या लवकर हे ऐकू खूप खूप दुःख झालं.. त्यांच्या मुलीला या दुःखातून सावरायला बळ मिळो.. अजून काय बोलणार.. सगळे शब्द फोल आहेत या दुःखा पुढे .
अमांना श्रद्धांजली.
अमांना श्रद्धांजली.
सगळ्यात पहिली त्यांची आठवण आहे ती विपु मध्ये त्यांनी पांडुरंग सांगवीकराबद्दल लिहिले होते. सांगलीतले खाडिलकर, हैद्राबादेतले वास्तव्य हे दोघांचे समान धागे होते. पुस्तकांबद्दल लिहिले की आवर्जून प्रतिसाद द्यायच्या. आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल कमालीच्या तटस्थपणे लिहिण्याची त्यांची अफाट ताकद होती. लहानपणापासून त्यांच्या आयुष्यात उलथापालथ होती. तरिही आयुष्याकडे अत्यंत सकारात्मकतेने त्या पाहात. त्यांच्या मुलीला यातून सावरण्याचे बळ मिळो.
अमांना श्रध्दांजली. एकदम धस्स
अमांना श्रध्दांजली. एकदम धस्स झालं वाचून.
अमांबद्दल वाचून खूप वाईट
अमांबद्दल वाचून खूप वाईट वाटलं / वाटत आहे
अमांना श्रद्धांजली!
फारच वाईट बातमी. अमा ना
फारच वाईट बातमी. अमा ना श्रद्धांजली.
अमांना भावपूर्ण श्रद्धांजली _
अमांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
फारच वाईट झालं. आत्ताआत्तापर्यंत मजेत इकडे तिकडे वावरत होत्या माबोवर. हे असं काही कानावर येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
अमा, आपली कधी भेट नाही झाली, पण आय विल मिस यू!
आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल
आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल कमालीच्या तटस्थपणे लिहिण्याची त्यांची अफाट ताकद होती >> She was a Fighter.
आताआतापर्यंत त्या पोस्त्स टाकत होत्या. १० वर्षांपुर्वीचा गोळीबंदपणा नव्हता त्यांत, पण रोजच्यातला तो साचलेपणा, अवघडलेपण आणि थकल्याची-हरल्याची भावना- हे सारं सशक्तपणे नाकारत त्या लिहित होत्या. त्यांचा जबरदस्त सेंस ऑफ ह्युमर हा त्यांच्या बुद्धीमत्तेचं प्रॉडक्ट होतं, आणि त्यांची बोलण्या-लिहिण्याची शैली हे त्यांच्या अॅटिट्युडचं. त्यांचा शब्द आणि अनुभव- दोघांचा संग्रह मस्त होता. वाहत्या बाफावर अनेकदा त्या आल्या की आपली बडबड बंद करून त्यांना ऐकत राहावं असं वाटायचं. कोतबो वाचताना अनेक सल्ल्यांचा वैताग येत असताना अमांचे सल्ले म्हणजे शांत स्निग्ध आणि अनुभवी शब्दांचं गारूड असायचं. कुठच्याही प्रश्नावर त्यांचं म्हणणं ऐकलं की 'इतनी भी क्या बडी बात है!' असं अखेरीस वाटायचं.
परवा बेनेगलांच्या नव्वदीला ठरवलं की निशांत, अंकुर, मंथन वगैरे नव्याने पुन्हा पाहायचे. मग अचानक ते गेलेच. मग मनमोहन गेले. मग आता हे. दोनच दिवसांत हे सारं डिप्रेशन. काही बघू करू नये आता.
ओह! फार दु:खद बातमी, परवाच
ओह! फार दु:खद बातमी, परवाच त्याची खुप आठवण आली होती, बर्याच दिवसात दिसल्या नाहि म्हणून विचारणारच होते...खुप हरहुन्नरी होत्या त्या..आई कुठे काय करते धाग्यावर त्यानी खुप धमाल केली होती...त्याच्या मिश्किल शैलीत त्या लिहायच्या ते वाचुन छान वाटायचे..
कॅन्सर वर सुद्धा त्यानी धिराने फाइट दिली होती!!
अमा ! यु विल बी मिस्ड!!
अत्यंत वाईट वाटले. पहिल्या
अत्यंत वाईट वाटले. पहिल्या वाक्यातच पोस्टखालचे नाव न बघताच कळायचे की अमा लिहितायत, इतकी विलक्षण शैली आणि भाषा होती त्यांची.
मायबोली सुनी सुनी वाटेल आता त्यांच्याविना.
अमा, तुम्ही फार छान आयुष्य
अमा, तुम्ही फार छान आयुष्य जगलात! सकारात्मक दृष्टिकोन आणि अत्यंत युनिक असा सेन्स ऑफ ह्युमर या तुमच्या दोन गोष्टी कायम लक्षात राहतील.
ही बातमी वाचून सुन्न वाटते आहे. पुन्नीला या साऱ्यातून उभे राहण्याचे बळ मिळो.
अमा
अमा
अमांना श्रद्धांजली _/\_
अमांना श्रद्धांजली _/\_
अमा __/\__
अमा
__/\__
काल दुपारी अमा गेल्या
काल दुपारी अमा गेल्या कळल्यापासून अस्वस्थ वाटतेय खूप. २००८ की ९ पासून त्यांच्या पोस्ट वाचत आलो आपण. खट्याळ मिश्किल नर्म विनोदी लिहीत आणि तरीही आयुष्यातल्या अनुभवांची डूब असे त्यांच्या लिहिण्यात. वाहत्या बाफावरचे विषय असो की एखादी रेसिपी किंवा सल्ला त्यांचं वेगळेपण उठून दिसे. गटगला भेटलो तेव्हाही जाणवले की पोस्ट मधे प्रतिबिंबित होणारं हेच ते मऊ मेणाहून व्यक्तिमत्व पण आयुष्यातल्या कठोर वज्रास भेदून गेल्या प्रत्येक वेळी.
किती वेगळेच बंध आहेत हे. जाणीवेच्या चौकटीतील एक भरीव चौकोन रिकामा झाल्यासारखं वाटतंय. तो भरलेला होता तेव्हा लक्ष जात नव्हतं आता रिकामा झालाय तर पुन्हा पुन्हा नजर जाते आहे.
त्यांची नुसती " आज रात्री मी तुमच्या साठी प्रार्थना करेन " असे वाक्य असणारे पोस्ट वाचूनही हरलेल्या मनाला उभारी यायची. बीचवर थंड पिता पिता छत्रीत पाय पसरून विनोदी पुस्तक वाचणे अशी सुटीची कल्पना असलेल्या अमा, ऑफिसला जाताना झाडाच्या ढोलीत खारुताई साठी दाणे अक्रोड ठेवणाऱ्या अमा, स्वतःच्याच Wonderland मधली Alice होती ती!
आठवणींचे कढ नुसते. म्हंटले तर इतक्या दिवसात कधी त्यांना विचारले पण नाही. तशी त्यांची जगाकडून कुठलीच अपेक्षा नव्हती. हे सगळं असंच असणार, माणसं आपल्या कल्पनेच्या विपरीत च वागणार यावर ठाम राहण्या इतके अनुभव गाठीशी होते त्यांच्या. आणि त्यावर पाय रोवून मुलीसाठी आणि स्वतः साठी घट्ट उभ्या होत्या त्या. त्यांना कोलमडलेली बघितले नाही ते बरेच झाले असे वाटते. तशाच आत्मविश्वासपूर्ण, येईल त्या संकटाला हसत सामोऱ्या जाणाऱ्या आणि जाता जाता कोपऱ्यात हास्याची पखरण करत जाणाऱ्या अमा मनात कायम राहतील.
त्यांना आठवले की एकच गाणे आठवत आहे आज - आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा.. झिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा..!
स्वतःच्याच Wonderland मधली
स्वतःच्याच Wonderland मधली Alice होती ती! >>> आहा! अमाकरता अगदी चपखल वर्णन आहे हे.
Really she was Alice in
Really she was Alice in Wonderland!
अश्विनी मावशी श्रद्धांजली !!
अश्विनी मावशी
श्रद्धांजली !!!
अमांची बातमी वाचून खूप सुन्न
अमांची बातमी वाचून खूप सुन्न व्हायला झालेय. काय लिहावे कळत नाहीये. पण साजिरा व आशुडीच्या प्रतिसादांना अगदी सहमती. खूप मिस होतील अमा..
अमाच्या मुलीला माहीत असेल का
अमाच्या मुलीला माहीत असेल का आईचा मायबोलीवरचा वावर?
त्यांच्या मुलीबरोबर च त्यांच्या कुत्र्याचे काय होईल? कसं accept करेल लेक? असे काही काही विचार मनात येत आहेत कालपासून....
अशा घटना घडल्यावर आपल्याला पण एक इमोशनल closure हवा असतो... विनार्च गेल्यापासून तिच्या मुलीचे update कोणाला विचारावेत असा प्रश्न पडतो मला बरेचदा...
अर्थात, अमाच्याच शब्दात सांगायचे तर, आपण देवाकडे प्रार्थना करू तिच्यासाठी.
आशुडी (आणि इतरही), खूप चपखल लिहिले आहे....
ॐ शांती
ॐ शांती
स्वतःच्याच Wonderland मधली
स्वतःच्याच Wonderland मधली Alice होती ती!
+७८६ फॉर अमा
Pages